कुठल्यातरी एका चित्रपटांमध्ये अनेक वर्षांपुर्वी एक वाक्य ऐकले होते,' क्रोधको पालना सिख लो '. हेच वाक्य मराठीत सांगायचे झाले तर," क्रोधाला जतन करायला शिक." 
      वाक्य तसं फारच लहान आहे परंतु आचरणात आणायला अच्छे-अच्छे की सिटी बज जाती है!
        "हे बघ माझं डोकं फिरवू नकोस."," माझ डोकं फिरलं तर काही खरं होणार नाही ," माझ्या नादी लागू नकोस.","कशी जिरवली त्याची."
   हे असे वाक्य आहेत जे आज पर्यंत आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कोणालातरी बोललेले असतीलच. मनातल्या मनात का होईना किंवा सरळ-सरळ तोंडावर का होईना. पण पण हे किंवा अशा अर्थाचे वाक्य वापरले नाहीत असा अजातशत्रू आत्ताच्या काळात मिळणे जवळजवळ दुर्मिळच आहे.
    अशी वाक्य मार्च 2020 यापूर्वीही बऱ्याचदा मी मोठ्या प्रमाणात वापरलेले आहेत. मात्र गेल्या चार सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ही वाक्ये जवळजवळ माझ्या बोलण्यातून नाहीशी झालेली आहेत. याचं कारण फक्त कोरोणामुळे झालेले लोकडाऊन  एवढेच नाही.  लोकडाऊनमुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण बघितले असताना टीव्ही मध्ये फक्त आजचा आकडा किती हे एवढे हेडलाईन बघून मी शांत बसत असे परंतु ज्यावेळी स्वतःच्या जीवनातील आणि नातेसंबंधातील प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जातो, तेव्हाच दुःखाची तीव्रता आपल्याला जाणऊ शकते. 
    माझा याचा आधीचा लेख तादात्म्य हा मला त्यावरूनच सुचला होता.सुचला होता म्हणण्यापेक्षा परिस्थितीनेच माझ्याकडून लिहून घेतला होता.
      आमच्या घरामध्येच अध्यात्मिक वारसा असल्यामुळे अनेक ग्रंथसंपदा आणि संतांची चरित्रे माझ्या वाचनातून गेलेली आहेत. त्यातील काही संतांची वचने माझ्या आजही अत्यंत ठळकपणे लक्षात आहेत. त्यातील काही मी तुम्हाला सांगतो,
१. का रे भ्रम धरिसी या देहाचा,
          नाही भरवसा याचा.
२.क्षणभंगुर नाही भरवसा 
       व्हारे सावध थोडा माया अशा
३.आउट हातका मानव देह 
      अल्लाहने तुझे दिया 
       खाया पिया सुख से सोया 
      नाहक जमाना खोया.
      मनुष्य जगत असताना  स्वतःच्या कोशात  जगत असतो. मी तुम्हाला काही साधे प्रश्न याठिकाणी विचारतो.
     हा लेख वाचताना थोडं थांबा आणि ह्या प्रश्नांची मनातल्यामनात उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
१) तुम्हाला जीवनात आनंद  केव्हा होतो?
 २) याच्या आधी तुम्हाला सर्वात जास्त आनंद कधी झाला होता?
३) आज पर्यंतच्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? 
      थोडं थांबून तुम्ही विचार केला असेलच अशी अपेक्षा करतो आणि पुढे जाऊया.
तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणात बद्दल केलेल्या विचारांबद्दल काही अंदाज मी तुम्हाला खाली सांगतो ते बरोबर आहेत की नाही ते सांगा.
अंदाज क्रमांक १
 आनंदाच्या प्रत्येक क्षणांमध्ये बऱ्याच वेळा तुमच्या कुटुंबातील तुमच्या मित्रांमधील व्यक्ती समाविष्ट असेलच.
अंदाज क्रमांक 2
तुम्हाला आज पर्यंत झालेल्या आनंदाच्या क्षणांमध्ये तुम्ही तुमचे तुमच्या जवळचे ह्याच गोष्टींचा किंवा व्यक्तींचा संबंध आलेला तुम्हाला दिसेल.
       असा एक विचार करा कि, 
येत्या दोन दिवसांनी जर तुमचा मृत्यू झाला तर कुणाला काय फरक पडेल? किंवा तुमच्या मृत्यूमुळे कोणाच्या जीवनावर परिणाम होईल?
       ह्या प्रश्नाचा विचार करतानाही आपल्या मनात सुरुवातीला आपल्या घरातील माणसे आणि नातेसंबंधातील माणसे, आपला मित्रपरिवार यांच्याविषयी विचार नक्की येईल ,परंतु प्रत्यक्ष ज्यांच्या आयुष्यावर परिणाम होईल यांच्या यादीत मात्र फक्त आपल्याशी प्रत्यक्ष संबंध असलेले व्यक्ती उदाहरणार्थ: आपला मुलगा, आपले आई-वडील,  पत्नी एवढेच घटक राहतील.
    यांच्यावर देखील परिणाम काही काळापुरता होईल नंतर त्यांनाही सवय होईल आणि काळाच्या पडद्याआड गेलेले तुम्ही त्यांच्या आठवणींच्या पडद्याआड जायला ही  वेळ लागणार नाही.
     सध्याच्या काळामध्ये जगणं फार अवघड झालं आहे परंतु मरण अगदी सहज आणि फुकट मिळेल अशी व्यवस्था काळाने करून ठेवलेली आहे. असे असतानाही मनुष्य कोणत्या माजामध्ये जगत असतो. उद्दामपणे वागणारे अनेक लोक याच मातीत आले आणि याच मातीत गेले.

      एवढ्या काकुळतीने मला तुम्हाला या सर्व गोष्टी सांगण्याची गरज का वाटते आहे कारण की व्यर्थ  भ्रमात जगणे सोडा . आपल्याला जो व्यक्ती भेटेल त्या व्यक्तीशी प्रेमाने वागत चला .दोन शब्द प्रेमाचे बोला आपुलकीने त्याला त्याच्या आरोग्याची घरच्यांची याविषयी विचारपूस करा. गेला क्षण पुन्हा मिळेल याची काहीही शाश्वती नाही आणि आयुष्याचीही आता काही शाश्वती नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला जपा घरची असोत ,परिसरातले असोत जातीची असोत अथवा नसोत परंतु प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून बघा आणि माणूस म्हणून जगा मग बघा गम्मत.
      वरती मी जे प्रश्न विचारले आणि त्यांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या घरातलीच माणसे आठवली. त्याच प्रश्नांच्या उत्तरात मग तुम्हाला इतर सगळे माणसेही दिसू लागतील.
    आपण खुप श्रीमंत आहोत, रुपवान आहोत, आरोग्यवान आहोत ह्या खोट्या भ्रमात राहू नका. भ्रमाचा भोपळा हा कधी ना  कधी  फुटतोच. फक्त तो भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर आपल्या  आठवणीने कधीही एखाद्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या व्हाव्यात अशा पद्धतीने आचरण ठेवा.
       तुम्ही कसे वागावे, कोण कोणत्या गोष्टी करू नका, कोणत्या गोष्टी करा, हे सर्व सांगण्याइतका मी महान नाही आणि तुम्ही लहान नाहीत .आपण सर्वे जाणते आहात.
           
              धन्यवाद ....











    
कृपया ब्लॉगवर असलेल्या सदस्यता घ्या या ठिकाणी क्लिक करा व तुमचा ई-मेल टाकून ब्लॉग ला सबस्क्राईब करा . आणि ब्लॉग ला फॉलो करायला अजिबात विसरू नका.

तुम्हाला आमच्याशी तुमच्या कल्पना शेअर करायच्या असतील काही सुचवायचे असेल तर  contact us या बटणावर क्लिक करा आणि तेथे माहिती भरा. तुमच्या सर्वांच्या सूचनांचे तुम्ही खूप स्वागत करू धन्यवाद





1001marathiessay.blogspot.com

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने