माझा वाढदिवस




       माझे नाव प्रियंका .माझा वाढदिवस 9 एप्रिलला असतो. आमच्या घरात तसा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा अजिबात नाही. वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जरी नसली तरीदेखील आपापसातील प्रेम मात्र भरभरून असतं. त्यामुळे प्रत्येक दिवसच वाढदिवसा सारखा आनंदात जातो.

      यावर्षी मात्र आमच्या घरात माझा वाढदिवस साजरा केला गेला. मी आता इयत्ता चौथी तुन पाचवी मध्ये गेली. माझ्या मैत्रिणीकडे एक दिवस वाढदिवसासाठी गेलेले असताना तिथली मजा मी बघितली . आईला सांगितले आई माझाही वाढदिवस आता आपण साजरा करायचा . आई सांगू लागली,' आपण आपल्या घरात कुणाचाही वाढदिवस साजरा करत नाही ,पण तुझी इच्छा आहे ना !मग आपण करू.'

   आई आणि माझं बोलणं झाल्यानंतर मी आतुरतेने नऊ तारखेची वाट बघू लागले. आठ तारखेला शाळेतून येताना मी माझ्या सर्व मैत्रिणींना उद्या माझ्या वाढदिवसाला येण्यासाठी निमंत्रण दिले . सर्व मैत्रिणी वाढदिवसाला येण्यासाठी आतुर दिसत होत्या , कारण की आमच्या घरात कधीही वाढदिवस साजरा केला जात नाही हे त्यांना माहित होते . मी मात्र त्या सर्वांच्या घरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेलेली होती .आमच्या घरी हा पहिलाच प्रसंग होता.

    वाढदिवसाच्या दिवशी मी दुपारी शिक्षकांची परवानगी घेऊन लवकरच घरी आले . घरी आल्यावर माझ्या दादाने आणि आईने वाढदिवसाची सर्व तयारी करून ठेवलेली होती.

   दादाने घरात सगळीकडे लाल , निळे , पिवळे , हिरव्या रंगाचे फुगे चिकटवून ठेवलेले होते. वेगवेगळ्या रंगाचे लाइट्स देखील लावलेले होते. रंगीबिरंगी पताके लावलेले होते.

       सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहा सुटल्यानंतर माझ्या मित्र-मैत्रिणी घरून नवीन कपडे घालून आमच्या घरी आलेल्या होत्या. मलाही आईने एक छान ड्रेस आणून दिलेला होता. पप्पा अजून ऑफिसातून आलेले नव्हते . माझे मित्र मैत्रिणी आल्यानंतर आम्ही खूप गप्पा मारल्या. वडिलांची वाट बघत थांबलो पाच दहा मिनिटातच वडीलही आले. ते आल्यानंतर लगेचच आम्ही वाढदिवसाला सुरुवात केली.

     पप्पांनी एक सुंदर केक आणलेला होता . केक वरती गुलाबी रंगाने माझे नाव लिहिलेले होते . गोल- गोल आकाराचा केक बघून आमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले.  कधी केक खातो असे झाले . केकवर दादाने मेणबत्त्या लावल्या . त्या पेटवल्यानंतर सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना मी मेणबत्त्या फुंकर घालून विझवल्या आणि चाकुने केक कापला.

      पप्पांनी आणि आईने मला केक भरवला. दादानेही माझ्या गालाला थोडासा केक लावला. केक फारच छान लागत होता. आलेल्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना आईने नाश्त्यासाठी ताटल्यामध्ये शेव चिवडा दिलेला होता . त्याबरोबरच केकचा एक तुकडा त्यात ठेवलेला होता . त्यांच्या आवडीची एकेक चॉकलेट देखील त्यामध्ये ठेवलेली होती. 

     आलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी मला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू दिल्या त्यांच्या भेट वस्तू स्वीकारताना मी त्यांना थँक्यू देखील म्हणत होते आणि माझ्या वतीने प्रत्येकासाठी मी एक छान छान पेन आणून त्यांना दिले होते .पेन दादाने मला आणून दिले होते.

    दादाने छान छान गाणे लावलेले होते. त्या गाण्यांवर आमच्या मित्र-मैत्रिणींनी छान डान्स ही केला. नृत्य बघतांना पप्पानी काही मैत्रिणींना बक्षीस म्हणून पैसेही दिले. आम्ही मात्र खूप टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

       अजून एक एक गंमत तुम्हाला सांगायचे राहिलेच पप्पांनी माझ्या प्रत्येक मित्र मैत्रिणीसाठी एक सुंदर फुल झाडाचे रोप आणून दिले होते ती रोपे मी मित्र-मैत्रिणींना वाटली आणि आपल्या घरात शेतात किंवा शक्य असेल त्या जागेमध्ये लावण्यासाठी त्यांना सांगितले .हे झाड म्हणजे आपल्या मैत्रीचे प्रतीक असेल असेही त्यांना सांगायला मी अजिबात विसरले नाही. माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी ते झाड आम्ही जगवणार असे मला आश्वासन दिले आहे .आता पुढच्या वर्षापर्यंत त्या झाडांना फुले येणार हे मात्र नक्की.

     पुढच्या वर्षी येणाऱ्या माझ्या वाढदिवसाची आणि ह्या झाडाला येणाऱ्या फुलांची मी आतुरतेने वाट बघत आहे.

    

  1. सुंदर विचार  वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


    सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा




1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. ब्लॉगला भेट देऊन तुमचे बहुमोल मत मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने