1001marathiessay.blogspot.com

सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा वेगळा गणला जातो तो त्याच्या बोलण्याच्य क्षमतेमुळे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्य आपल्या भावना, इच्छा ,आशा ,अपेक्षा बोलून व्यक्त करू शकतो.
     बोलण्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करणारी माणसे आपल्याला जागोजागी बघायला मिळतात. काही माणसे इतकी बोलतात की समोरच्या माणसाला कंटाळा येतो. तर काही माणसे फारच मितभाषी असतात.
       खूप बोलणारी माणसे तर आपण पदोपदी बघतो. पण समजा जर पक्षी आपल्याशी बोलू लागले तर किती मजा येईल .त्यांच्या न समजणार्‍या भावना आपल्याला लगेच समजून घेता येतील. असाच एक छानसा निबंध आपण बघूया.

   पक्षी बोलू लागले तर /

पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध, pakshi bolu lagale tr marathi nibandh,pakshi bolu lagale tr nibandh in Marathi.

   शनिवारचा दिवस होता शाळा . शाळा सकाळी लवकर होती .पटकन आंघोळ करून चहा पिला आणि दप्तर पाठीला अडकवले.शाळेला जाण्याच्या रस्त्याला दोन्ही बाजूने भरपूर झाडे आहेत. म्हणून त्या रस्त्याने जाताना खूप गार वाटते .उन्हाळ्यात सुद्धा सावलीमुळे ऊन लागत नाही. गाणे गुणगुणत शाळेत गेलो.
      आज शाळेत मराठी विषयाच्या तासाला शिक्षकांनी एक फार छान कविता शिकवली .त्या कवितेतील वाक्य होते ,
       बिन भिंतीची उघडी शाळा 
      लाखो इथले गुरू 
       झाडे वेली पशु पाखरे 
        यांची दोस्ती करू

   कविता मला फारच आवडली .किती सुंदर शब्द आहेत. फक्त शाळेच्या चार भिंतीतच शिकायला भेटते असे नाही .तर हा निसर्ग म्हणजे एक जिवंत गुरूच आहे. जो सदोदित आपल्याला ज्ञानाचे अमृत पाजत असतो .परंतु आपल्याला ते समजत नाही .कवितेतील झाडे वेली पशु पाखरे यांच्याशी दोस्ती करू हे वाक्य मला फारच आवडले.
     शाळा सुटली .उद्या सुट्टी या आनंदाने पळतच शाळेबाहेर निघालो. शाळेच्या गेटमधून बाहेर निघालो आणि घराच्या रस्त्याला लागलो.रस्त्याने जाताना झाडांचे निरीक्षण करत जात होतो. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते . कवितेतील ओळी ही आपोआप तोंडातून बाहेर पडत होत्या . असेच एका झाडाजवळ आल्यानंतर मला आवाज आला," फार छान गातोस ."मी इकडे तिकडे बघितले. तितक्यात पुन्हा आवाज आला," इकडे तिकडे नको, बघू मी बोलत आहे .इथे वर बघ झाडावर" . वर बघितले तर फक्त तिथंं काही पक्षी बसलेले होते. त्यामुळेे मी पुन्हा इकडे तिकडे बघू लागलो .परत आवाज आला," अरे वर बघितलंस ना,मी पक्षी बोलत आहे या झाडावर बसलेला."
      मला फारच आश्चर्य वाटले आणि थोडीशी भीती देखील  वाटली. झाडावरचा तो छान पक्षी म्हणजे पोपट होता. पोपट म्हणाला ,"अरे इतका काय घाबरतोस ?तुला काय आम्ही पकडून नेत नाही. ते काम तुम्हाला माणसांनाच फार चांगलं जमतं. पक्ष्यांना पकडून घेतात आणि पिंजऱ्यात टाकून देतात. पिंजऱ्यात आमच्याकडे बघून तुम्हाला फार छान वाटतं. पण आम्ही मात्र बंदिस्त असतो ना. आम्हाला त्या पिंजऱ्यामध्ये आमचे स्वातंत्र्य गमावून किती वाईट वाटतं हे आम्हाला सांगता येत नाही, पण तू आता आमचा मित्र झालेला आहेस म्हणून तुझ्याशी गप्पा मारल्या पाहिजेत असं वाटतंय."

 
   पोपट मोठ्या तावातावाने बोलू लागला." इथे एक तर आमच्या जीवाला खूप धोका निर्माण झाला आहे. जो तो आपल्या घरात पक्षी पिंजऱ्यात ठेऊ पाहतो आहे. पिंजऱ्यामध्ये इकडे तिकडे फिरणे म्हणजे आम्ही मजा करतो आहे असे वाटते ,परंतु ती आमची तडफड असते पिंजर्‍यातून बाहेर पडण्यासाठी.
     पिंजऱ्यात आम्हाला बरेच पदार्थ खायला तुम्ही घालतात .तुम्हाला असे वाटते की हे अन्न खाऊन आम्ही आनंदात आहोत.. परंतु आम्ही अजिबात आनंदात नसतो. स्वतःच स्वातंत्र्य गमावून कोणी आनंदात राहू शकतो का? स्वातंत्र्य असताना आलेल दुःखही माणूस पचवतो पण  पारतंत्र्यात कितीही सुख असले तरी त्याला खूप मर्यादा असतात.
    पक्ष्यांच्या नशिबात तर जन्मापासूनच संघर्ष असतो .ज्यावेळेस पक्षी अंडी घालतात त्यावेळी साप व इतर मोठे पक्षी त्या अंड्यांना नष्ट करण्यात सदैव तयार असतात. यातून आम्ही वाचलो तर मग पुढे आमचा जीवन प्रवास सुरू होतो. आम्ही मोठ्या कष्टाने सगळीकडे फिरून आपल्या पिलांसाठी अन्न गोळा करून आणतो. त्या पिलांना राहण्यासाठी सुंदर गवताच्या काड्यांनी छान मऊ घर बनवतो. तिथेही  इतर पक्षी पाठलाग सोडत नाही. काही पक्षी आमचे घरे मोडून टाकतात.इतक्या प्रेमाने बनवलेले घर उध्वस्त झालेले बघून आम्हाला खूपच वाईट वाटते . परंतु आम्ही रडत न बसता पुन्हा नव्याने घरटे बनवायला सुरुवात करतो.

       जीवनात कोणत्याही प्रसंगी कधीही हार मानायची नाही. आलेल्या प्रत्येक संकटाचा जोशाने मुकाबला करायचा .आयुष्य हे एकदाच मिळते ते भरभरून जगायचे .आपल्याकडे बघून इतरांना जगण्यासाठी प्रेरणा मिळायला हवी .आयुष्य किती सुंदर आहे असेच त्यांना वाटावे. अशा पद्धतीने आपण जीवन जगायचे असते.
       एक पक्षी जीवन जगण्याचे एवढे महान तत्वज्ञान मला सांगत आहे. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या बोलण्यात एक अर्जव होती . अगदी मनापासून आपल्या भावना तो पक्षी व्यक्त करत होता .त्याचे बोलणे ऐकून मला फारच हुरूप आला.
      चल आता भरपूर गप्पा मारल्या. आता गेलं पाहिजे माझ्या पिलांसाठी अन्न  गोळा करायला .थांबून चालणार नाही असं म्हणून तो पोपट उडून गेला. मी त्याला म्हटलं परत कधी भेटणार? पोपट घाईघाईतच म्हणाला हो भेट होईलच  मी या रस्त्याला नेहमी येत असतो.
   पोपट उडून दूर जाईपर्यंत मी त्याच्याकडेच बघत होतो .मला उपदेश करून दूर जाणारा तो पोपट म्हणजे मला माझा  गुरुच  वाटू लागला .बिनभिंतीच्या उघड्या शाळेमध्ये आज मला फारच मोला ची गोष्ट शिकायला भेटली.
      



निबंध लिहिणे ही एक कला आहे . ही कला शिकण्यासाठी आधी भरपूर वाचन करणे आवश्यक आहे .वाचनातून चिंतन मनन करून नवीन नवीन विचार  सुचतात. हा निबंध वाचून झाल्यानंतर तुम्ही थोडेसे चिंतन-मनन करून तुमच्या मनाने निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा.
निबंध कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका .तसेच ब्लॉगला इमेल टाकून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या ब्लॉगवर जेव्हा निबंध किंवा लेख टाकल्याबरोबर माहिती .
 ब्लॉग शेअर करायला अजिबात विसरू नका.
तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे निबंध हवे असतील तर त्या निबंधांचे विषय सुचवा नक्कीच तो निबंध तुमच्या मदतीसाठी लिहीण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने