माझी आजी मराठी निबंध  |majhi aaji marathi nibandh

Majhi aaji nibandh in Marathi
Majhi aaji nibandh in Marathi

     

   

           majhi aaji marathi nibandh,याठिकाणी आपण माझी आजी या विषयावर चार निबंध बघणार आहोत. हे सर्व निबंध तुम्ही वाचा आणि तुम्हाला आवडेल तो भाग तुमच्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धेमध्ये तुम्ही वापरू शकता.

       हे माझी आजी विषयावरचे चारही निबंध वाचा तुम्हाला नक्की मजा येईल.


             निबंध क्रमांक एक


         माझी आजी |mazi aaji

     | Majhi aaji essay in marathi


                 मी आणि माझा मित्र एकदा गप्पा मारत बसलो होतो . गप्पांमध्ये आजीचा विषय निघाला तेव्हा तो म्हणाला, " जिची सारखी हाजीहाजी करावी लागते तिला आजी म्हणतात . मी त्याला म्हटलं तुझ्या आजीला करावे लागत असेल हाजी हाजी माझी आजी तर फारच मस्त आहे. मला माझी आजी खूपच आवडते.

           आमच्या घरात आजोबांनंतर आजी वयाने सर्वात मोठी आहे. ती सकाळी सगळ्यांच्या आधी उठते, आणि इतके वय असूनही गार पाण्याने अंघोळ करते . तिला गरम पाण्याने अंघोळ करणे अजिबात आवडत नाही  . आईने तिला आंघोळीसाठी गरम पाणी दिले तरीही   आजी  ते घेत नाही . म्हणूनच कदाचित आजीचा स्वभाव इतका शांत आहे.   आजीला कधीही  रागावलेले मी बघितलेले नाही  . आजीला  स्वयंपाक बनवायला  खूप आवडतो . ती आम्हाला  वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालते.  आई  आजीला आराम करायला सांगते  पण आजीला  आराम अजिबात आवडत नाही .

             माझ्यासाठी आजी म्हणजे कल्पवृक्षच आहे. ती मला प्रेमाने पिल्लू, बेटा ,माऊ अशा विविध नावांनी हाक मारते. दुपारी जेवण केल्यानंतर आजी थोडावेळ टीव्हीवर संस्कार चैनल बघते आणि भजन म्हणता म्हणताच बऱ्याचदा आजीला झोप लागते . मग आजी तिथेच झोपून घेते .आई हळूच आजीच्या डोक्याखाली उशी ठेवते . मग संध्याकाळी आजी उठल्यानंतर एक कप गरमागरम बिन दुधाचा चहा घेते आणि तिच्या मैत्रिणींबरोबर संध्याकाळी फिरायला जाते.

               आजीला गप्पा मारायला खुप आवडते . माझ्याबरोबर आजी खूप गप्पा मारते आणि मला गोष्टी सांगते. कधीकधी मला गोष्टी सांगायला लावते. मी सांगतो गोष्टी आणि जेव्हा मी चुकतो तेव्हा आजी माझी गोष्ट बरोबर करून सांगते . काही गोष्टी आजीला माहीत नसतात मग आजी शांतपणे ऐकून घेते. आजी जेव्हा गोष्टी सांगते तेव्हा  माझं लक्ष आहे की नाही हे बघण्यासाठी अधून-मधून प्रश्न विचारते.

माझी आजी वर निबंध मराठी

          आजीला देवाच फार वेड आहे . संध्याकाळी आमच्या गावच्या मंदिरात हरिपाठ म्हणण्यासाठी आजी न चुकता जाते. आजीला बरेच अभंग आणि हरिपाठ तोंडपाठ आहेत. आजीने मला बरेचसे श्लोक शिकवले आहेत .त्याचा फायदा मला निबंध लिहिताना होतो . आजीने शिकलेला एक श्लोक मी तुम्हाला सांगतो   .        

          "   यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत  

         अभ्युथानम्   अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम 

             परित्राणाय साधुनाम संभवामी युगे युगे  "

    आजीचे वय सुमारे 80 वर्ष आहे. तरीही आजीचा चेहरा अगदी प्रसन्न दिसतो आणि आजीच्या आरोग्यही अगदी उत्तम आहे . आजीला आजारी पडलेले मी कधीही पाहिलेले नाही . आजी फिरून आल्यावर मी कधीतरी आजीचे पाय मात्र चेपून देतो . आजीची सेवा करण्यात मला खूप आनंद मिळतो. अशी छान आजी मला प्रत्येक जन्मात मिळावी अशीच मी देवाला प्रार्थना करतो .

             धन्यवाद

  



            माझी आजी निबंध दोन

माझी आजी वर मराठी निबंध



                          माझी आजी

        माझ्या आजीचे नाव सरस्वती आहे .  आजी अगदी नावा सारखीच आहे साधी सरळ हसरी आणि प्रसन्न चेहऱ्याची . आजी सतत वाचन करत असते . आणि फारसं काही बोलत नाही परंतु माझ्यावर जीवापाड प्रेम करते . सतत मला प्रेमाने जवळ घेते माझी काळजी घेते .आजी जवळ असताना मला आईचीही आठवण येत नाही इतकी प्रेमळ आहे माझी आजी.

           आजीला नवनवीन गाणी गोष्टी ऐकायला ही खूप आवडते . आजी म्हणते ,"आत्ताच्या काळातले संगीत चांगले आहे ,पण आता ची गाणी फार का लक्षात राहत नाहीत .आमच्या काळातली गाणी आजही ओठांवर अगदी नृत्य करतात .संगीताचा आनंद घेणे म्हणजे जुन्या गाण्यांचा आस्वाद घेणे होय ;पण आजी म्हणते जुन ते सोन आहे तसेच नवीन ते काळाची गरज आहे .त्यामुळे जुन जतन करताना नवीनही शिकून घेतलं पाहिजे .जो काळाच्या बरोबर चालणार नाही त्याचा विकास कधीही होणार नाही.

आजी म्हणजे घराचा आधार मराठी निबंध

          आजी मला राम-कृष्ण-भिमाच्या गोष्टी सांगते. तसेच शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगते. अभिमन्यू ची गोष्ट सांगताना तर आजी फारच भावनिक होऊन जाते .कर्ण हे आजीच महाभारतातील फार आवडतं पात्र. मला आजी कधीकधी म्हणते "कर्णसारखा तेजस्वी आणि दानशूर हो".

          आजी दररोज संध्याकाळी मला घेऊन फिरायला जाते. आम्ही कृष्णाच्या मंदिरात जातो. आम्ही सोबत दुधाने भरलेला पेला घेऊन जातो. तिथे आजी एक छान हिंदी भजन म्हणते.

     "दूध पियो मोरे गोविंदा लाला

     दूध पियो मोरे गोपाल लाला"

  यानंतर दुधाचा प्रसाद सर्व लोकांना  वाटतो. सर्वांना प्रसाद वाटून पेल्यात जे दूध उरते त्याचा मालक मी असतो. हा आमचा जीवन क्रम असाच चालत राहो, आणि माझ्या आजीला उदंड आयुष्य लाभो . हेच श्रीकृष्णाच्या चरणी आणि मागणे मागतो.


  

माझी आजी निबंध क्रमांक तीन


        माझी आजी

  Nibandh in marathi majhi aaji


        आजीला भेटून मला बरेच दिवस झाले आहेत .पप्पा नोकरीला असल्यामुळे पप्पांची नेहमी बदली होत असते. त्यामुळे फक्त सुट्टीच्या दिवसांमध्येच मला आजीला भेटण्याची संधी मिळते. 

        माझ्या आजीचे नाव दुर्गादेवी आहे . आजीचे नाव तिच्या स्वभावाला अगदी शोभून दिसतं. आजीला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही . ती खेड्यात राहते आमच्या भाऊ बंदकी मध्ये आजीला सर्व लोक ताई नावाने हाक मारतात. सर्व लोक तिचा खूप आदर करतात आजी पण सर्वांना खूप प्रेमाने वागवते.

         आजीचे गुडघे खूप दुखतात म्हणून आजी सहसा घरातच असते.  इतरांसोबत आजी खूप खूप कडक वागत असली तरीदेखील माझ्याबरोबर मात्र  मेणासारखे वागते अगदी मऊ. आजी मला  छान शिरा बनवून देते. तिच्या हाताचा शिरा म्हणजे मेजवानीच .तेव्हा ती साक्षात अन्नपूर्ण असते. जेवणाच्या बाबतीत तिची नियम फार कडक आहेत. ताटात उष्टे टाकलेले तिला अजिबात आवडत नाही. त्यामुळे आम्हाला हवे तेवढे घेण्याची सवयच लागली आहे.

          आजी गौराई गाणे फारच छान म्हणते .गाणे म्हणताना आजीचे पाय आपोआपच गाण्याच्या तालावर नाचू लागतात . त्यावेळेस आजीला गुडघ्याचे दुखणे, अंग दुखणे यापैकी कोणत्याच दुखण्याचे भान राहत नाही .भान हरवून जाते. अशी माझी ही दुर्गा आजी मला खूप खूप आवडते. परमेश्वर तिला दीर्घायुष्य देवो.



माझी आजी निबंध क्रमांक 4


        माझी आजी


     माझी आजी म्हणजे जमदग्नीचा अवतार आहे. इतकी रागीट स्त्री मी आजपर्यंत कुठेही बघितली नाही. कधी कधी मला वाटते की जमदग्नी ऋषी ने बाई बनुन माझ्या आजीच्या रूपाने अवतार घेतला आहे.

       मी आता इयत्ता नववी मध्ये शिकतो. पण मला आठवते तेवढ्यात तरी आजीचे आणि माझे सूत जुळले असे कधीही झाले नाही. माझा नेहमी हसत राहण्याचा आणि इतरांची चेष्टा-मस्करी करण्याचा स्वभाव लहानपणापासूनच आजीला आवडत नसे.मग मीही ज्या गोष्टी आजीला आवडत नाही त्या जाणीवपूर्वक करत असे.

         माझा वर्ण गोरा असल्यामुळे आजी मला इंग्रज म्हणायची. आजी मला इंग्रज म्हटली कि , मी माझी खेळण्यातली बंदूक आणायचो आणि आजीला गोळ्या मारायचो. आजी म्हणायची या तुझ्या खेळण्यातल्या बंदुकीने मी मरणार नाही. आजीला चिडवण्यासाठी म्हणायचं  माझ्याकडे खरी बंदूक नाही,, नाहीतर.....पुढचं वाक्य पूर्ण होण्याअगोदरच आजी माझ्यामागे काठी घेऊन सुटायची.

        आता आजीचे गुडघे दुखतात आणि मीही थोडा मोठा झालो आहे त्यामुळे माझ्या स्वभावातही बदल झाला आहे. आता काही प्रमाणात आजीचे व माझे जमते. आजी मात्र मोठी कर्तबगार स्त्री आहे.

      माझी आजी एखाद्या पुरुषाला सारखी सर्व घर सांभाळते .आजही घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय आजी आणि आजोबा हेच घेतात.


      सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

कमेंट नक्की करा

                कृपया  ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल ,  आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .

               खूप खूप धन्यवाद.


आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा.आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने