upkarmarathi.com
प्रत्येक राष्ट्राची अस्मिता त्या राष्ट्रात घडलेल्या विविधांगी इतिहासाने घडत असते. ही अस्मिता सतत जागी राहिली तरच राष्ट्राचे मन तरुण राहते. त्याचे कर्तृत्व फुलते. त्याचा उत्साह आणि महत्त्वाकांक्षा कधीही मंदावत नाहीत .प्राण नसेल तर देशाचे काय होईल .अस्मिता नसेल तर राष्ट्राचे काय होईल .अस्मिता जागी ठेवण्यासाठी राष्ट्राच्या इतिहासातील विद्वान कर्तुत्वाचा समाजसुधारकांचा संतांच्या महानतेचा अभिमान बाळगला पाहिजे.
अशाच एका महान इतिहास पुरुषाचा आपण या निबंधांमध्ये परिचय करून घेणार आहोत. याचा उपयोग विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर लहान विद्यार्थ्यांना देखील होऊ शकतो .त्यामुळे हे माहिती काळजीपूर्वक वाचा म्हणजे भविष्यात कधी कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
चला तर मग बघूया राजा राम मोहन रॉय यांच्या विषयी माहिती.
=============================
राजा राममोहन रॉय
| raja ram mohan roy information in marathi
| Raja Ramamohan Roy ,
very important information for mpsc/upsc/combine exams/psi/sti/assistance aspirant
राजा राममोहन रॉय
[इसवी सन 1772 ते 1833]
राजा राम मोहन रॉय यांचे पूर्ण नाव राममोहन रमाकांत रॉय असे होते. त्यांच्या आईचे नाव तारीणीदेवी होते. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी अरबी आणि फारशी भाषेचे अध्ययन सुरू केले.
दिल्लीचा मोगल बादशहा दुसरा अकबर याने राममोहन रॉय यांना राजा हा किताब देऊन सन्मानित केले.
इसवीसन 1799 मध्ये बनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले.तसेच फ्रेंच ,इंग्रजी, हिब्रू, ग्रीक व लॅटिन भाषांचाही त्यांनी चांगला अभ्यास केला.
उमादेवी यांच्यासोबत त्यांचा बालविवाह झाला होता .पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी दोन विवाह केले.
त्याची विशेषता सांगायचे झाले तर त्यांना
- आधुनिक भारताचे जनक
- मानवतावादी समाजसुधारक
- इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय
असे म्हटले जाते.
बालविवाह, बालहत्या ,केशवपन ,जातीभेद ,बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथाना त्यांनी विरोध केला .त्यांनी विधवा पुनर्विवाह चे समर्थन केले आणि समाजात विधवांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला.
- राजा राम मोहन रॉय यांनी "गोदिया " हे बंगाली भाषेच्या व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले .
इसवी सन 1803 मध्ये त्यांनी तूहफत उल मुवाहिद्दिन (एकेश्वरवाद्यांना नजराना) नावाचा फारशी भाषेतील ग्रंथ लिहिला.
इसवीसन 1809 मध्ये रंगपुर येथे कलेक्टर जॉन डीबी यांचा दिवाण म्हणून त्यांनी नोकरी पत्करली .
इसवी सन 1815 मध्ये त्यांनी "आत्मीय सभा" स्थापन केली . इसवीसन 1817 मध्ये त्यांनी "हिंदू कॉलेजची" स्थापना केली. इसवीसन 1821 ते 1822 मध्ये त्यांनी बंगाली भाषेत "संवाद कौमुदी" व फारशी भाषेत "मिरात उल अखबार " अशी दोन साप्ताहिके काढले . इसवीसन 1822 मध्ये त्यांनी "अँग्लो हिंदू स्कूलची "स्थापना केली.
इसवी सन 1826 मध्ये संस्कृत वांगमयाचा अभ्यासासाठी व हिंदू एकेश्वर वादाच्या समर्थनासाठी त्यांनी "वेदांत कॉलेजची " स्थापना केली.
इसवीसन 1828 मध्ये कलकत्ता येथे त्यांनी "ब्राम्हो समाजाची "स्थापना केली.
राजा राम मोहन राय यांनी सतीच्या अनिष्ठ व अमानुष प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभारली .
सतीची चाल धर्मविरोधी आहे असे त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा आधार घेऊन प्रतिपादन केले .त्यांनी केलेल्या लोकजागृती मुळेच तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी इसवीसन 1829 मध्ये सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला.
राजा राम मोहन राय यांचे विचार
प्रेम, सेवा व परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ होय असे समजून सर्वांनी परस्परांशी व्यवहार करावा .
भारतीयांनी जुन्या विद्या व धर्मग्रंथ यांच्या अध्ययन आतच गुरफटून न पडता गणित व भौतिकशास्त्र यांचे शिक्षण घ्यावे .
धर्मशास्त्राने सांगितलेले विचार स्वतःच्या अनुभवावर आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिले पाहिजेत .
ब्राह्मण म्हणजे ब्रम्ह म्हणजे ब्रह्माचे उपासना करणारा ब्रह्म म्हणजे विश्वाचे अंतिम तत्त्व या अंतिम तत्वाची उपासना करणारा तो ब्राम्हो समाज होय.
इतक्या जुन्या काळात इतके क्रांतिकारी विचार असणारे राजा राम मोहन रॉय इतिहासाच्या पटलावर नेहमीच लक्षात ठेवले जातील .
त्यांचा मृत्यू
27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंड येथे झाला.
खुप चांगली माहिती वाचायला मिळाली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.