1001marathiessay.blogspot.com
गल्लोगल्ली नंगा करीत आहे दंगा
15 ऑगस्ट 26 जानेवारीला फक्त
फडकतो झेंडा तुम्हीच सांगा मित्रांनो
फडफडतो का तडफडतो तिरंगा ?
अशा काव्यपंक्ती जेव्हा वाचल्या त्यावेळी झेंडा फडकतो का तडफडतो ? ,या प्रश्नांने माझं मानाने भरलेलं मात्र कळवळलं आणि वाटलं का असं म्हणण्याची आणि ऐकण्याची वेळ आली ? काय एवढ विपरीत घडलं ?काय अंदाधुंदी माजली आहे ?का? का? का? तेव्हा मनातून एक आर्त आवाज आला सारख्याच हाडामासाची माणसे पण त्यांच्यात एवढे भिन्नता व विषमता का?
पण एखाद्या बातमीने एवढ्या पराकोटीचे विचार मनात येणे कधीही अयोग्यच. एकेकाळी गुलामीत पिचलेला यवनांच्या तापाने पिंजून निघालेला आणि पारतंत्र्याच्या विषाने अस्थिपंजर व जर्जर झालेला हा विशाल देशरुपी महामानव आज स्वातंत्र्याच्या वीर रसाने सुमारे पंच्याहत्तर वर्षांचा झाला आहे आणि ताठ मानेने उभा आहे.
या विशाल वटवृक्ष कडे पाहून आपले डोळे विस्तारित होतात त्याचे बीज हे मोहरी पेक्षाही सूक्ष्म आहे .ते बीज म्हणजे राष्ट्रीय एकात्मता ही राष्ट्रीय एकात्मता आपण आपल्या देशात विविध धर्मांचे विविध जातीतील विविध पंथांचे लोक राहत असूनही सर्वांनी एकत्र राहून गुण्यागोविंदाने वागून जतन केलेली आहे. आणि असे समग्र चित्र बघितले की मला काही काव्यपंक्ती आठवतात त्या अशा
" वरी केशरी मध्ये पांढरा
खाली हिरवा रंग
अशोकचक्र शोभतो
निळसर रंग"
अशा या राष्ट्रीय देशाची एकात्मता झालेली दिसून येते
एकात्मतेच्या या शक्तीमुळेच आपल्या या देशाने स्वातंत्र्याच्या या वर्षांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे .ही एकात्मता सुद्धा अनेक देशभक्तांच्या बलिदानानं पुष्ट झालेली आहे.
पूर्वी ही विशिष्ट व्यक्ती समूहाच्या कामाच्या प्रकारावरून समाजात त्या व्यक्ती समूहाचे वर्गीकरण होत असे ,परंतु त्यानंतर व्यक्तीच्या जन्मावरून त्या व्यक्तीचे वर्गीकरण होताना दिसून येते .ही बाब फारच खेद कारक आहे .असे असूनही देशाची प्रगती होताना दिसून येते. त्यामुळे आता फक्त एखाद्या विशिष्ट वर्गाचा किंवा विविध वर्गांसाठी वरचेवर अभ्यास करून चालणार नाही तर संपूर्ण लोकसंख्या व त्यामध्ये असलेल्या विविध जन भागाचा योग्यपणे अभ्यास होणे गरजेचे आहे. त्याचे तटस्थ विश्लेषण होणे अत्यंत आवश्यक आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत आज भारताचा जगात चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो .भारतामध्ये तरुण वर्गाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. राष्ट्रीय अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे .माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही राष्ट्राची शक्ती ही त्यातील युवकांच्या शक्ती पेक्षा जास्त असू शकत नाही . मग हिच युवाशक्ती हेच तारूण्य भारतात सर्वात जास्त आहे ,पण विविध जातीत ,विविध धर्मात ,सामाजिक आर्थिक व बौद्धिक विषमतेत ही गुणवत्ता विभागलेली आहे .
फार मोठा जनभाग इतर मागास प्रवर्गातील आहेत .या प्रवर्गात सर्वात मोठा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे .त्यातील बर्याच जाती-जमाती आजही विकासाच्या वाटा पासून अनभिज्ञ आहेत.
अनुसूचित जाती जमातीतही उच्च स्तराची बुद्धिमत्ता आहे .काही अपुऱ्या सुविधांमुळे ही बुद्धिमत्ता विकसित होऊ शकले नाही किंवा प्रकाश झोतात आलेली नाही .या सर्व आणि अशा अनेक समस्यांवर एक पर्याय रामबाण औषधाच काम करू शकतो ते औषध म्हणजे जातिनिहाय जनगणना .
जातीनिहाय जनगणनेची आपल्याला अनेक प्रकारे फायदे होऊ शकतील जस
- एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विशिष्ट जातीची टक्केवारी किती आहे ते कळेल
- दलित समाजाची सामाजिक स्थिती कळू शकेल
- देशाच्या विकासात बाधक असलेल्या गोष्टी कळतील
- विकासात अडसर ठरणार या समस्यांवर उपाय सुचवता आणि राबवता येतील दे
- प्रगतीत विशिष्ट जन भागाला कसे समाविष्ट करायचे याविषयी उपाययोजना करता येईल
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आजवर जात पंचवार्षिक योजना काही वार्षिक योजना राबविण्यात आल्या यांमधील त्रुटी शोधून त्यापेक्षा वेगळ्या कोणत्या प्रगती कारक योजना राबवता येतील याविषयी मार्गदर्शन मिळेल
- स्त्रियांचे प्रमाण कळेल
- समाज व्यवस्था पुष्ट करण्यासाठी योग्य त्या योजना राबवण्यात मार्गदर्शन मिळेल....
सद्यस्थितीला पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या फारच कमी होत चाललेले आहे एक वेळ अशी स्थिती येईल की महाभारतात रा महाभारतातल्या पांडव आणि द्रौपदी यांच्या सारखी अवस्था होईल घोर अंधकार ओढवेल जातनिहाय जनगणनेमुळे एखाद्या विशिष्ट जातीत किंवा समाजात स्त्रियांची व पुरुषांची संख्या यांचे गुणोत्तर आपल्याला कळेल वजा समाजात चिंताजनक परिस्थिती आहे त्यातील स्त्री संख्या वाढवण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवता येतील व व्यभिचाराच्या संकटातून वाचून संस्कृती जतन करता येईल .येणाऱ्या काळ्या भविष्याला आशेच्या किरणाने उजळून काढणारी ही जातिनिहाय जनगणना मला अतिशय मोलाची वाटते.
स्वातंत्र्यानंतर सुद्धा दलित समाज उपेक्षित असलेला दिसून येतो कारण तो नेहमीच नजरेआड राहिलेला दिसतो. बराच दलित समाज यांच्या सहवासातही आला तरीपण तो उपेक्षितच राहिला. त्याला तेवढीशी प्रतिष्ठा मिळाली नाही . कारण तो उपेक्षित समाज संघटित राहू शकला नाही. आपली संख्या किती आपले मनुष्यबळ किती याविषयी तो समाज अनभिज्ञच राहील . त्यामुळे त्यांची प्रगती योग्य प्रमाणात होऊ शकली नाही. विलग राहिल्यामुळे त्यांची शक्ती एकत्रित येऊ शकले नाही .आणि शाहू महाराज असे म्हणतात की फक्त एका काडीला काहीच किंमत नसते तर काड्यांच्या पूर्ण भार याला किंमत असते . त्यातच एकजूट असते. हे या जातीनिहाय जनगणनेतून साधता येईल ,कारण विचाराला सामर्थ्य येण्यासाठी त्यामागे एकजुटीची शक्ती आवश्यक असते आणि स्वैराचार याने बरबटलेल्या या समाजाला या वर्गाला एकजूट प्रदान करण्यासाठी या जातीनिहाय जनगणनेची फारच गरज आहे असे मला वाटते.
जातनिहाय जनगणनेमुळे सर्व समाजांच्या किंवा जातीच्या सामाजिक आर्थिक बौद्धिक स्थितीविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे .त्यामुळे कोणत्या समाजाला विकासासाठी विकास योजनांची विशेष गरज आहे याचा अंदाज येईल . त्या अनुषंगाने विविध योजना विकसित करता येतील .आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ही जातिनिहाय जनगणना मला फारच आवश्यक वाटते नव्हे ती तर या काळाची गरज आहे
जातनिहाय जनगणनेमुळे ब्रिटिशांचे डिव्हाइड अँड रुल हे ब्रीद डिव्हाइड द प्रॉब्लेम अँड रूल द वर्ल्ड असे बदलून म्हणणे भाग पडेल .या सर्वांमुळे जातिनिहाय जनगणना मला काळाची गरज वाटते.
ज्याच्याकडे निबंध लेखन कला आहे तो कोणतीही घटना विस्तारपूर्वक व जशीच्या तशी इतरांना सांगू शकतो .हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. निबंध कला विकसित करण्यास निबंध लिहिण्याचा सराव केला पाहिजे . विविध निबंध वाचले पाहिजेत.
तसंच हा खालील निबंध तुम्ही वाचा व वाचून झाल्यानंतर तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.