1001marathiessay.blogspot.com
" क्षणभंगुर नाही भरवसा |
व्हारे सावध सोडा माया आशा | "
अशा तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओळी माझ्या कानावर पडल्या . काही काळ का होईना,परंतु मनात विचारांची आंदोलने सुरू झाली. बघाना माणसाचंं जीवन किती क्षणभंगुर आहे. कधीही काहीही घडू शकतं असाच एक प्रसंग माझ्या अनुभवास आला.
चला तर बघूया मग एक छानसा निबंध मी पाहिलेला अपघात आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात छोटा-मोठा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अपघात हा घडलेला असतो
मी एकदा शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना सायकलवरून येत होतो. सायकल घेऊन मी रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने नियमाप्रमाणे चाललेलो होतो. तितक्यात माझ्या जवळून एक दुचाकीस्वार फार वेगाने पुढे गेला तो इतक्या वेगाने पुढे गेला हे हवेचा एक मोठा झोत माझ्या अंगावर आला मी बघू लागलो आणि मला वाटले बापरे वेगाने गाडी चालवतात माणसं आपण थोडे राहिले पाहिजे.त्या दुचाकीच्या मागूनच ही चारचाकी गाडी ही जात होती काही अंतरावर गेल्यानंतर अचानक स्पीड ब्रेकर म्हणजेच गतिरोधक आला
दुचाकीस्वारांनी अचानक ब्रेक लावला परंतु त्याचा वेळ इतका होता की त्या गतिरोधक आवरून गाडी खुप वेगाने उधळली. गुजराती चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला गाडी घसरत जाऊन बाजूलाच असलेल्या खांबावती आदळली. मागून चार चाकी गाडीच्या चालकाने हे जोराचा ब्रेक लावला परंतु चार चाकीच्या मागून जाणाऱ्या मोठ्या ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तरीही ट्रक चार चाकी ला मागून धडकली.
मी खूपच घाबरून गेलो होतो तिथे न थांबता मी सरळ घरचा रस्ता गाठला काही काळानंतर आमच्या घरासमोर चौकातील मंडळी अपघाता संबंधी चर्चा करू लागली त्यात असे कळले की दुचाकीस्वारांना जागीच मृत्यू झाला व चार चाकी मधील तीन जणांना दवाखान्यात दाखल केलेले आहे
अपघातात मृत्यू पावलेल्या माणसांसाठी मला खूप वाईट वाटले. परंतु ते प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून भीतीही वाटत होती त्या दिवसापासून मी दररोज रस्त्यावरून सायकल चालवताना अगदी काळजीपूर्वकच चालवतो आणि तुम्हा सर्वांना ही विनंती करतो रस्त्यावरती मस्करी करणे जीवावर बेतू शकते आणि याचे अनेक संदेश रस्त्यांवर असणाऱ्या फलकांवर लिहिलेले असतात तरीदेखील काही लोक बिनधास्तपणे गाड्या अतिवेगाने चालवताना दिसतात तुम्ही मात्र तसे करू नका सुरक्षित घरी जा घरी आपली कोणीतरी वाट पाहत असते.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.