1001marathiessay.blogspot.com


       प्रिय विद्यार्थी मित्रांनो याठिकाणी हा निबंध वाचा .या निबंधाच्या लिखाणामध्ये खालील प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश करून तुम्ही स्वतः ही निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा .

  1. महत्त्वाचे मुद्दे :
  2.  समाजाचे आपल्यावर असलेले ऋण
  3.  या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्रमदान 
  4. समाधान 
  5. एक संधी
  6.  शाळेतील शिकवण 
  7. आदिवासी मुलांच्या पाड्यावर शाळेची इमारत बांधण्याचे काम
  8.  कामातल्या चुका
  9.  शारीरिक मर्यादा
  10.  शेकोटी नृत्य 
  11. आदिवासी चालीरीती परंपरा
  12.  भूक
  13.  भुकेमुळे जेवणातील आवडीनिवडी विसरणे 
  14. शिक्षकांचे मार्गदर्शक बोल

                           आमचे श्रमदान मराठी निबंध  

                     aamche shramdan marathi essay

       
                 माझी आई मला सतत सांगते ," आपल्या ज्ञानाचा ,आपल्या शक्तीचा आपल्या समाजासाठी उपयोग झालाच पाहिजे .समाज म्हणजे विशिष्ट जाती धर्माचा नव्हे; तर संपूर्ण मानव समाज. या कार्यासाठीच आपण पृथ्वीतलावर आलो आहोत ." असे माझी आई नेहमीच म्हणते
             माझ्या शाळेतही आमचे गुरुजी आम्हा मुलांना नेहमी सांगायचे की," आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण प्रत्येक जण काहीतरी देणे लागतो; आणि आपण आपल्या परीने कोणत्याही रूपाने या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे." आमच्या शाळेत असलेल्या  एनसीसी, एमसीसी, स्काऊट गाईड यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या जातात.
           आम्हाला बघून ते आदिवासी मुले खूपच आनंदी झाले होते. ते आमच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होते.खेळत होते .त्यातील काहींनी आम्हाला रात्री शेकोटी पेटवली त्यावेळेस गाणे हे गाऊन दाखवली . आम्ही त्यांच्या मागे गाणी म्हणण्याचा प्रयत्न करत होतो . शेकोटीभोवती नाचत होतो .जे शेकोटी नृत्य आम्ही केवळ चित्रपटांमध्ये पाहिले होते ते नृत्य आम्ही आज स्वतः नाचत होतो .आणि त्याचा आनंद घेत होतो .
""""""""""""""""""""""""""""

              आमच्या शाळेतल्या बालवीर संघटनेमध्ये मी आहे. या संघटनेमध्ये नेहमी असे शिकवले जाते की, प्रत्येक बालवीराने दररोज एक तरी सत्कृत्य केलेच पाहिजे .त्यामुळे दिवसभरातून कोणते तरी सत्कृत्य करण्यावर माझा भर असतोच; आणि शाळेमध्ये सोशल सायन्स याअंतर्गत समाजसेवा या विषयामधूनही याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे . त्यामुळे माझ्या मनात नेहमी येते की आपण याबाबत काही करू शकतो का?  आणि म्हणतात ना आपण जसे मनात विचार करतो तसेच परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण होते. 

            माझ्या इच्छेप्रमाणे तशी एक संधी चालून आली आमच्या गावापासून जवळच एक आदिवासी पाडा आहे .गावातील लोकांची  परिस्थिती गरिबीची आहे. गावात चांगली शाळाही नव्हती. एका सामाजिक संस्थेने त्या गावांमध्ये शाळा चालू ठेवलेली आहे. संस्थेने स्वतःच्या पैशांनी शाळेसाठी एक इमारत बांधली आहे. आमच्या गावातील काही दानशूर व समाजाचं आणि समाज हिताचे भान असलेले लोक या बांधकामाच्या कामात मदत करत असतात. मी आमच्या शाळेतील आमच्या वर्ग शिक्षकांना शाळेच्या मार्फत काहीतरी मदत करता येईल का? याबाबतीत विचारले. त्यावेळी आमच्या गुरुजींनीही त्या शाळेच्या बांधकामात मदत करण्यासाठी दोन दिवस जाण्याची जबाबदारी स्वीकारली .                                 

            मुख्याध्यापकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या ऑफिसात संपर्क करून शंभर  विद्यार्थ्यांसाठी व काही शिक्षकांसाठी बसची व्यवस्था करण्याची विनंती केली. महामंडळाच्या अधिकार्‍यांनीही आम्हाला लगेच मदतीचा हात दिला. म्हणतात ना "मनापासून एखादी गोष्ट करत असताना मदतीचा ओघ आपोआप मिळतो."

         शुक्रवारी आम्ही बस मध्ये बसून त्या वस्तीवर पोहोचलो. दोन तासांचा प्रवास करून थोडे दमलो; परंतु ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर आमचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला. तिथे शाळेच्या बांधकामचे काम चालू होते. काही गवंडी कामात व्यस्त होते .जागेवर पोचल्यावर शिक्षकांनी  विद्यार्थ्यांचे गट करून कामांची वाटणी करून दिली . कोणी विटा वाहण्याचे काम केले ,कोणी वाळू वाहण्याचे ,काम केले ,कोणी विटा भिजवणेव  कामाच्या जागेवर देणे ,रिकामे झालेले घमेली परत आणणे आणि ती भरून पुन्हा कामगारांना पोहोचवणे .सिमेंट -रेती यांचे मिश्रण करून कारागिरांना देणे. असे अनेक काम आम्हाला वाटून दिले. 

                     काम करत असताना आम्ही थकलो . कारण आम्हाला एवढ्या कष्टाचे काम करण्याची सवय नव्हती. त्यामुळे काम करत असताना काही जणांच्या हातातून विटा पडल्या त्या फुटल्या .घमेले  पडले. परंतु शिक्षकांनी आम्हाला न रागवता सावधानतेने काम करण्याचे सांगितले. त्यातील गवंडी कामांमध्ये हे अत्यंत हुशार व पटाईत दिसत होते. कामगारांचे भिंत बांधण्याचे ओळांबा लावण्याचे  कसब बघून आम्ही तसे लावण्याचा प्रयत्न केला. काहींना थोडेफार जमले. काहींना फक्त थोडा अनुभव मिळाला. हे कामगार मात्र या कामांमध्ये खूप निष्णात होते. त्यावेळी आम्हाला आमच्या सरांनी शिकवलेला एका दोह्यातील ओळी आठवल्या त्या म्हणजे ,

                          "जेणू काम तेनु थाय | बिजा करे सो गोता खाये ||            

    अंगमेहनतीची खूप कामे केल्यामुळे पोटात कावळे ओरडायला लागले होते. झुणका भाकरी चा मस्त बेत केलेला होता .कष्टाच्या कामानंतर आणि भुकेच्या सपाटा यामध्ये झुणका भाकरी वर आम्ही चांगलाच ताव मारला.

           या आनंदातच रात्री कधी झोप लागली कळलेच नाही. रात्री आनंदाच्या भरात जी झोप लागली तशी झोप इतक्या वर्षांमध्ये आम्ही अनुभवलेली नव्हती. दुसऱ्या दिवशीही भरपूर कष्टाची कामे करून संध्याकाळी परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो.                                     महामंडळाच्या बसेस आलेल्या होत्याच. निरोप घेताना त्या शाळेतील मुलांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या होत्या. त्यांच्यातील एवढा प्रेमळपणा बघून आमच्याही पापण्या कधी ओल्या झाल्या आम्हालाच कळले नाही. निघताना आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितले," प्रिय मुलांना गेले दोन दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वेळ या चांगल्या कामासाठी खर्च केला ,असाच चांगल्या कामांसाठी व समाजासाठी ,श्रमदानासाठी आपल्या जीवनातील वेळ खर्च करा म्हणजे तुम्ही देशाला प्रगतीपथावर न्याल  . या देशाचे उत्तम नागरिक व्हाल ." गुरुजींचा हा संदेश आम्ही मनाच्या कागदावर खोल ठसवून घेतला. आणि मुलांचा निरोप घेऊन निघालो. परतीच्या प्रवासात दोन दिवसांच्या आठवणी सतत मनात घोळत होत्या .

               घरी आल्यावर घरातल्यांना आम्ही त्या सांगितल्या. आमच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून आमच्या घरातली खूप आनंदी झाले. खरोखरच आम्ही केलेल्या श्रमदानाचे  ते दोन दिवस आजन्म आमच्या लक्षात राहतील. त्यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांचे व आमच्या शाळेचे आम्ही सदैव ऋणी आहोत.



निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीही असा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने