1001marathiessay.blogspot.com
मी रोप बोलते आहे / रोपट्याचे आत्मकथन
Mi Rop bolate aahe / ropatyache manogat
नमस्कार मित्रांनो. मी आहे अंगणात उगवलेले एक छोटेसे रोपटे. मला आज तुमच्याशी बोलावेसे वाटते आहे, आणि तुम्ही सर्वांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घ्यावे , मला माझे मन मोकळे करू द्यावे ही मी तुम्हाला विनंती करतो.
बऱ्याच दिवसापासून काहीतरी बोलावे असे वाटत होते , परंतु आज मात्र तुमच्याशी बोलणे कसे टाळावे हेच कळत नव्हते . सध्याच्या कोरोना काळातील परिस्थितीमुळे आणि जीवनातील इतर अडचणींमुळे देखील बरेच लोक आता हतबल आणि मानसिकदृष्ट्या खचलेले दिसतात . त्या सर्वांना थोडीशी प्रेरणा द्यावी आणि त्यांचे मनोबल वाढवावे म्हणून मला तुमच्याशी बोलण्याची फार इच्छा झालेली आहे.
जेव्हा आपल्या जीवनामध्ये कठीण वेळ किंवा प्रसंग येतात त्यावेळी स्वतःला फक्त एकच गोष्ट समजून सांगा ही वेळही निघून जाईल हो अगदी बरोबर.
परिस्थितीला घाबरून बरेच लोक आत्महत्या करताहेत असे माझ्या निदर्शनात आले आहे . त्यांना मला सांगावेसे वाटते," बाबांनो मानव जन्म पुन्हा नाही. या जन्मात तर आपण आपली कर्तबगारी सिद्ध करू शकतो. नाही तर इतर प्राण्यांना कर्तबगारी सिद्ध करण्याची काय गरज आहे."
मी तर अजून एक छोटास रोप आहे. जगत असताना मलाही खूप अडचणी येतात . खेळताना अनेक मुलांचे पाय माझ्यावर पडतात, येता जाताना गाई , म्हशी बकऱ्या मला खुरपटत खाऊन टाकतात . पण तरीदेखील मी माझं धैर्य सोडलेलं नाही. अनेकदा तर सोसाट्याचा वारा येतो .मला गदागदा हलवतो. मला वाटते की आता माझा जीवन प्रवास संपला. पण मी हार न मानता तसाच उभा राहतो, वारा सोसत. त्या वाऱ्याला आम्ही स्पष्ट शब्दात सांगतो,
" जरी तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही"
हाच आशावाद तुम्ही सर्वांनी देखील स्वतःमध्ये बाळगा.आशावाद आहेत म्हणून तर आजपर्यंत जीवन टिकून आहे . बघा ना आज पर्यंत मानवजातीवर हजारो संकटे आली. तरीदेखील जीवन थांबत नाही. जीवन कोणत्याही परिस्थितीतून उमलतच असते.
अडचणींची चटके सहन करूनच उद्या माझे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होईल ,आणि त्यावेळी माझ्या सावलीत अनेक वाटसरु सावली घेतील . त्यांचे त्रास विसरतील. मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर तुम्हाला दुसऱ्यांना त्रास सहन करण्यासाठी शक्ती द्यायची असेल तर ती शक्ती आधी तुमच्या अंगात असणे अत्यंत गरजेचे आहे . मग अडचणी आल्या तर डगमगू नका. नेटाने त्यांचा सामना करा.
देवही आपली क्षमता बघूनच आपल्यासमोर अडचणी निर्माण करत असतो . आपली अडचणी सहन करण्याची ताकद अजून वाढवावी. ज्याप्रमाणे अनेक कठीण परीक्षा पास झाल्यानंतर सुवर्ण चकाकून निघते ,अगदी त्याचपद्धतीने तुम्ही देखील चमकून निघाल .स्वतःच्या कर्तुत्वाच्या प्रकाशाने अनेकांच्या जीवनातील अंधार दूर कराल. त्यांच्यासाठी तुम्ही दीपस्तंभ ठरणार.
चला तर मग उठा आयुष्याला एक निश्चित ध्येय द्या.
त्या ध्येयाने झपाटल्यासारखे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत राहा. मग सर्वत्र तुमच्या यशाचे नगारे वाजू लागतील. तुम्ही अनेक भरकटलेल्या जीवांसाठी प्रेरणास्त्रोत ठराल . यासाठी मी तुम्हाला अनंत शुभेच्छा देतो आणि आता संध्याकाळ झाली माझी झोपण्याची वेळ झाली. उद्या पुन्हा भेटू .एक नवीन सकाळ आणि नवा आशावाद मनात घेऊन. हे जग आणखी सुंदर बनवण्याचा.
हा निबंध एका रोपट्याचे मनोगत तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा संदेश पाठवा .
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
अजून असे खालील कल्पनाविस्तार वाचायला विसरू नका .
- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
- क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
- थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
- अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक
- सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
- एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
- वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
- भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay
या ब्लॉगवरील अजून काही वाचा
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.