माझे आजोबा
जसा एखाद्या झाडाचं फळ सुरुवातीला आंबट कडू असते परंतु जसे ते फळ पिकत जाते तसे गोड होत जाते अगदी तसेच घरांमधील आजी-आजोबा आपल्या नातवाने बरोबर वागत असतात आजी-आजोबांना नातवामध्ये आपल्या
मुला- मुलींचे बालपण आठवत असते.
माझ्या आजोबांचे नाव अर्जुन होते. ते गेल्या वर्षीच देवाघरी गेले परंतु माझ्या मनातून आजोबा कधीही जाऊ शकणार नाही . आजोबांनी मला विविध प्रकारच्या गोष्टी शिकवल्या; त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायकल चालवणे. मला आजोबांनीच सायकल घेऊन दिली होती व शिकवली ही त्यांनीच.
महाभारत मालिका दूरदर्शन वर जेव्हा लागते त्या वेळी त्यात अर्जुनाचा उल्लेख नक्की होतो ; लगेच मला माझ्या आजोबांची आठवण येते .अर्जुन जसा अचूक लक्ष्यवेध करायचा तसंच माझ्या आजोबांनी मला गुलेल यांच्या सहाय्याने अचूक नेम लावायला शिकवले होते. मे महिन्यात जेव्हा घरात आंब्याच्या रसाचे जेवण केले जाते त्यावेळी आमच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली आजोबांबरोबर घालवलेले ते आनंदाचे क्षण मला आनंदित करून जातात; पण लगेच ते आनंदाचे क्षण मला देणारे माझे आजोबा आता नाहीत या विचाराने माझ्या डोळ्यांचे काठ ओले होतात. हृदयामध्ये आजोबांच्या विचारांचे थैमान चालू होते .तेव्हा लगेच आजोबांची शिकवण आठवते ,"माणसाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे". खरोखर माझ्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आई-वडिलां पेक्षा आजोबांचा सिंहाचा वाटा आहे.
आजोबा वारले तेव्हा त्यांचे वय 75 वर्षे होते .या वयात देखील आजोबा कधी कुणाकडे पाण्याचा ग्लास भरून मागत नसत .ते स्वतः माठा जवळ जाऊन पाणी घेत असत. आजोबा सतत म्हणायचे "जोपर्यंत आपले हात पाय चालतात तोपर्यंत स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करावा. इतरांवर अवलंबून राहणे म्हणजे देवाचा अपमान आहे." आजोबांची हे बोलणे अजन्म माझ्या कानांमध्ये गुणगुणत राहणार व मला स्वावलंबनाचा धडा शिकवत राहणार.
आजोबांनी असेच मूल्यवान संस्कार माझे वडील व माझ्या काकानाही दिले ;त्यामुळे आजपर्यंत मी या भावांमध्ये कधीही भांडण झालेले बघितले नाही. माझे वडील वयाने सर्वात मोठे आहेत . आजोबांनी वडिलांना सांगितले होते की ,"माझ्यानंतर माझी जागा घेणारा तूच आहेस. तेव्हा तूझ्या या लहान भावंडांना अंतर देऊ नकोस .त्यांची नेहमी माझ्यासारखे काळजी घे व योग्य तेथे त्यांना मार्गदर्शन करत रहा.
आज जरी आजोबा आमच्यामध्ये नसले तरीदेखील त्यांच्या आठवणी आणि त्यांचे संस्कार सदैव आमच्या सोबत आहेत व जीवनाच्या या मार्गावर आजोबा संस्कारांच्या रूपाने सदैव आम्हाला मार्गदर्शन करत राहतील. आमच्या हृदयातून आजोबा कधीही जाणार नाही.
................. निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व अधिकाधिक शेअर करा.
धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.