1001marathiessay.blogspot.com

                  प्रिय मित्रांनो निबंध लेखन ही एक फार महत्वपूर्ण कला आहे . कारण की आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्याला याचा उपयोग होतो. ज्याच्याकडे निबंध कला आहे तो कोणतीही  घटना विस्तारपूर्वक व जशीच्या तशी इतरांना सांगू शकतो .हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. निबंध कला  विकसित करण्यास निबंध लिहिण्याचा सराव केला पाहिजे . विविध निबंध वाचले पाहिजेत.
        तसंच हा खालील निबंध  तुम्ही वाचा व वाचून झाल्यानंतर तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा.

                             माझे वडील मराठी निबंध.
                            my father essay in marathi,
                        maze vadil nibandh   in marathi

     आज पर्यंत मी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला त्यात मला बक्षीसही मिळाले. कोड कौतुक झाले .स्वागत सत्कार यांचा वर्षाव झाला .या सर्वातून मला आनंदही भरपूर मिळत होता .एक दिवस आमची  आजी घरी आली  होती. आजीचा मी आवडता नातू त्यामुळे मी आजीची   खूप चेष्टा मस्करी करत असे. आजीही माझी  खूप चेष्टा करायची. अगदी तिचं वय विसरून लहान मुलासारखे माझ्याशी भांडायची.
            एक दिवस असेच मला मिळालेले बक्षीस तिला दाखवत असताना आजी मला म्हणाली," हे बक्षीस माझा मुलगा हुशार आहेना म्हणून तुला मिळालं." आजीला म्हटलं ,"आजी हे बक्षीस पप्पांना थोडीच मिळालं ?हे मला मिळाल आहे." आजी  म्हणाली  ,"अरे पण तुझा पप्पा हुशार, म्हणून तू  हुशार ."आणि शेवटी तुझा पप्पा या हुशार आजीचा मुलग  आहे .आजीचा स्वभाव मला माहित  असल्यामुळे मी  खोटा खोटाच आजीवर रागवत माझ्या खोलीत निघून गेलो ,आणि वडिलांविषयी विचार करू लागलो.




             माझ्या वडिलांचे नाव ज्ञानेश्वर आहे नावासारखे अगदी हुशार आहेत पप्पा विद्युत  बोर्ड मध्ये कामाला आहेत. विद्युत विभागामध्ये चांगल्या पदावर आहेत .कामाच्या गुणवत्तेमध्ये तडजोड ते अजिबात खपवून घेत नाहीत. मग ऑफिसचे काम असो नाहीतर घरातील.ते  सहज म्हणतात," ज्यावेळी आपण आपल्या कामाशी ,जबाबदारी किंवा कर्तव्याशी पहिल्यांदा तडजोड करतो त्याच वेळी आपण पुढच्या अनेक वेळा तडजोड करण्यासाठी मनाची तयारी केलेली असते. आपल्या अगदी नकळत .त्यामुळे ज्यावेळेस मनात अप्रामाणिकपणा किंवा कर्तव्याशी प्रतारणा डोके वर काढत असेल त्याच वेळी त्या डोक्यावर पाय दिला गेला पाहिजे."
         मला व्यायामाची  खूप सवय आहे .व्यायाम केल्याशिवाय माझा दिवस पूर्णच होत नाही .याचे सगळे श्रेय देखील माझ्या वडिलांना जाते. आमच्या लहानपणापासून वडील आम्हाला पहाटे पाच वाजता उठवून व्यायाम योगासने आणि रनिंग करण्यासाठी घेऊन जात असत .त्यावेळी खूप कंटाळा यायचा, पण त्या सवयीचे महत्व आता मात्र पटले आहे. त्या सवयीमुळे आजही कितीतरी कामे मी न थकता करू शकतो , या स्पर्धांमधील बक्षिसं मिळवू शकतो तेही वडिलांनी लावलेल्या  त्यावेळच्या व्यायामाच्या सवयीने.
            विद्युत विभागात त्यांच्यासह काम करणारे सर्वच कामगार वडिलांना खूप आदर भावाने वागवतात. वडिलांविषयी एखादा अपप्रचार मला चुकूनही कुठून बाहेरून ऐकायला मिळालेला नाही.
          व्यायामाच्या सवयीप्रमाणे मी आमच्या गावातील व्यायाम शाळेत गेलो होतो. माझा दुसरा-तिसरा दिवस होता .आमच्या आजूबाजूच्या खेड्यातील मुलेही  त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येत असत .त्यांची चर्चा चालू होती कि , त्यांच्या गावातील विद्युत कर्मचारी  म्हणजे देवमाणूस आहे. कोणाच्या घरी पाणी देखील घेत नाही. आणि सर्वांशी अगदी नम्रतेने आणि प्रेमभावनेने बोलतात. विद्युत विभागाशी संबंधित असल्याने बऱ्याच लोकांची भांडणेही होतात .शेतीच्या बांधावरून विज बिल भरण्यावरून  अनेकदा लोक डोकंही लावतात ,ते  अगदी विवेकपूर्ण पद्धतीने सर्व समस्यांवर तोडगा काढतात . भांडण तंटे मिटवून देतात .असे त्या मुलांचे बोलणे चालू होते .त्यातच त्यातील मुलगा अजून म्हणाला की ,'त्यांच्या सारखा प्रामाणिक व्यक्ती आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही'.मला मनात वाटले  अशा माणसाला आपण भेटलेच पाहिजे .त्याच गावातील माझा मित्र त्यांना सामील झाला. त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते. त्या चर्चेतील सर्व विषयांशी  तोही सहमत झाला होता. तितक्यात त्याचे माझ्याकडे लक्ष गेले आणि त्याने मला हाक मारली. मी त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने त्या सर्व मुलांशी माझी ओळख करून देताना असे सांगितले की," हा माझा मित्र विजय आणि इतक्या वेळ आपण ज्या काकाविषयी बोलत होतो त्यांचा हा मुलगा ."हे ऐकताच त्या गर्दीतील सर्व मुले माझ्याशी हात मिळवणी करून माझ्या वडिलांविषयी बोलू लागलेत.. काही क्षणापुरता मला बोलायचे सुचत नव्हते .माझ्या मनात वडिलांविषयी असलेला आदर शतपटीने वाढलेला होता.पवित्र माणसाच्या पोटी जन्म   झाल्यामुळे मी देवाला धन्यवाद दिले.
       घरी आल्यावर हा सर्व प्रसंग मी वडिलांना सांगितला .घरातल्या सर्व मंडळींनाही  सांगितला या सगळ्यावर वडील एकच म्हणाले ,"आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे आणि त्या कामाच्या फळाची अपेक्षा न करणे हा भगवद्गीतेतील कर्म वादाचा सिद्धांत आयुष्यात जो कोणी आचरण करेल त्याच्या कीर्तीचा सुगंध सतत दरवळत राहील ."वडिलांच्या या विचाराने मात्र मला एक नवीन हुरूप आला आणि माझ्या जीवनात एक आदर्श माझ्यासमोर निर्माण झाला .
        वडिलांविषयी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला शब्दच अपूर्ण पडत आहेत आणि आजन्म वडिलांच्या या ऋणात राहणे मी पसंत करेल.



        प्रिय मित्रांनो तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही हा निबंध वाचता यावा म्हणून त्यांनाही निबंध शेअर करा.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने