1001marathiessay.blogspot.com
मित्रांनो निबंध लेखन ही एक कला आहे . ही कला जतन करावे लागते .विविध निबंधांचा लेखनाचा सराव करून निबंध लेखनाची कला नक्कीच वृद्धिंगत करता येते; त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करणे, ती परिस्थिती समजून घेणे व शब्दांमध्ये परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणे . या गोष्टी आत्मसात करावे लागतील म्हणून आजूबाजूच्या परिस्थितीकडे डोळसपणे बघा. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. समोर दिसणाऱ्या समस्यांवर स्वतःच्या मनाने एखादा उपाय सुचवण्याचा प्रयत्न करा.
आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत हा मराठी निबंध बघणार आहोत.
हा निबंध लिहिताना तुम्ही खालील मुद्यांचा विचार करू शकता. खाली दिलेला निबंध तर वाचाच परंतु या मुद्द्यांच्या आधारे तुमच्या मनाने निबंध लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा.
निबंधासाठी मुद्दे-- शेतकऱ्यांची सध्याची बिकट परिस्थिती
- कोरडा किंवा ओला दुष्काळ म्हणजेच अवर्षणाची सतत वाटणारी चिंता
- भारत कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन
- शासनाच्या विविध योजना
- शेतकऱ्यांच्या समस्या
- शेतमाल शेतमालाला नसलेला भाव
- बाजारपेठांमधील अनागोंदी कारभार
- शेतकरी सुखी राहिला तरच देश सुखी राहील
इत्यादी मुद्द्यांचा आपल्याला या निबंधांमध्ये समावेश करता येईल.
एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Shetakari manogat marathi essay.
नमस्कार मित्रांनो, मी आहे एक शेतकरी .माझ्या गावाचं नाव पिंपळनेर आहे . महाराष्ट्रामधील खानदेशात वसलेलं एक छोटसं गाव. या गावात माझी थोडीशी जमीन आहे . जमीन खूप सुपीक नाही परंतु अगदी नापीकही नाही .जमिनीच्या या छोट्या तुकड्या वरच आजवरच्या आमच्या अनेक पिढ्या वाढल्या आणि पोसल्या गेल्यात.
जमीन थोडीशीच आहे पण बागायती नाही .या जमिनीवर माझं जिवापाड प्रेम आहे. या जमिनीला मी माझी आई समजतो ;पण नुसतं प्रेमानं काय होणार आहे? त्यात जर चांगलं पीक आलं तरच काहीतरी फायदा. नाहीतर केवळ आयुष्यामध्ये दुष्काळच .या जमिनीवर पिक अवलंबून असतं त्या लहरी राजा वर म्हणजेच आपल्या पावसावर. पाऊस आला आणि निसर्गाची कृपा झाली तरच या धरणीमातेकडून आम्हाला धान्याचं भरपूर दान मिळतं. त्याबद्दल आम्ही अजन्म या धरणी मातेचे ऋणी आहोत.
पिंपळनेरच्या जवळच पांझरा नावाची एक मोठी नदी वाहत जाते .तिला पाणी भरपूर असतं. त्या पाण्यावर ही आमची शेती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे; पण नदीचे पाणीही शेवटी पावसावरच अवलंबून असत ना !बऱ्याचदा उन्हाळ्यात नदीचे पाणी खूपच कमी होऊन जाते; त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी मृग नक्षत्र आले की आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट बघतो . ह्या मेघराजा च्या आगमनाची आतुरतेने वाट बघत राहतो . त्याच्या आगमनापूर्वी सर्व शेत नांगरून ठेवायचे, काटे कुठे काढून ढेकळे फोडून पावसाची वाट बघत राहायचे .पावसाची वाट बघत असताना आम्हाला ऊन- वारा याचीही पर्वा नसते . उन्हामुळे सगळं अंग भाजून निघायचं पण हा वरुणराजा काही कृपादृष्टी टाकत नव्हता . अशावेळेस आमच्या घरातील बाया पाच -पाच मैलांवर जाऊन पिण्यासाठी पाणी आणतात . त्यांचे त्रास आम्हाला बघवत नाही पण निसर्गापुढे सर्वच हतबल आहेत.
माणूस स्वतःच्या समाधानासाठी असे म्हणतो की मानवाने निसर्गावर मात केली परंतु वेळोवेळी निसर्ग मानवाला त्याची जागा दाखवत असतो. हे दुःख गिळत असतानाच अचानक मध्येच कधीतरी सोसाट्याचा वारा सुटतो घोंगावणारा वारा दर्या-खोर्यातून घुमू लागतो .अंग गदगदून निघतं आणि पावसाचे टपोरे थेंब टप टप अंगावर बरसू लागतात. ग्रीष्माच्या उन्हाने पोळलेली धरणीमाता गारव्याने न्हाऊन निघते . कधीतरी गारा पडतात आणि गारांनी संपूर्ण अंगण भरून जातं. अशावेळी संपूर्ण गावातील लहान थोर माणसे म्हातारीकोतारी या पहिल्या पावसामध्ये न्हाऊन निघतात आणि शरीरासह मानवाचं मनदेखील पावसाच्या गारव्याने शांत होऊन जाते .
पहिला पाऊस पडल्यानंतर आता शेतीला लागायला हवं .पावसामुळे भिजलेल्या जमिनीमध्ये बियाणांची पेरणी करायला हवी . वरूण राजाने अशी कृपा केली की मग पेरलेल्या दाण्यामधुन छान रोपं तरारून येतात ;पण हे सगळं काही अवलंबून असतं पावसावर.
पाऊस पडल्यानंतर आहे त्या जागेमध्ये जेवढे येईल ते पिक जेवढे मिळतील तेवढे दाणे या सगळ्यां वरती येणारा पुढच पूर्ण वर्ष काढायचं. मग ते पिक पुरेसे असो अथवा नसो. हेच आमच्यासारख्या कोरडवाहू शेतकर्यांचं नशीब . पेरणी झाल्यानंतर पुढच्या सर्व कामांसाठी लागणारा खर्च करण्याची आमच्यासारख्या शेतकऱ्यांची पात्रता नसते. मग बरेच जण खाजगी सावकारांकडून कर्ज घेतात .या कर्जाच्या ओझ्याखाली दाबूनच बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही निदर्शनात आलेले आहे. पण आता शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचे मार्ग काहीसे सोपे झालेले आहेत . त्याचा फायदा नक्कीच होतो .मलाही यावर्षी त्या योजनांचा भरपूर फायदा मिळाला आहे.
शेतकरी अल्पभूधारक असो नाहीतर भरपूर जमीन असणारा असो ,तरीही शेतकऱ्याच्या नशीबातील बारमाही कष्ट काही बदलत नाही .बदलते फक्त त्या कष्टाचे प्रमाण .तरीही कोणताही शेतकरी कष्ट करायला कमी पडत नाही .शेतकऱ्यांच्या या कष्ट करण्याच्या वृत्तीमुळेच शेतकऱ्यांना उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात .मोठ्या कष्टाने व अडचणीतून पिकवलेले पिक ज्यावेळी कोणाच्यातरी मुखात जाते त्यावेळेस त्या विचारानेच शेतकरी सुखावून जातो. वर्षभर केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान त्यावेळेस मिळते.
परिस्थिती काहीही आणि कशीही असली तरीही आम्ही कष्ट करण्याचे सोडणार नाही. मलाही आता शेतात काम आहेत. तुमच्याशी बोलण्यात माझा बराच वेळ गेला;परंतु तुमच्याशी बोलून माझ्या मनातील सर्व भावना मी आता व्यक्त केल्यामुळे मला फार मोकळं आणि छान वाटतं आहे. माझं सगळं बोलणं इतक्या शांतपणे ऐकून घेतल्यामुळे मी तुमचा आभारी आहे . चला तर मग येतो मी आता शेतात भरपूर कामं पडलेली आहेत.
-------------------------------------
महत्वाचे
या निबंधालाच खालील नावे असू शकतात .
- अल्पभूधारक शेतकर्याचे मनोगत
- alpbhudharak shetkaryanche manogat
- मी शेतकरी बोलतो आहे
- mi shetkari bolto aahe
- शेतकऱ्याचे मनोगत
- शेतकर्याचे मनोगत
निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीही असा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा
- माझी अभयारण्यास भेट.
- चहा बोलू लागला तर. किंवा मी चहा बोलतो आहे. किंवा चहा चे मनोगत.chaha
- ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे
- शिक्षक दिन ,varnanatmak nibandh
- माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
- पंडित नेहरुंचे मुलास पत्र
- माझे गाव
- स्वामी विवेकानंद
- झाडे लावा झाडे जगवा
- मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat in marathi nibandh
- दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
- मी पाहिलेला अपघात
- माझी शाळा .
- महात्मा ज्योतिबा फुले
- माझा भाऊ
- आमचे वनभोजन
- माझे वडील मराठी निबंध
- मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
- मी पाहिलेला अपघात
- निसर्गाचे मनुष्यास पत्र
- माझे आवडते संत एकनाथ महाराज
- जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
- माझा बस प्रवास/maza bus pravas
- माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
- पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
- सुंदर मराठी सुविचार
- छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
- स्वामी दयानंद सरस्वती
- राजा राममोहन रॉय
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- रम्य पहाट
- दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/Diwali status Marathi
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
- कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
- व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
- पर्यावरणाचे महत्व.. environment
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या. Tips for personality development in Marathi.
- पैंजण
- भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
- मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- रम्य पहाट
- दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/Diwali status Marathi
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.