खांदा आणि हात shoulder and hand एक सुंदर वाचनीय मराठी लेख.

  खांदा आणि हात हे शारीरिक दृष्ट्या बघितले तर  एकमेकांच्या जवळ असलेले अवयव आहेत. पण दैनंदिन जीवनात वागत असताना किंवा जगत असताना या दोन्ही अवयवांचा उपयोग मात्र भिन्न अर्थाने घेतला जातो .म्हणजे बघा ना एखाद्या व्यक्तीला खांदा दिला आणि एखाद्या व्यक्तीला हात दिला या दोन्ही वाक्यांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे असे म्हणण्यापेक्षा जीवन आणि मृत्यूचा फरक आहे.
    खांदा देणे हे आध्यात्मिक दृष्ट्या पवित्र कार्य समजत असले तरीही आपण ज्या व्यक्तीला खांदा देतो त्या व्यक्तीला त्याचा काहीही उपयोग नसतो.
    म्हणून मला असे वाटते एखाद्याला हात देणे हेच मनुष्यजन्माचे खरं सार्थक आहे. पूर्णजन्म मध्ये आपण किती जणांना मदतीचा हात दिला? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला तर आपल्या हाताचे महत्व आणि आपण केलेला त्याचा योग्य वापर यातील अंतर समजायला वेळ लागणार नाही.
  _माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे ,_
_तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत.......??_

खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत ...... पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत ....,
खरतर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत ,तु मोठा की मी मोठा, ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्या पायी, माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय,म्हणुनच बोलतोय 
जीवंतपणी,*
जिवंत माणसासाठी* 
जिवंत असणाऱ्या,*
अडचणीत सापडलेल्या ,*
एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या..*
झालं गेलं विसरून, माणुस व्हा
_मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल.......

      माझ्या शाळेत शिकवत असताना एक स्वतंत्र तासीकेचे  मी आठवड्यातून दोनदा नियोजन करतो . त्या काशी केचे नाशिकचे तासिकेचे नाव आहे मदतीचा हिशोब.
  माझे सर्व विद्यार्थी आठवड्याभरात  ह्या दोन तासिकाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात.  या तासिकांमध्ये त्यांना स्वतःचे मन आणि कर्तुत्व सांगण्याची एक मोकळी संधी मिळते.
    संपूर्ण आठवडाभर आपण कोण - कोणाला कशा पद्धतीने मदत केली? आपल्याकडे मदत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आपण मदत केली किंवा नाही? तसेच घरातील आपल्या प्रियजनांना त्यांनी न मागता आपण मदत केली किंवा नाही ?आणि कशा पद्धतीने केली? याचा वृत्तांत या दोन तासिका मध्ये सांगण्याची व्यवस्था केलेली आहे .यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये  फारच सकारात्मक बदल घडताना दिसून येत आहे. सध्या लॉकडाऊन काळामध्ये अनेक चांगल्या हृदयाच्या माणसांनी कोरणाकाळात गरजवंतांना मदत केली सर्वांसाठी हा एक नवीन आणि भयानक अनुभव आहे परंतु चिखलातच कमळ उगवते ना !!
या अडचणीच्या काळातच खरं व्यक्तिमत्त्व खुलून येईल आणि जीवन जगण्याची योग्य दिशा आपल्याला मिळत जाईल. म्हणून घाबरून जाऊ नका. हात द्या साथ द्या एकमेकांना मदत करा आणि मग तेव्हा आपण म्हणू शकतो ,
      एकमेका सहाय्य करू ,
         अवघे धरू सुपंथ .
                 
                  धन्यवाद....

लेखन कसे वाटले याविषयी नक्की कळवा . कमेंट करा इतरांनाही वाचण्यासाठी पाठवा. 
                      खूप खूप धन्यवाद.


कृपया ब्लॉगवर असलेल्या सदस्यता घ्या या ठिकाणी क्लिक करा व तुमचा ई-मेल टाकून ब्लॉग ला सबस्क्राईब करा . आणि ब्लॉग ला फॉलो करायला अजिबात विसरू नका.

तुम्हाला आमच्याशी तुमच्या कल्पना शेअर करायच्या असतील काही सुचवायचे असेल तर  contact us या बटणावर क्लिक करा आणि तेथे माहिती भरा. तुमच्या सर्वांच्या सूचनांचे तुम्ही खूप स्वागत करू धन्यवाद






1001marathiessay.blogspot.com












Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने