1001marathiessay.blogspot.com
   
                                   


     माझे आवडते संत एकनाथ महाराज/संत एकनाथ महाराज यांची माहिती मराठी मध्ये maze aawdate sant  sant eknath nibandh in Marathi/maze aawdate sant  nibandh in Marathi




       आपल्या भारत देशामध्ये अनेक संतांनी अवतार घेतला त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये तर फार मोठी संत परंपरा लाभली आहे संतांनी या भूमीत जन्म घेऊन हे भूमी पावन केलेली आहे त्यांचे कर्म आणि त्यांची शिकवण यावर समग्र महाराष्ट्र अनेक वर्षांपासून चालत आहे त्यामुळे अध्यात्मिक क्षेत्रात महाराष्ट्र सदैव अग्रेसर दिसतो आणि तो अग्रेसर आहे यात तिळमात्रही शंका नाही अशाच एका महान संतश्रेष्ठांच्या महिमा आणि महात्म्य आणि त्यांचे कार्य आपण या निबंधामध्ये बघूया.

                   संत एकनाथ


      वारकरी संप्रदायातील सर्व भाविकांच्या गळ्यातील ताईत

                                     संत एकनाथ यांचा जन्म शके 1426 (इसवी सन  1504) मध्ये पैठण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते एकनाथांच्या बालपणीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केली

          एकनाथांना बालपणापासूनच हरी भक्तीची ओढ होती त्याच्या परिणामी याच्या बाराव्या वर्षीच ते आजोबांना न सांगताच देव गडावर गेले आणि त्या ठिकाणी सादर स्वामी यांना गुरु केले जनार्दन स्वामींनी त्यांना हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ शिकविले सहा वर्षानंतर एकनाथांना गुरुकृपेने सुलभ पर्वतावर सगुण साक्षात्कार झाला.
          एकनाथ व जनार्दन स्वामी यांनी तीर्थयात्रा केली दरम्यान पंचवटीस एकनाथ यांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून चतुश्लोकी भागवत आवर ओवीबद्ध टीका रचली पुढे जनार्दन स्वामी देव गडावर परतले आणि एकनाथांनी एकट्यानेच तीर्थयात्रा पुढे चालू ठेवली यानंतर त्यांनी काशी प्रयाग मथुरा द्वारका इत्यादी प्रसिद्ध तीर्थे पाहिली दैनिक साधुसंतांच्या भेटी घेतल्या प्रवास करीत करीत ते वयाच्या पंचविसाव्या वर्षी पैठणला आले त्यानंतर एकनाथांचे लग्न झाले त्यांच्या बायकोचे नाव गिरीजा असे होते
           एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या शुद्ध अशुद्ध पाठांची चिकित्सा करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली आज हीच प्रत वारकरी संप्रदायात सर्वमान्य ठरली आहे एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचाही जीर्णोद्धार केला.
           एकनाथांनी चतुश्लोकी भागवत, रुक्मिणीस्वयंवर ,एकनाथी भागवत ,भावार्थ रामायण इत्यादी श्रेष्ठ ग्रंथांचे मराठीत रचना केले याशिवाय भारुडे पदे गवळणी इत्यादी त्यांच्या रचनादेखील प्रख्यात आहे.
          सर्व संतांनी समतेचा पुरस्कार केला परंतु जातिभेद यांवर खऱ्या अर्थाने प्रहार करण्याचे कार्य नाथांनी केले संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या नंतर काहीशा क्षीण झालेल्या भागवत धर्माचे पुनरुज्जीवन एकनाथानी केले आपल्या भागवती टीकेने त्यांनी भक्ती पंथाची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि त्या भोवती महाराष्ट्रातील बहुजन समाजाला संघटित केले अशाप्रकारे भागवत धर्माची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य संत एकनाथांनी केले.
        शके  1521 (इसवी सन 1599) मध्ये पैठण येथे त्यांनी देह ठेवला आणि एक क्रांतिवीर  शांत झाला.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने