upkarmarathi.com
माझी शाळा मराठी निबंध |majhi shala in marathi essay |
| माझी शाळा निबंध मराठी
| majhi shala nibandh in marathi
| majhi shala in marathi essay , शाळा असे नाव जरी ऐकले तरी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती आपण लहानपणी शिक्षण घेतलेली पाचवी पर्यंतची लहान शाळा . याचे कारण काय ? तर बालपणी आपल्या मनावर जे संस्कार होतात ते आपल्या लक्षात राहतात.
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक एक . आमच्या शाळेची इमारत अगदी प्रशस्त आणि शोभिवंत अशी विद्येचे माहेरघर .शाळेला चारही बाजूंनी संरक्षण भिंत होती. या संरक्षक भिंतीवरती स्वच्छतेचे संदेश ,आरोग्यदायक सवयी ,आठवड्याचे वार ,देशांची नावे ,महिन्यांची नावे ,ऋतूंची नावे तसेच इतर सामान्य ज्ञानावर आधारित विशेष माहिती लिहिली होती. शाळेच्या भिंतीवर असलेल्या माहितीचा जरी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तरीही विज्ञानाच्या आणि सामान्य ज्ञानाच्या पातळीत प्रचंड भर पडत असेल . आमच्या शाळेचा नियम होता की दररोज शाळेतील भिंतीवरील माहितीचे वाचन करून घ्यायचे .त्याची जबाबदारी प्रत्येक वर्गशिक्षकांकडे होती.
शाळेचे नाव घेताच मला माझ्या लहानपणी ते कविता आठवते
" ही आवडते मज
मनापासुनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा "
आईआपल्या बाळाची काळजी घेते आणि त्याला सर्व दृष्टीने संपन्न करते .तसेच माझ्या शाळेतील सर्व शिक्षक आमची खूप काळजी घेत असत. तसेच जीवनाच्या लढाईमध्ये आम्ही कुठेही कमी पडू नये यासाठी लहानपणापासूनच संस्कारांचे बाळकडू आम्हाला पाजण्यासाठी सर्व शिक्षक कार्यतत्पर असत .
|माझी शाळा निबंध|
आमचे मुख्याध्यापक देशपांडे सर शाळेच्या नियोजनाच्या बाबतीत अगदी काटेकोर होते . तसेच देशपांडे सर नेहमी म्हणायचे की ,'मुलांनो नुसतं ह्या चार भिंतीतील पुस्तकांचा अभ्यास करू नका, या शाळेच्या बाहेर आहे त्या शाळेतील जगात जगायचे आहे तुम्हाला भविष्यात .त्यासाठी या शाळेमध्ये स्वतःला घडवून घेण्यासाठी तुम्ही स्वतः देखील प्रयत्न केला पाहिजे .' सरांचे तेव्हाचे बोलणे आत्ता कळते आहे . तेव्हा शिकलेली एक कविता आठवते ती अशी ,
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे, वेली ,पशु,पाखरे
यांशी दोस्ती करू
आमच्या शाळेत वर्षभरामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा होत असत ..शारीरिक स्पर्धाही होत असत .या स्पर्धांमध्ये क्रमांक मिळवणाऱ्या सर्व स्पर्धकांचे बक्षीस स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एकत्रित दिले जात असत. मीही सर्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे. सांस्कृतिक स्पर्धांमध्ये तर माझा नंबर ठरलेलाच असायचा . मी या दिवशी पिशवी घेऊनच शाळेत जात असे ,तर येताना मिळालेल्या बक्षीसांनी ती पिशवी भरून घेऊन येत असे . वर्षभर कधीही मी वह्या घेत नसे .बक्षीस मिळालेल्या माझ्या पूर्ण वर्षभराचे लेखन काम होत असे.
या स्पर्धांमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शाळेची सहल जात असे त्या वेळेला तर काही मजा वेगळीच. सर्व मित्रांबरोबर सहलीला जाणे आणि घरातील माणसांबरोबर सहलीला जाणे यात खूपच फरक आहे.
आमच्या शाळेत दिले जाणारे संस्कारांचे धडे आयुष्यामध्ये आम्हाला फारच उपयोगी पडले आणि पडत राहतील . माझे आवडते साळवे सर आम्हाला नेहमी सांगत की,' ज्याप्रमाणे एखादी बी जमिनीत टाकल्यानंतर त्याचे संगोपन केले तरच त्यातून छान रोप तयार होऊन भविष्यात त्याचे वृक्षात रूपांतर होते .त्याच पद्धतीने मानवाच्या स्वभावाला संस्कारांचे खतपाणी घातले तरच योग्य व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते .'
सरांचा संदेश आजन्म लक्षात राहील सर फक्त सांगत नव्हते तर त्यांच्या आचरणातही या तत्त्वज्ञानांचा पाझर दिसत होता .त्यांची आठवण आली की मला एक प्रार्थना आठवते .
' गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा '
असे संस्कारांचे बाळकडू पाजून आमचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी धडपडणारी आमची शाळा मला नेहमी स्मरणात राहील .प्राणपणाने आमच्यामध्ये माणुसकीचे बीज पेरणारे आमचे शिक्षक मी कधीही विसरणे शक्य नाही.
या निबंधाचा वाचक खालीलप्रमाणे शोध घेतात.
- |माझी शाळा निबंध मराठी
- |माझी शाळा मराठी निबंध
- |निबंध माझी शाळा
- |मराठी निबंध माझी शाळा
- |निबंध मराठी माझी शाळा
- |माझी प्रिय शाळा
- |माझी आदर्श शाळा
- | शाळेचे महत्त्व
- | माझ्या आठवणीतील शाळा
- | mazi shala nibandh in marathi
- | majhi shala in marathi essay
निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. काही सुधारणा असतील तर सुचवा .आम्ही तुमच्या सूचनांचे स्वागतच करू.
धन्यवाद.
vachaniy marathi lekh |
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.