नदीचे मनोगत | nadi bolu lagli tar |
नदी बोलू लागली तर मराठी निबंध
Nadi bolu lagali tar Marathi nibandh
माझ्या सर्व प्रिय पुत्रांनो माझे बोलणे जरा ऐकून घ्या . खूप दिवसांनी या तुमच्याबरोबर बोलण्यासाठी मोकळा वेळ मिळालेला आहे. तुम्ही देखील आता मोकळे आहात. तुमच्याशी बोलून घ्यावे असे मनात आले आहे.
मी आहे नदी. नदीच्या पाण्यात, अंगाखांद्यावर तुम्ही भरपूर खेळलात. आणि मोठे झालात तुमची प्रगती बघून मला खरोखर खूप आनंद होतो.
केवळ आत्ताच्या मानव जातीचा नव्हे तर हजारो वर्षापासून माझ्या तीरावर आलेल्या असंख्य जीवांचा जीवन क्रम मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. माझ्या काठावर वस्तीसाठी आलेल्या प्रत्येक जीवाचा मी सांभाळ केलेला आहे. प्रत्येकाची तृष्णा भागवली आहे.
नदीची कैफियत , नदीचे आत्मवृत्त
आदिमानव अवस्थेपासून आताच्या प्रगत मानवापर्यंत होणारी स्थित्यंतरे मी अनुभवली आहेत. सुरुवातीच्या काळी वल्कले नेसनाऱ्या मानवापासून आजच्या अगदी पुढारलेल्या पोशाखांपर्यंत बदलत जाणारे माणसाचे राहणीमानही खूपच बदलत गेलेले आहे.
माणसाच्या जीवनात घडत गेलेले बदल इतक्या जवळून पाहिलेले असल्यामुळे आजच्या माणसाची प्रगती बघितल्यावर मला खूपच अभिमान वाटतो. जीवन कधीही थांबत नाही ते वाहतच राहते.येणाऱ्या प्रत्येक अडचणीला पार करून आयुष्य पुढे पुढे जात राहते अगदी माझ्यासारखे.
सतत पुढे जात राहणे हा माझा स्थायीभाव आहे. मात्र मानवाने माझ्या प्रवाहातही बंधारे बांधून मोठमोठी धरणे निर्माण केलेत. धरणात पाणी साठवून फार मोठी जमीन लागवडीखाली आणली. नवीन नवीन पिके घेऊन आर्थिक दृष्ट्या माणूस सक्षम झाला. याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करते.
माझा प्रवाह थांबवून बांधलेल्या धरणामुळे तुमचा फायदा होत असेल तर यात मी धन्यता मानते. परंतु त्या धरणांची निगा राखली नाही तर येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
नदीचे महत्व नदीचे उपकार मराठी माहिती
अलीकडेच धरणांचे बांध फुटल्याच्या घटना माझ्या कानावर आल्या व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी जीव देखील गमावले.
प्रगतीच्या नावाखाली मनुष्य बेधुंद पणे वागताना दिसत आहे . त्यामुळे मला आता काळजी वाटते. तुम्ही खूप खूप प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे. एक गोष्ट मात्र अजिबात विसरू नका ,निसर्गाचा तोल बिघडवून तुम्ही समतोल जीवन कसे बरे जगू शकता. म्हणून निसर्ग जतन करायला ही शिका.
तुम्ही मोठमोठे कारखाने काढले परंतु त्यातून निर्माण होणारे सांडपाणी घरा घरामधील दूषित पाणी सरळ तुम्ही माझ्या पाण्यामध्ये सोडून दिलेत. या सर्वांमध्ये माझ्या पाण्यामध्ये राहणाऱ्या सर्व जलचरांना फार त्रास होतो . बऱ्याच वेळा त्यांना जीवही गमवावा लागतो.
हे सगळे थांबवण्यासाठी पाण्याचे शुद्धीकरण करून मग ते पाणी माझ्या मध्ये सोडा म्हणजे निसर्गाची ही हानी होणार नाही आणि तुमच्या गरजाही पूर्ण होतील. एक गोष्ट मात्र कधीच विसरू नका निसर्ग तुमच्या या गरजा पूर्ण करू शकतो तुमची हाव नाही.
| nadi bolu lagli tar
नदीच्या काठांवर मोठ्या प्रमाणावर झाडे लावा. या झाडांमुळे जमिनीची होणारी झीज थांबेल. माझ्या पात्रांमध्ये असलेला गाळ काढून तुम्ही शेतांमध्ये टाकता त्यामुळेदेखील शेताची सुपीकता वाढते. त्यातच माणसाने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केल्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण होतात .त्यामुळे अनेक दुर्घटना देखील घडतात. इतके बेताल वर्तन करू नका. नाहीतर निसर्ग तुम्हाला त्याच्या तालावर नाचायला लावेल.
चला तुम्हाला ज्ञानाचे भरपूर घोट पाजून झाले .आता तहानलेल्याच्या घशामध्ये पाण्याचे घोट पोहोचवून त्यांचा आत्मा शांत करते .येते मी. मीही आता समुद्राच्या भेटीसाठी आतुर झालेली आहे .
या निबंधाचे खालील नावेही असू शकतात .
- |नदीचे आत्मवृत्त .
- |नदीची कैफियत .
- |मी नदी बोलते आहे .
- |नदीचे आत्मकथन .
- |नदी आणि माणूस .
हे वाचायला अजिबात विसरू नका
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.