प्रिय मित्रांनो परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या निबंधाच्या विषयांमधील हा एक महत्त्वाचा विषय आहे.
मित्रांनो, आपण या विषयावर याठिकाणी दोन निबंध बघणार आहोत.
💐💐 मी वृक्ष बोलतोय💐💐
mi vruksh boltoy Marathi nibandh
लेखक- आदेश साळवे.
mi vruksh boltoy Marathi nibandh , मी वृक्ष बोलतोय. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करत आहे . आजच्या आधुनिक युगात तुम्ही सर्व मला विसरले आहात . मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
mi vruksh boltoy Marathi nibandh |
मी तुम्हाला छाया देतो, फळ देतो, फुले देतो ,जीवनावश्यक वस्तूही देतो . माझ्या अंगाखांद्यावर पशुपक्षी खेळतात . किती पक्षी आपली घरटी ही माझ्या फांद्यांवर मांडतात ;पण तुम्ही लोक ते घरटे तोडून टाकतात. त्याचा मला खूप राग येतो . मी पण एक वृक्ष आहे. मला एका दहा वर्षाच्या मुलाने लावले आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्याने माझी खूप काळजी घेतली आहे. त्यामुळे मी आज एवढा मोठा वृक्ष बनू शकलो आहे .
****धन्यवाद*****
निबंध लेखन
आदेश संदीप साळवे .
इयत्ता 6 वी
ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले
प्राथमिक व माध्यमिक विद्यालय
ताहाराबाद ता:सटाणा जि:नाशिक
++++++++++++++++++++++++++++++++
मी वृक्ष बोलतो मराठी निबंध क्रमांक 2
mi vruksh boltoy Marathi nibandh
सर्व मित्रांना माझा नमस्कार. मी तुमचा जन्माचा सवंगडी वृक्ष बोलतो आहे. आता तुम्ही म्हणणार जन्माचा सवंगडी कसा? बघा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला पाळण्यात टाकतात. तो पाळणा लाकडाचा बनवलेला असतो. आणि मनुष्य मेल्यानंतर त्याला ज्या सरणावर ठेवून जाळतात ते लाकडापासूनच बनवलेले असते. म्हणून तर मी तुमच्या संपूर्ण जन्माचा सवंगडी आहे.
घरे बांधण्यासाठी माझ्या लाकडांचा उपयोग केला जातो. तुमची भूक भागवण्यासाठी गोड गोड फळे आम्हीच तर देतो. रखरखत्या ग्रीष्माच्या उन्हामध्ये पळून निघाल्यानंतर शांत थंडगार सावली तुम्हाला देताना मला खूपच आनंद होतो.
माझ्या सावलीत बसून तुमच्या सुखदुःखाचे सर्व गाऱ्हाणे मी शांततेने ऐकले आहे. तुमच्या अनेक पिढ्या माझ्या सावलीमध्ये विश्रांती घेऊन काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. तुमचा फार मोठा इतिहास मी माझ्या खोल हृदयाच्या कप्प्यात दडवून ठेवलेला आहे.
हळूहळू लोकसंख्या वाढत चालली तशी लोकांच्या राहण्यासाठी जागा कमी पडू लागली. मग जागा मिळवण्यासाठी लोकांनी फार मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. वृक्षांची निर्दय पणे कत्तल करण्यात आली. आम्ही शांतपणे हा सर्व तमाशा बघतो आहोत. आता मात्र पर्यावरणाचा समतोल बिघडू लागलेला आहे.त्यामुळे अनेक संकटे देखील संपूर्ण मानवजातीवर ओढवली. मग जाग आलेला माणूस वृक्ष लावा वृक्ष जगवा अशा घोषणा देऊ लागलेला आहे.
आमचा जन्मच मुळी जगाच्या कल्याणासाठी झालेला आहे. आमच्या शरीराचा प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या कामासाठी उपयोगास येतो. आमचीही जगण्याची खूप इच्छा असते, पण प्रत्येकाला आपल्या इच्छा पूर्ण होण्याचे सुख प्राप्त होतेच असे नाही. जीवनाची ही फार मोठी शोकांतिका आहे.
हल्ली मात्र काही पर्यावरण प्रेमी लोकांमध्ये वृक्षांविषयी जागरूकता निर्माण करत आहेत .हे बघून खूप आनंद वाटतो. घराच्या आजूबाजूला शोभा निर्माण करण्यासाठीही काही फुलझाडे लावली जातात. तुळशी सारख्या छान छान व उपयुक्त वृक्षाची लागवड दारोदारी झालेली दिसते. मनुष्य आमच्याशी कसाही वागला तरी देखील आम्ही आमचा इतरांना उपयोगास येण्याचा गुणधर्म कधीही सोडणार नाही.
सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.
खाली दिलेले निबंध वाचायला अजिबात विसरू नका
- माझी अभयारण्यास भेट.
- चहा बोलू लागला तर. किंवा मी चहा बोलतो आहे. किंवा चहा चे मनोगत.chaha
- ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे
- शिक्षक दिन ,varnanatmak nibandh
कृपया ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल , आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .
खूप खूप धन्यवाद
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.
Thank you so much for eassy
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.