घड्याळाचे मनोगत घड्याळाचे आत्मवृत्त किंवा मी घड्याळ बोलते आहे.
"अरे !!चल उठ ,शाळेत नाही जायचं का ? आवर उशीर झालेला आहे." असे शब्द कानावर आले आणि नाराजच का होईना पण अंथरुणातून बाहेर पडलो . तितक्यात आठवले अरे आज तर आई घरात नाहीये. आई सकाळीच मावशीकडे गेली आहे. मग मला कोणी उठवलं ? मला आवाज कोणी दिला ? ह्या विचाराने भीतीने पाय धरले थरथरले. मी इकडे तिकडे बघू लागलो . हसण्याचा आवाज आला. आवाज ऐकून तर मग माझं राहिलेलं अवसान गळून पडलं . आता मात्र मी घरातून धूम ठोकणारच होतो , इतक्यात आवाज आला "अरे थांब ,घाबरू नको मी बोलते." पुन्हा पुन्हा आवाज येत होता ; म्हणून मनात म्हटलं आता बघूयाच कोण बोलत आहे ते .
मनात धाडस बांधत पुढे सरकू लागलो , पण एवढ्या एका मिनिटात 33 कोटी देवांची नावे पटापटा म्हणून टाकले . कशाला आपोआपच निघाले असं म्हणा . मग विनवणीच्या सुरात आवाज आला " अरे विजय, इकडे तिकडे बघु नको . मी घड्याळ बोलते आहे बाबा, तुझीच घड्याळ !तुमच्या घरातले तुझ्या रोजच्या परिचयाची" हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमिनच सरकल्यासारखं झालं; पण आता ठरवलं होतं ना होऊन जाऊदे काय व्हायचं ते. मग बसलो शांत.
आता मात्र मन शांत झालं होतं आणि घड्याळ पुन्हा माझ्याशी बोलू लागला "अरे आज आई गावाला गेली आहे म्हणून मी तुला उठवलं. शाळेत जायची वेळ झाली होती ना!. पण तू तर आपला घाबरतच पळत सुटला . त्यात काय एवढं." मग मी म्हटलं "तुला काय कळतं, अचानक कुठून पण आवाज आला तर कोणीही घाबरेल."
" बरं ठीक आहे बाबा , चुकलंच माझं तुला असा अचानक आवाज द्यायला नको होता . पण तुझं ऊठणपण गरजेचं होतं ना, चल आता गप्पांमध्ये वेळ वाया घालवू नकोस . सर्व तयारी तुलाच करायची आहे आज . पहिले पटकन ब्रश करून घे आणि ब्रश करून झाल्यानंतर चटकन आंघोळ कर." मी घड्याळाला म्हटलं ,"अरे वा तू तर माझी आईच झालास , आई पण असंच सांगते." घड्याळ म्हटलं अरे बाबा आई दररोज सकाळी उठल्यावर माझंच तर तोंड बघून कामाला सुरुवात करते. आज आई नाही तर तिचं थोडाफार काम मी केलं तर काय बिघडलं , तू पण करतोच ना आईला कामात मदत. तशीच मीही करतो आज. चल आता गप्पा पुरे झाल्या आवर बघू . मी पटकन ब्रश करून आंघोळ करून घेतली व आई गावाला जाण्याअगोदर बनवून गेलेली आमटी आणि चपाती छान पैकी खाल्ली .
थोड्या वेळापूर्वीच ज्या घड्याळाचा आवाज ऐकून माझी घाबरगुंडी उडाली होती तेच घड्याळ आता माझा चांगला मित्र झालं होतं. घड्याळ मला म्हटलं भरलं का पोट ? चला बॅग उचला आणि शाळेचा रस्ता धरा , मी घड्याळाला म्हटले मला लवकर उठवल्या बद्दल धन्यवाद मी आता शाळेत जातो संध्याकाळी मात्र आपण खूप गप्पा मारू मी तुुुला आमच्या शाळेतल्या गमती जमती सांगेल घड्याळ म्हटले नक्कीच मलाही गमतीजमती ऐकायला खूप आवडतं ; आणि मलाही आता तुझ्या सारखा चांगला मित्र गप्पा मारण्यासाठी भेटलेला आहे . मी संध्याकाळपर्यंत तुझी आतुरतेने वाट पाहत राहील ,बाय " असं म्हणून मी शाळेत गेलो दिवसभर माझ्या मनात फक्त घड्याळ विषयी विचार येत होते . घड्याळ माझ्याशी गप्पा मारण्यासाठी किती व्याकुळ झाला असेल माझ्यासारखं . म्हणून संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर बरोबर मी पळतच घराकडे निघालो. घरी आलो तर दार उघडे दिसले. बघितले तर आई आलेली होती. मी मात्र आई बरोबर न बोलताच तसाच माझ्या खोलीमध्ये गेलो आणि घड्याळाशी गप्पा मारू लागलो ; पण घड्याळ मात्र अजिबात बोलत नव्हते . फक्त त्याची टिक टिक ऐकू येत होती. खूप प्रयत्न करूनही घड्याळ बोलत नव्हते . म्हणून मी थोडा हिरमुसलो आणि न जेवताच झोपी गेलो; पण स्वप्नात घड्याळ आले आणि मला म्हटले आता जेव्हा तुझ्याबरोबर गप्पा मारायला आणि खेळायला कुणी नसेल तेव्हाच मी तुझ्याशी बोलेन.
त्या दिवसापासून मी आणि आमचे घड्याळ घरात कोणी नसले की भरपूर गप्पा मारतो आणि आमच्या दोघांचा वेळ कसा जातो हेच आम्हाला कळत नाही. माझा दोस्त मला खूप आवडतो.
Can
उत्तर द्याहटवाछान छान
खूप छान आहे
हटवाDhanyvad
हटवाDhanyawad
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.