1001marathiessay.blogspot.com
पंडित नेहरू यांनाच चाचा नेहरू असेही म्हणतात .माननीय पंडित नेहरू यांना लहान मुलांविषयी खूपच आकर्षण होते.ते आपल्या कोटावर नेहमीच गुलाबाचे फुल लावत असत . मुलांमध्ये रमणे, त्यांच्याशी खेळणे हा त्यांचा अगदी आवडीचा विषय होता .त्यांनी सर्व लहान मुलांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे.
नक्की वाचा.
प्रिय मुलांनो,
मला लहान मुलात मिसळणे त्यांच्याशी बोलणे त्यांच्याशी खेळणे फार आवडते एक क्षणभर मी वयोवृद्ध असल्याचे विसरतो
तुम्ही जर माझ्या समोर असता तर मी तुमच्याशी या आपल्या सुंदर जगाबद्दल फुलांबद्दल झाडांबद्दल पक्षी जनावरे तारे पर्वत हिमनद्या आणि अशाच जगातील कित्येक गमतीच्या गोष्टी बद्दल बोललो असतो आपल्या सभोवताली हे निसर्गसौंदर्य पसरले आहे आणि तरीसुद्धा आम्ही मोठी माणसे ते विसरतो आणि आपापल्या व्यवसायात गुरफटून बसतो स्वतः फार मोठे काम करतो असे समजतो.
मला वाटते तुम्ही आपल्या स्वतःच्या सौंदर्याकडे आणि जीवनाकडे कान व डोळे उघडे ठेवून पहावे तुम्ही वासावरून फुले ओळखू शकता काय गाण्यावरून पक्षी ओळखता काय त्यांच्याशी किंबहूना निसर्गातील सर्वांशीच जर तुम्ही प्रेमाने वागलात तर त्यांची मैत्री करणे किती सोपे आहे तुम्ही परी कथा आणि गोष्टी वाचल्या असतील पण जग म्हणजेच एक परिकथा आहे फक्त आपणाला ती पाहण्यास डोळे हवे ऐकण्यास कान हवे आणि जीवन व सौंदर्य अनुभवण्यास मन हवे
पंडित नेहरू
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.