व्यक्तिमत्त्व विकासासाठी युक्त्या. Tips for personality development.best quotes for personality developement and personal growth,self confidance
- कोणालाही पैशाबद्दल ,लग्नाबद्दल किंवा त्याच्या व्यक्तिगत बाबींबद्दल उपदेश करू नका.
- पाहताक्षणीच नव्या माणसाबद्दल मत बनवू नका .बऱ्याच वेळा तुमची चूक होण्याची शक्यता आहे.
- मित्र आणि ग्रंथ मोजकेच पण चांगले असावेत जसा मित्र निवडाल तसाच लेखक निवडा.
- सतत काही करत राहा. उपेक्षित राहू नका .उपेक्षा होण्यासारखी दुसरी भयंकर शिक्षा कुठलीही नाही.
- चांगल्या मार्गाने पैसा कमविण्याचे काहीच गैर नाही गरीब राहू नका ,कारण गरीब माणसाला या जगात लवकर पुढे यायला वाव मिळत नाही .
- सर्व व्याप विसरून वर्षातून एकदा तरी कुटुंबियांबरोबर सहलीला जा . तुम्हाला कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त खर्च येईल, पण आठवणींची किंमत पैशात मोजता येत नाही.
- श्रद्धेने देवाला नमस्कार करा . भयापोटी नको. जे भयापोटी देव पूजा करतात ते सैतानाची ही पूजा करतील.
- तुम्हाला माहित आहे तुमच्यात परिवर्तन घडवून आणणारे फार मोठी शक्ती आहे त्या शक्तीला कधीही कमी लेखू नका.
- काळजी करत बसू नका महाभयंकर काळजी करावी इतक्या लायकीचे मानवी व्यवहारात काहीही नाही.
- पैशाची बचत करण्याची शिस्त लावून घ्या .तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी ही अत्यावश्यक गोष्ट आहे .
- अनेक भारी किमतीच्या वस्तू तुमच्याजवळ नाहीत याचा खेद मानू नका. लक्षात ठेवा कुठल्याही वस्तूला किंमत दिली जाते म्हणून तिला किंमत असते .
- वकिलाच्या डॉक्टरच्या किंवा गुरूच्या पूर्ण आहारी जाऊ नका .
- तुम्ही खुप प्रतिभावान असलात तरी लक्षात ठेवा उत्तम जमिनीची सुद्धा मशागत करावी लागते नाही तर तिचे रान होते .
- हजारो महिलांच्या प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल टाकण्यापासून होते म्हणून आधी कोणत्याही कामाला सुरुवात तरी करा यश किंवा अपयश हा पुढचा प्रश्न आहे .
- रोज सहा ग्लास पाणी प्या वेळेचे व्यवस्थापन काटेकोरपणे करा .
- मोठ्या अपेक्षा ठेवा शुल्लक.
- गोष्टींमधून माणसाचा स्वभाव कळतो ज्याप्रमाणे सूक्ष्म छिद्रातून नाही सूर्यप्रकाश जाणवतो.
- संसारात छोटी ठिणगी चटकन विझवा , कारण त्यातूनच पुढे प्रचंड अग्नी भडकतो.
- तुम्हाला वेळ नाही असे कधीही सांगू नका दिवसाचे जेवढे तास शेक्सपियर महात्मा गांधीजी विवेकानंद आईन्स्टाईन यांना मिळाले तेवढेच तुम्हालाही मिळतात हे विसरू नका.
- योग्य वेळेची निवड करा म्हणजे वेळेची आपोआप बचत होईल.
- खूप प्रवास करा. प्रवासाने माणूस शहाणा होतो. ज्ञानी होतो. मुख्य म्हणजे केव्हा परतावे हे त्याचे त्यालाच कळते .
- स्वतः निर्णय घ्या जरी तुम्ही काही वेळा चुकीचे निर्णय घेतले तरी हरकत नाही .त्यातले काही निर्णय निश्चितपणे अचूक ठरतील व ते तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातील .
- दहा मिनिटात ठरवून पाच छोटी-छोटी कामे करा.
- तुम्ही एकटे काहीही करू शकत नाही. एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात त्याबद्दल कृतज्ञ रहा .
- तुमच्यासारखीच कल्पना दुसऱ्या कुणालाही सुचण्याची शक्यता असते . जो त्या कल्पनेवर प्रथम कष्ट घेतो त्यालाच यश मिळते.
- तुमचे जीवनावर प्रेम असेल तर मग वेळ वाया घालवू नका ,कारण वेळ म्हणजे जीवन .ज्याने वेळ वाया घालविला त्याच्याजवळ गमवायला काहीच उरत नाही .
- प्रवासाला जाताना तुमच्या पाकिटात नाव, पत्ता आणि फोन नंबर असलेले कार्ड ठेवा .त्यावर तुमच्या बद्दलची महत्त्वाची वैद्यकीय माहिती असु देत. तुम्ही ज्या हॉटेलात किंवा कोणाच्या घरी उतरलात त्यांचा पत्ता लिहा .
- दिवसाची सुरुवात तुमच्या आवडत्या गोष्टीने करा.
- तुम्हाला झोप ,संपत्ती आणि आरोग्य याचा खरा उपभोग घ्यायचा असेल तर मग त्यामध्ये व्यत्यय आलाच पाहिजे .
- घरात कुठलेही काम काढले की त्याचा अंदाजे खर्च लिहून घ्यायला सांगा.
- वेळकाढूपणा करू नका तुमची कामे दुसऱ्या दिवसावर ढकलू नका .जी गोष्ट ज्यावेळी करायला हवी ती त्याच वेळी करा.
- तुम्ही सुज्ञ असाल तर तुम्हाला मिळणाऱ्या संधी पेक्षा जास्त संधी निर्माण करू शकता.
- सुव्यवस्था हा निसर्गाचा पहिला नियम आहे तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला सुव्यवस्थित पणा बद्दल प्रेम असायला हवे.
- भूक लागेल तेव्हाच खा, तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. भुकेने मरणारे फार थोडे आणि अति आहाराने मरणारे लाखो लोक आहेत.
- दुसऱ्याने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींचे कौतुक नक्की करा. जनावर दुसऱ्या जनावराचे कौतुक करत नाही .
- कुणाच्याही गुणांची स्तुती करत बसण्यात आपला वेळ घालवू नका .ते गुण आपल्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा.
- अंधश्रद्धेने एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे बुद्धीचा नेत्र मिटण्यासारखे आहे.
- निर्बुद्ध श्रद्धेय पेक्षा संशोधन श्रेष्ठ आहे पण बुद्धीपेक्षा श्रद्धा श्रेष्ठ शक्ती आहे.
- भरपूर कामे केल्याशिवाय फावल्या वेळेचा आनंद लुटता येत नाही.
- देव पृथ्वीवर राहात असता तर लोकांनी त्याच्याकडे हे माग ते माग करून त्याला भिकारी करून टाकले असते.
वरील सर्व वाक्य दिवसातून एकदा तरी वाचा म्हणजे संपूर्ण दिवसातील काम करण्यामध्ये तुम्हाला योग्य दिशा मिळत राहील. तुमच्या हातून चुका घडण्याचे प्रमाण फार कमी होईल . काही दिवसातच तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये झालेले सकारात्मक आणि लक्षणीय बदल दिसून येतील. याची मी खात्री देतो.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.