1001marathiessay.blogspot.com

        माझा भाऊ

 | majha bhau nibandh in marathi

 | marathi nibandh majha bhau

             आपल्या कुटुंबांमध्ये अनेक माणसं राहत असतात. प्रत्येेक माणसाचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते . कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे एकमेकांवर प्रेम असते. माया ,आपुलकी जपत सर्व कुटुंब एकत्रितपणे आनंदात जगत असते .लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच गुण्यागोविंदाने राहतात .अर्थात यालाही काही अपवाद आहेतच, परंतु आमच्या घरात मात्र आम्ही फार मजेत आणि आनंदात राहतो.आमच्या आनंदाचे  प्रमुुुख कारण म्हणजे माझा भाऊ,
                या निबंधामध्ये आपण भाऊ कसा असतो, त्याचे महत्त्व काय इत्यादी विषयीची माहिती बघूया. चला तर मग बघुया एक छानसा निबंध माझा भाऊ.

                                     माझा भाऊ मराठी निबंध 
                             |  my brother essay in Marathi

                      
         माझ्या भावाचे नाव  चैतन्य आहे. नावासारखाच सतत चैतन्याने भरलेला असतो. त्याचा उत्साह कधीही कमी नसतो. स्वभाव खोडकर असल्यामुळे घरातल्या माणसांच्या खोड्या काढणे हा त्याचा आवडीचा छंद आहे. चैतन्य माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे . तो आता सहा वर्षाचा आहे.
       त्याच्या शाळेची तयारी मीच करून देतो .तयारी करत असताना त्याचे फार नखरे असतात. त्यावेळी तो ,मी त्याचा मोठा भाऊ आहे हेच विसरून जातो . तो मोठा भाऊ असल्यासारखे माझ्यावर हुकूम सोडतो. त्याचे ते बालहूकुम मोडण्याचे धाडस अजिबातच होत नाही. याचे कारण म्हणजे त्याच्या वागण्यातील निरागसपणा.
        शाळेतून आल्यावर मात्र त्याचा थाट बघण्यासारखा असतो. शाळेची बॅग ठेवली की, हळूच सोफ्यावर जाऊन बसणार .पायाची घडी घालून एक पाय दुसऱ्या पायावर ठेवणार. मागे रेलून दोन्ही हात मानेच्या मागे ठेवणार ..आणि मग हुकूम सोडतो,  ' मला कुणी तरी पाणी द्या ,मी आलो आहे .' त्याच्या या सवयीची आम्हाला फार सवय झाली आहे. त्याची ही अदा बघण्यासाठी आम्ही सर्वच आतुर झालेले असतो.
       शाळेतून आला की चैतन्य थोडेसे खाऊन घेतो .जेवणाच्या बाबतीत मात्र त्याचे फार नाटकं  नसतात. जेवण झाल्यावर टीव्हीचा रिमोट घेतला की ,त्याचे आवडीचे चॅनल  लावतो. इतर मुलांसारख त्याला कार्टून चॅनल आवडत नाही त्याच्या आवडीचे चॅनल म्हणजे  नॅशनल जिओग्राफिक आणि ॲनिमल प्लॅनेट होय. ह्या चॅनल्सवर येणाऱ्या विविध प्राण्यांचे तो फार बारकाईने निरीक्षण करतो आणि मनात आलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी हजारो प्रश्न विचारून आम्हाला भंडावून सोडतो .त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्हाला खूपच प्रयत्न करावे लागतात .मी तर त्यामुळे बरीचशी विज्ञानाची  पुस्तके वाचून काढले आहेत. त्याची प्राणी आणि निसर्गाविषयीची आवड बघून आम्हाला नक्की वाटते की हा भविष्यामध्ये या विषयांशी संबंधित क्षेत्रांमध्ये स्वतःचे भवितव्य घडवणार.
        घरात अध्यात्मिक वातावरण असल्यामुळे चैतन्यला विविध प्रकारची स्तोत्र व आरत्या पाठ आहेत .त्याच्या कडक व काहीशा बोबड्या स्वरांमध्ये स्तोत्र व मंत्रांमधील  चैतन्य खुलून आल्यासारखे वाटते.चैतन्याची  अजून एक गंमत म्हणजे  फुल पॅन्ट वापरणे. तो म्हणतो ,'फुल पॅन्ट घातली कि मी मोठा दिसतो आणि लहान पॅन्ट घातली की मी बाळ दिसतो पण आता मी मोठा झालो ना.' कधीकधी तर तो माझी पॅन्ट घालण्याचाही प्रयत्न करतो     .                            चैतन्य घरात खेळत बागडत असला की घर म्हणजे सुखाचा आगर बनुन जाते.
   असा हा माझा धाकटा बालगणेश मला खूप आवडतो. गणपतीच्या दिवसांमध्ये तर गणपतीला आणण्यापासून तर गणपतीची बोळवण करण्यापर्यंत सगळ्या कामाचा त्याने जणू सपाटाच लावलेला असतो .गणपतीच्या नावाने केलेले मोदक आमच्या घरातील चैतन्य नावाचा उंदीर फस्त करतो आणि मस्त राहतो .तो असाच नेहमी स्वस्त आणि मस्त राहावा .अशी मी बाप्पा जवळ प्रार्थना करतो. माझा भाऊ मला खूप आवडतो.

माझा भाऊ निबंध क्रमांक 2




          भाऊ आपल्यासोबत खेळतो आणि भाऊ आपली काळजी घेतो. मला माझा भाऊ खूप आवडतो. त्याचे नाव चैतु आहे. आम्ही खूप मस्ती करतो. आम्ही मारामारी करतो. आणि झोक्यावर पण खेळतो.
        चैतू माझ्या पेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. तो इयत्ता सहावी मध्ये शिकतो. चैतुला गणित विषय खूप आवडतो. गणित विषयाचा अभ्यास तो खूपच लवकर आणि आवडीने पूर्ण करतो.







.
      
       

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने