शिक्षक दिन निबंध
(Teachers day information in Marathi)
Teachers day information in Marathi,मला तर वाटतं शाळांमध्ये जे राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये शिक्षक दिनाचा ही समावेश केला गेला पाहिजे . कारण या दिवशी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे आनंद घेण्याची छान संधी मिळते. शिक्षक दिन हा भारतातील एक थोर विद्वान व आदर्श शिक्षक असणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या वेळी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना जबाबदारी वाटून देतात .काही विद्यार्थी शिक्षक होतात , कोणी शिपाई होते तर राहिलेले विद्यार्थी नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांची भूमिका पार पडतात. वरच्या वर्गांमधील मुले खालच्या वर्गातील मुलांना अध्यापनाचे काम करतात .
शिक्षक दिन |
कोणता घटक शिकवायचा याचे नियोजन आदल्या दिवशीच सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात . मग या विद्यार्थी शिक्षकांनी नियोजनाप्रमाणे ठरलेल्या इयत्तांच्या वर्गाचा तो घटक त्या विद्यार्थ्यांना समजावून देण्याचे काम करायचे म्हणजेच अध्यापन करायचे.
सर्व मुलांना अतिशय शांत ठेवून एखाद्या विषयाचा घटक विद्यार्थ्यांना शिकवताना किती अडचणी येतात हे त्यावेळी आम्हाला कळते . आमची चांगलीच घाबरगुंडी उडून जाते . त्यावेळेस मला हिंदीतील एक वाक्य आठवते बच्चो को सिखाना कोई बच्चो का खेल नहीं
प्रत्येक जण आपली कामे फारच गंभीरपणे व मनापासून करत असतात . प्रत्येकाचा रंग वेगळा असतो .त्यादिवशी शाळेतल्या बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आपण वेगळे दिसावेत यासाठी छान पोशाख करून हे सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेत येतात . या सर्वांमध्ये सर्वात जास्त मज्जा वाटते ती म्हणजे शिपाई बनलेल्या मुलाला . रोजच्या घंटेच्या आवाजापेक्षा शिक्षक दिनाच्या दिवशी वाजणारी घंटा फारच मोठ्याने वाजते कारण फारच तरुण शिपाई असतो ना!!
विद्यार्थी शिक्षक अध्यापनाचे काम करण्यासाठी फार तयारी करून आलेले दिसतात . शिकवताना ते त्यांच्या आवडत्या शिक्षकांची अनुकरण करताना दिसतात. आपले अनुकरण आपले विद्यार्थी करतात हे बघ बघून शिक्षकांनाही फार मजा वाटते .असेच एकापाठोपाठ नियोजनाप्रमाणे सर्व तास होतात .
आजच्या दिवशी शाळा मात्र इतर दिवसांपेक्षा लवकर सुटते . पण नियोजनाप्रमाणे तासिका झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एका ठिकाणी शाळेच्या सभागृहात किंवा मोकळ्या मैदानात जमतात . मग सुरू होतो अनुभव सांगण्याचा कार्यक्रम .विद्यार्थी फार छान पद्धतीने स्वतःचे अनुभव सांगतात .शिकवताना आलेल्या अडचणी कोणत्या , त्यांच्या मनाची अवस्था कशी झाली . शिक्षकांविषयी कोणते विचार आले . अशा अनेक विषयांवर अगदी मनमोकळेपणाने बोलतात .ज्या मुलांनी योग्य रीतीने शिक्षक दिनाच्या उपक्रमांमध्ये चांगली कामगिरी बजावलेली असते त्यांच्यातूनच एकाची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली जाते. त्याला बक्षीसही देऊन गौरव करण्यात येतो . त्यावेळी तो पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळाच असतो. संपूर्ण भारतात ही या दिवशी अनेक आदर्श शिक्षकांना आपल्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार दिले जातात व त्यांचा सत्कार केला जातो.
शिक्षक आपल्या गावासाठी राज्यासाठी देशासाठी उत्तम नागरिक घडवण्याचे महान कार्य करतात या कार्याचा गौरव व त्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे ;आणि त्यासाठीच हे पुरस्कार वितरण केले जाते .
नंतर सर्वजण उभे राहून
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः
या श्लोकाचे पठण पाच वेळा मोठ्या आवाजात करतात .तशी आपल्या देशांमध्ये पूर्वीपासूनच आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. त्यासाठी आपल्या कॅलेंडरमध्ये गुरुपौर्णिमा या स्वतंत्र तिथीची योजनाही केलेली आहे . हीच आपली भारतीय संस्कृती व परंपरा आहे .ती आपण अशी जतन करूया . मला सरतेशेवटी असे म्हणावे वाटते की
।। गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा ।।
List of teachers day
Why Teachers day is being celebrated?
What is the real teachers day date?
Is March 7th Teachers day?
Why is 5th September celebrated as teachers day?
When is Teachers day in India?
Teachers day Philippines?
Origin of teachers day?
Teachers day SA
सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.
कृपया ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल , आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .
खूप खूप धन्यवाद
आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.
khupchhan
उत्तर द्याहटवाछान निबंध
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.