| स्वामी विवेकानंद
                             swami vivekanand in marathi nibandh|
                essay in marathi

swami vivekananda information  in marathi
swami vivekananda information  in marathi

स्वामी विवेकानंद  मराठी माहिती |swami vivekanand information  in marathi 
       

             swami vivekananda information  in marathi ,स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे झाला. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगामध्ये हिंदू धर्माच्या प्रसारासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या महान लोकांच्या यादीमध्ये स्वामी विवेकानंदांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

          स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ होते . त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते . त्या भगवान शिवाच्या निस्सिम भक्त होत्या. त्यांच्या पोटी हा लहानगा नरेंद्र जन्माला आला आणि तोच पुढे स्वामी विवेकानंद या नावाने प्रसिद्ध झाला .नरेंद्र लहानपणापासूनच खूप खोडकर होते .त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी रागाने कधीकधी म्हणत ,    'भगवान शंकराने माझ्या पोटी भुताला जन्म दिलेला आहे.'

       आपल्या मुलाने पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करावे. त्या पद्धतीनेच वागावे असे स्वामी विवेकानंदांच्या वडिलांना वाटत असे . विवेकानंदांना त्यांनी इंग्रजी भाषेचे  उच्च शिक्षण दिले. परंतु विवेकानंद हे पाश्चात्त्य संस्कृतीशी जुळवून घेऊ शकले नाही.
युवक दिन भाषण मराठी
Yuvak din bhashan in Marathi 



         स्वामी विवेकानंदांची बुद्धी अतिशय तीव्र होती.  त्यांच्या मनात सतत परमेश्वर प्राप्त करून घेण्याची इच्छा असे .त्यासाठी त्यांनी अनेक ज्ञानी पुरुषांना भेटून आपली इच्छा व्यक्त केली .ते  जिथे जातील तिथे सरळ असा प्रश्न विचारत," की तुम्ही देवाला पाहिले आहे का ?"त्यांच्या या प्रश्नाने अनेक लोक त्यांच्यापासून दूर जात. किंबहुना स्वामी विवेकानंद जोपर्यंत या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत अनेक ठिकाणी फिरत राहिले. प्रथम ते ब्रह्म समाजामध्ये गेले परंतु तेथे देखील त्यांचे समाधान झाले नाही; म्हणून त्यांनी तेथून काढता पाय घेतला .


marathi essay
swami vivekanand information  in marathi


                     भविष्यात रामकृष्ण परमहंस यांचे बरेच नाव ऐकल्यानंतर स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे गेले .रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वामी विवेकानंदांवर फार मोठा प्रभाव पडला . विवेकानंदांचे सर्व शंकांचे निरसन करून त्यांना अभूतपूर्व आनंदाची प्राप्ती झाली. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांनाच गुरु करून घेतले. गुरुदीक्षा घेतल्यानंतरच नरेंद्र चे नाव स्वामी विवेकानंद असे झाले.

                  मधल्या काळामध्ये स्वामी विवेकानंद यांचे वडील यांचे 1884 मध्ये निधन झाले व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गरीबीची परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत देखील स्वामी विवेकानंदांची परमेश्वरावर व गरिबांच्या सेवेवरची श्रद्धा कमी झाली नाही.

भारताच्या  अध्यात्मिक संपन्नतेचा सुगंध स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगभर पसरवला.

      विवेकानंदांनी आपले जीवन तर गुरूंच्या चरणी समर्पित करून भक्ती मार्ग स्वीकारलेला होता. व संन्यास पंथाची दीक्षा घेतली .पुढे त्यांनी रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना केली. आपले धर्मप्रसाराचे कार्य निरंतर चालू ठेवले. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतही रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा स्थापन केल्या .अमेरिकेतील लोकांनी विवेकानंदांचे शिष्यत्व मोठ्या प्रमाणात पत्करले. अध्यात्मिकता व संपूर्ण भारतीयतेचे दर्शन घेतल्याशिवाय मानवाला संपूर्ण आत्मिक समाधान लाभणार नाही यावर विवेकानंदांचा ठाम विश्वास होता.

                    हिंदू धर्माच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी हिंदुस्थानभर फिरून हिंदू धर्म सगळ्या धर्मात श्रेष्ठ कसा आहे हे विवेकपूर्ण भाषाशैलीत पटवून देण्याचे श्रेष्ठ काम स्वामी विवेकानंदांनी केले. लहानपणापासूनच खेळकर असणाऱ्या विवेकानंदांनी शाळेत बुद्धिमत्तेच्या बाबतीत कायम आघाडी मारली. स्वामी विवेकानंद अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते .आपल्या धर्माच्या प्रसारासाठी इतर धर्मांचा ही त्यांनी अभ्यास केला. गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा निकोप पिंड घडला .आपल्या गुरूच्या निधनानंतर स्वामी विवेकानंद हिंदू धर्माच्या प्रसारासाठी अमेरिकेतील सर्व धर्मांच्या परिषदेला गेले. तेथे त्यांनी "माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो" ह्या पहिल्याच शब्दात जगभरच्या लोकांचे मन जिंकून घेतले. सर्व जगातील धर्मांच्या रूपातून एकाच परमेश्वराची आराधना होते हे त्यांनी पटवून दिले .अशा विद्वान विवेकानंदांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या कुशाग्र बुद्धीचा नाविन्यपूर्ण उपयोग करून दाखवला.

               विवेकानंदांचे विचार आज देखील आजच्या तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवत आहेत . "तुम्ही मला शंभर तरुण द्या मी तुम्हाला संपूर्ण देश बदलून दाखवतो ."असे स्वामी विवेकानंद म्हणत . यावरून त्यांचा तरुणांवर असलेला विश्वास दिसून येतो. तरुणांच्या शिवाय देशाचा विकास होणे केवळ अशक्य आहे .हे स्वामी विवेकानंद यांनी ठासून सांगितले. विवेकानंदांचे असे विचार कल्पवृक्षासारखे अनंत काळापर्यंत संपूर्ण देशाला व देशातील नागरिकांना मार्गदर्शन करत राहतील .व संकटातून आणि अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी प्रेरित करत राहतील .अशा स्वामी विवेकानंदांना माझे कोटी कोटी प्रणाम. 


Yuvak din speech in Marathi 


   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ व उपस्थित वंदनीय गुरुजनवर्ग आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि मी युवक दिनानिमित्त माझे दोन शब्द आपल्यासमोर व्यक्त करतो. 
            आज युवा दिन म्हणजेच युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांची आज जयंती .
उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणारी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून अपार कष्ट घेण्याची हिंमत ज्याच्या असते तोच खरा युवक असतो.....
लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा दुर्दम्य आत्मविश्वास मनात बाळगून अशक्य गोष्टीही शक्य करण्याची ताकद यांच्यात असते तोच खरा युवक...
केस पिकले असले तरी शरीराने वृद्ध असले तरीही मनाने उत्साही कोणत्याही कार्यासाठी सदैव तत्परता ज्याच्या मध्ये असते तोच खरा युवक...
युवकांचे वर्णन करताना मला असे म्हणावे वाटते की,
 ऊन वारा पाऊस सारे असे दुबळे यांसाठी 
रे युवकांनो तुमच्यापुढती झुकेल अंबर धरती
विविध प्रकारच्या व्यसनांना आणि आमिषांना बळी न पडता आपली सकारात्मक ऊर्जा देशहितासाठी, समाजहितासाठी वापरण्याची नैतिकता ज्याच्यात असते तोच खऱ्या अर्थाने देशाचा युवक होय आणि तोच या देशाचा आधारस्तंभ आहे.
असे युवक ज्या समाजात आणि ज्या देशात असतील तो समाजाने दो देश अधिक बलवान होईल यात किंचितही शंका नाही. आपला प्रिय भारत देश हा जगातील सर्वात तरुण म्हणजेच युवा देश आहे कारण आपल्या देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे कदाचित याच आत्मविश्वासाच्या जोरावर स्वर्गवासी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी भारतासाठी महासत्तेचे गोड स्वप्न पाहिले असेल.
   लहान बालकांच्या रुपाने देशाची भावी पिढी घडवण्याचे जोपासण्याचे महान कार्य करणारे आणि त्याचबरोबर ज्यांनी समाजासाठी आयुष्य व्यतीत केले अशा वृद्ध मातापित्यांची काळजी घेत त्यांच्याकडून अनुभवाचे मार्गदर्शन घेऊन युवक हे संपूर्ण मानव समाजाचे खरंच चालक असतात.




  1. माझी अभयारण्यास भेट. 
  2. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  3. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  4.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  5. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
  6. पंडित नेहरुंचे मुलास पत्र  
  7. माझे गाव       
  8.    स्वामी विवेकानंद 
  9.   झाडे लावा झाडे जगवा
  10. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat  in marathi nibandh
  11. दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
  12. मी पाहिलेला अपघात
  13. माझी शाळा .
  14. महात्मा ज्योतिबा फुले
  15. माझा भाऊ
  16. आमचे वनभोजन
  17. माझे वडील मराठी निबंध
  18. मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
  19. मी पाहिलेला अपघात
  20.  निसर्गाचे मनुष्यास पत्र
  21. माझे आवडते संत एकनाथ महाराज
  22. जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
  23. माझा बस प्रवास/maza bus pravas 
  24. माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
  25. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  26. सुंदर मराठी सुविचार
  27. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  28. स्वामी दयानंद सरस्वती
  29. राजा राममोहन रॉय
  30. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  31. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  32. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  33. परीक्षा .. छान मराठी लेख.
  34. उपकार ...छान कथा वाचा.
  35. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  36.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  37. रम्य पहाट
  38. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  39. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  40. सुंदर विचार
  41. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  42. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  43. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  44. पर्यावरणाचे महत्व..  environment
  45. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  46. पैंजण
  47. भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
  48. मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane 
    
            निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही निबंध पाठवायचा असेल तर तुम्ही पाठवू शकता. तुमच्या नावासह आपण निबंध प्रकाशित करूया .
       
          तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्याही सुचवा त्यामुळे आम्हाला अधिकाधिक सुधारणा करता येतील.
                                                                           धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने