upkarmarathi.com

प्रिय मित्रांनो तुम्हाला नेहमी असे प्रश्न पडत असतील कि ,पर्यावरण म्हणजे काय? ,पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय? ,पर्यावरण संवर्धन कसे करावे ?,दिन कधी असतो ?अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पुढील दोन निबंधांमध्ये बघूया.



पर्यावरणाचे महत्व | environment | पर्यावरण वर मराठी निबंध -essay on environment in marathi
essay on environment in marathi 

      पर्यावरणाचे महत्त्व तर सर्वांना माहीतच आहे.आपण या ठिकाणी बघूया दोन माहितीपर निबंध ,|पर्यावरणाचे व्याप्ती व त्याचे महत्त्व स्पष्ट करा असे विचारल्यास देखील आपल्याला या निबंधांचा व माहितीचा नक्की फायदा होईल.

पर्यावरणाचे रक्षण (environment)
 | environment education.

          essay on environment in marathi  ,,   आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी यांचा समावेश आपण पर्यावरणामध्ये करतो. नदी-नाले ,पशुपक्षी ,डोंगर झाडे, वृक्ष, वेली इत्यादी सर्वांचे मिळून पर्यावरण बनते .मनुष्य सारखा म्हणतो की मनुष्य हा निसर्गातील सर्वात श्रेष्ठ सजीव आहे ,पण तरीदेखील तो पर्यावरणाचा फक्त एक भाग आहे .यावरून पर्यावरणाची व्याप्ती आपल्याला लक्षात येते. माणसाने कितीही प्रगती केली, कितीही उच्च झाला तरीदेखील निसर्गाच्या शक्तीपुढे आपण क्षूल्लकच आहोत.आपले संपूर्ण आयुष्य हे पर्यावरणाच्या आतच सुरू होते आणि संपते . म्हणून पर्यावरण चांगले राहिले तरच मनुष्य प्राणी तसेच इतर सर्व सजीवही सुखासमाधानाने राहू शकतील.


                 पर्यावरणाचे आपण नीट रक्षण केले तरच आपले रक्षण होईल .नाहीतर पर्यावरणाच्या नष्ट होण्याबरोबरच संपूर्ण सजीव सृष्टीही नष्ट होऊन जाईल .पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे . त्यासाठी खूप मोठमोठे कामे करण्याची गरज नाही, तर छोटी छोटी कामे नित्यनेमाने व प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे . पर्यावरण रक्षणाच्या कामांमध्ये स्वच्छता ,वृक्ष लागवड ,पाण्याची बचत, वीज बचत ,रासायनिक खतांचा कमी वापर इत्यादी प्रकारच्या कामांचा समावेश करता येईल.

        स्वतःच्या  स्वार्थापोटी मानवाने भरमसाठ वृक्षतोड केली हिरवाईने नटलेली सर्व जंगले नष्ट होऊन आता सिमेंट काँक्रीटची उष्ण जंगले निर्माण झाले आहेत. पर्यावरण रक्षणाच्या कामी  शासनानेही अनेक उपक्रम राबवले .आता दरवर्षी वृक्ष लागवडीचे नवीन नवीन उच्चांक  गाठले जाताना आपल्याला दिसतात ,परंतु प्रत्यक्षात मात्र तितके झाडे जगण्याचे प्रमाण दिसत नाही.

       पृथ्वीवर सजीव निर्जीव , साधनसंपत्ती उपलब्ध आहे ,त्यात हवा, पाणी, ऊर्जा ,जमीन भाग ,सागर भाग, हवामानाचे घटक, प्राणी-पक्षी, सर्व सजीव ,सर्व प्रकारच्या वनस्पती, शेतातील पिके खनिजे, अशा मानवा भौतालच्या जीवनास आवश्यक सर्व घटकांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये केला जातो. या साधनसंपत्तीचा मानवाने असाच चुकीच्या पद्धतीने वापर केला तर विनाश ठरलेलाच आहे.

         मानवाच्या बेताल वागण्यामुळे पृथ्वीची उष्णता वाढत आहे भूपृष्ठ लगत वातावरणातील तपांबर या थरात जीवसृष्टी राहते .या  थरात सजीवांना उपयुक्त हवेचे घटक ,पाणी इत्यादीं पोषक प्रमाणात उपलब्ध आहे .याच थरातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड, प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन ,हायड्रोजन नायट्रोजन इत्यादी वायूंचे निसर्ग नियंत्रित व निसर्गनिर्मित प्रमाण ठरलेले आहे .त्यात मानवी हस्तक्षेपामुळे वाढ किंवा घट झाली तर नुकसान होते.

    यंत्रांमधील   खनिज तेल ,कोळसा , इंधन  ज्वलन प्रदूषणातून ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले तर त्यांच्या उपलब्ध मर्यादांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. वनस्पतींचे जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्राणवायू  व कार्बन डाय-ऑक्साइड वायू यांच्यात असंतुलन निर्माण होते. तापमानातील वाढ किंवा घट ही युद्धजन्य परिस्थितीमुळे , अनुस्पोट घडविल्याने तसेच कारखानदारीच्या प्रदूषण वाढीमुळे घडून येते . म्हणून निसर्गाने प्रत्येक घटकांच्या मर्यादा ठरविलेला आहेत. या मर्यादांचे उल्लंघन मानवाकडून होऊ नये यासाठी खास प्रयत्नांची गरज आहे.

        जंगल तोड व कारखानदारी, वाहनांमध्ये वाढ यांच्यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढते आहे व त्याचा परिणाम पृथ्वीच्या उष्णता वाढीमध्ये( global warming) झालेला आहे. कारखानदारीतील वाढ व होणारे प्रदूषण यांच्यावर नियंत्रण केले नाही तर निसर्गा कडील सजीवांची पोषण मर्यादा संपून जाईल .त्यासाठी जंगलक्षेत्रात वाढ करुन पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे.

     साधनसंपत्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीने साधन संपत्तीचा वापर करणे बंद करावे .असा त्याचा अर्थ नाही ,तर या साधनसंपत्तीचा वापर योग्य व काळजीपूर्वक करावा, विनाश टाळावा ,शोषण थांबवावे ,टाकावू लोखंड  प्रक्रिया करून  पुन्हा वापरावे .दिवसेंदिवस निसर्ग संपत्तीची वाढत जाणारी मागणी विचारात घेता साधन संपत्ती कायम टिकून राहावे या हेतूने जंगलतोड थांबवावी .चराई बंद करावी, ऊर्जेचा वापर योग्य व कमी प्रमाणात करावा .जलसाक्षरता पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे जगवा इत्यादी कार्यक्रमात सहभागी होऊन नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करावे. 

           पाणी जमीन खनिजे इत्यादी सर्व घटकांचा वापर नियोजनपूर्वक करावा .तुषार व ठिबक सिंचन वापरावे .नैसर्गिक खते वापरावीत .पर्जन्य जलाचे संचयन करावे .सौर व पवन ऊर्जेचा वापर वाढवावा .वृक्षारोपण करावे ,बगीचे उभारावेत ,वनवे लावू नयेत ,हरित पट्टा विकसित करावा . सेंद्रिय कचऱ्यापासून खत करावे असे अनेक उपाय सुचवले जातात.

         पर्यावरण व आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संपूर्ण शाश्वत विकासासाठी आर्थिक व पर्यावरण विकास दोघांनाही सारखेच महत्त्व दिले पाहिजे. केवळ आर्थिक नफा मिळवण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान केले तर तो विकास त्या प्रदेशाला भविष्यात ओसाड व भकास बनवेल .म्हणजेच कोणत्याही ठिकाणी कोणतीही विकासाची योजना राबवताना पर्यावरण संरक्षणाचा विचार केल्याशिवाय ती योजना पूर्ण होऊ शकत नाही. व कल्याणकारी ठरू शकत नाही. निसर्ग कल्याणाशिवाय मानवतेचे कल्याण होऊच शकत नाही.

         पर्यावरण व विकासावरील जागतिक आयोगाने ब्रूट Brundtland report 1987 अहवाल तयार केला. त्यांनी चिरंजीवी किंवा शाश्वत विकासाची संकल्पना मांडली .चिरंजीव विकास म्हणजे जो सध्याच्या गरजा पूर्ण करतो व भविष्यकालीन म्हणजेच पुढच्या पिढीच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेमध्ये कोणतीही तडजोड करीत नाही. पुढच्या पिढ्यांसाठी पुरेशा नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करतो. संरक्षण करतो त्या पिढ्यांची काळजी करतो. योग्य नियोजनाने वर्तमान व भविष्य काळासाठी निसर्गाच्या समृद्धी करिता प्रयत्न करतो .अशा विकासाला चिरंजीवी किंवा शाश्वत विकास म्हणतात.

           पर्यावरणाची काळजी घेणे व त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. फक्त जबाबदारी नाही ही तर गरज आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: 

  • मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य, तंत्रज्ञान, जनरल नॉलेज जाणून घेण्यासाठी Talksmarathi ला नक्की भेट द्या. 




निबंध क्रमांक 2

|पर्यावरण शिक्षण

| मानव आणि पर्यावरण


            झाडे आपले मित्र आहेत . ते आपल्यालाऑक्सिजन देतात . सावली देतात. झाडांपासून आपल्याला डिंक, फुले, फळे मिळतात .झाडांना झोका बांधून त्याच्यावर झुलताना फार मजा येते.झाडांवर अनेक पशुपक्षी घरटे बांधून राहतात .त्या पक्षांकडे बघताना मनाला फार आनंद होतो. डोंगर-दऱ्या नदी-नाले या नैसर्गिक साधन संपत्तीचे सौंदर्य हे शब्दात सांगण्यासारखे नाही. या सगळ्यांचा समावेश पर्यावरणामध्ये होतो.

     आपला जन्मही या पर्यावरणामध्ये होतो आणि या पर्यावरणा मध्येच आपण नष्टही होतो. म्हणून आपले संपूर्ण जीवनचक्र  पर्यावरणामध्ये सामावले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

           झाडे विविध नैसर्गिक वायू जसे की ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड ,नायट्रोजन इत्यादी चे प्रमाण मर्यादित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. बेसुमार वृक्षतोडीमुळे हे प्रमाण बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे .ग्लोबल वॉर्मिंग सारखे समस्या फार मोठे संकट बनवून समोर उभे राहिले आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी माणसाने पर्यावरणाचे रक्षण करावे, अन्यथा माणसाचे रक्षण कोणीही करू शकणार नाही. त्यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर करावा. नैसर्गिक साधन संपत्तीचा व्यय करावा. भरपूर वृक्ष लागवड केली पाहिजे व झाड जतन केले पाहिजे. घराच्या आजूबाजूला औषधी वनस्पतींची लागवड केली तर सजीव चक्राच्या व्यवस्थित पणासाठी आपण हातभार लावू.

              पर्यावरणामध्ये आढळून येणाऱ्या विविध सजीवांचा आपण आदर केला पाहिजे .त्यांच्या अस्तित्वामुळे हे पर्यावरण शोभून दिसले आहे .ही शोभा आपल्यामुळे नष्ट होणार नाही याची प्रत्येकाने मनापासून काळजी घ्यायला हवे.

महत्त्वाचे मुद्दे.या विषयावर आधारित लेखन करताना खालील मुद्यांचा विचार केला पाहिजे.

  1. जैविक विविधता
  2. जैवविविधतेचे प्रकार
  3. परिसंस्था ecosystem
  4. नैसर्गिक साधन संपत्ती
  5. ग्लोबल वॉर्मिंग global warming
  6.  परिस्थितीकी इकॉलॉजी
  7. प्राणी व वनस्पती यांच्या मधील परस्परावलंबन.
  8. माणसाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या.
  9. या सर्व मुद्द्यांचा विचार वरील निबंध लिहिताना केला गेला पाहिजे .म्हणजे निबंध अधिक आकर्षक व अभ्यासपूर्ण वाटेल.



वरील निबंधांचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.

१) |पर्यावरण शिक्षण
२) |पर्यावरणाचे महत्व
३) |पर्यावरण रक्षण काळाची गरज
४)| मानव आणि पर्यावरण
५)| पर्यावरणाचे महत्व
 ६) पर्यावरणाचे महत्व स्पष्ट करा
 पर्यावरणाचे कोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात
 पर्यावरणाचे प्रकार कोणते
पर्यावरणाचे घटक कोणते
 पर्यावरणाचे प्रकार



          निबंध कसा वाटला हे नक्की सांगा तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर contact us या बटनावर क्लिक करून आमच्याशी संपर्क करू शकता.

3 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने