mi pahilela suryast marathi nibandh |
आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असते ,पण हे महत्त्व आपण जाणले तरच आपल्याला कळते .आपल्या अवती- भवती दररोज अनेक गोष्टी घडत असतात .शहरात असू द्या नाहीतर खेड्यात असू द्या आजूबाजूला घटना तर घडतच असतात. त्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते . आपण नीट निरीक्षण केले तर ते आपल्याला लक्षातही येते. हल्ली मात्र इतका विचार करण्यासाठी वेळ आहे कुणाकडे?
अशाच एका छान प्रसंगाचे मी या ठिकाणी तुम्हाला वर्णन सांगणार आहे .अगदी तुमच्या परिचयाचे चला तर मग बघुया एक छान निबंध मी पाहिलेला सूर्यास्त....(sayankad composition in Marathi)
मी पाहिलेला सूर्यास्त | mi pahilela suryast marathi nibandh
निसर्ग म्हणजे सौंदर्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे .यामध्ये किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत. आमचे घर नदीच्या किनाऱ्यावर आहे त्यामुळे नदीच्या काठावर बसून नदीच्या पाण्यात पाय टाकून बसणे हा माझा आवडीचा छंद आहे . बऱ्याच वेळा पाण्यामध्ये खेळणाऱ्या माशांकडे बघत बसणं माझा विरंगुळा आहे..
संध्याकाळी शाळा सुटली की मी पळत घरी येत असे. अंगणात बसून आकाशात उडणाऱ्या पक्षांची गंमत बघत असे. एका रांगेत जाणारे पक्षी बघून मनाला फार आनंद होतो. त्या पक्षांना बघून मलाही कधीकधी पक्षी व्हावेसे वाटते आणि उंच आकाशात भरारी घेऊन संपूर्ण जग पहावे अशी इच्छा माझ्या मनात येते.
रविवारचा दिवस होता आणि मी माझे आवडीचे काम म्हणजे नदीच्या पाण्यात पाय टाकून बसणे आणि माशांची गंमत बघणे यात मग्न होतो..
नदीच्या एका काठावर बसून मी गंमत बघत होतो हळूहळू पाण्यामध्ये लाल पिवळसर रंग पसरू लागला. नदीच्या दुसऱ्या काठावर असलेल्या झाडांच्या खालून सूर्याची किरणे पाण्यात चमकू लागली होती आणि तो प्रकाश थेट माझ्या तोंडावर येत होता.
हे मनोभावक दृश्य बघून माझ्या मनात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली . इतके दिवस खाली मान घालून पाण्यात पाय हलवण्यात इतका मग्न होतो की, मान वर करून सूर्यास्ताचे हे सुंदर दृश्य बघण्याला मी विसरूनच गेलो होतो.
आकाशात सगळीकडे पिवळसर गुलाबी रंग पसरलेला होता. उन्हाची तीव्रता खूपच कमी होती. पक्षी आपापल्या घराकडे रांगेत निघाले होते. जणू शाळेतील कवायतीचा शारीरिक शिक्षणाचा तासच सुरू होता त्यांचा. मला तर वाटलं हे सगळे बगळे पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी पळण्याचा सराव करत आहेत की काय .
डोंगराच्या आडून सूर्यबिंब दिसत होते. लाजून एखाद्या सुंदर स्त्रीने आपले दोन्ही हात तोंडावर झाकून घ्यावेत .तसेच दोन डोंगरांच्या मागे सूर्य जणू लपत होता. सूर्यबिंब भोवती सोन्याच्या बांगडी सारखी बारीक कडा दिसत होती .सूर्य साज करून बसला असल्याचे वाटत होते..
पाण्यात पाय बुडवले असल्यामुळे पाण्यातील छोटे मासे पायांना गुदगुल्या करत होते .त्यामुळे भानावर आलो ,आणि वाटले इतके सुंदर मनोहारी दृश्य कैद करून घ्यावे .या विचाराने घरात मोबाईल आणण्यासाठी गेलो. वडील कोणाशी तरी फोनवर बोलण्यात गुंग होते .वडिलांचे बोलणे संपण्याची वाट बघत मी तिथे थांबलो .त्यांच्या तोंडाकडे एकटक बघत होतो मी .माझी ही कसरत बघून वडिलांनी फोन चालू असतानाच नजरेने मला काय हवे असे विचारले. मीही त्यांना हातवारे करूनच फोटो काढण्यासाठी मोबाईल पाहिजे असे सांगितले व त्यांचा हात धरून त्यांना माझ्याबरोबर घेऊन गेलो.
वडील फोनवर बोलतच माझ्याबरोबर आले आम्ही योग्य त्या ठिकाणी येऊन पोहोचलो मी वडिलांना समोर दिसणारा सूर्यास्त दाखवला माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि आनंद बघून त्यांना फारच बरे वाटले तेव्हा मी खुणेनेच फोन वर बोलणे बंद करून फोटो काढण्यासाठी त्यांना सांगितले.
वडिलांनीही लगेच माझे म्हणणे मान्य करून फोनवरचे संभाषण थांबवले. आम्ही भरपूर फोटो काढले. वडिलांनी मला एखादी वस्तू हातात धरल्यासारखे एक हात वर करून उभे राहण्यास सांगितले आणि दुरून माझा फोटो काढला .मला सुरुवातीला काही कळत नव्हते पण जेव्हा मी फोटो बघितला तेव्हा ते सूर्याचे बिंब मी हातात धरले आहे असे दिसत होते. फोटो बघून मी उड्या मारू लागलो. नाचु लागलो आनंदाने पप्पांना भेटलो.
इतका छान सूर्यास्ताचा देखावा मी कधीही विसरणार नाही.
तुम्हालाही असा अनुभव आलाच असेल तर नक्की कमेंट करून सांगा ....
निबंध कसा वाटला ते सांगा ....
व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या. Tips for personality development in Marathi.
111 अतिशय सुंदर व प्रेरक सुविचार वाचा .
- माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
- शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
- मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
- विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
- मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
- माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
- जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
- मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
- भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे , |bhuta paraspare jado maitr jivanche|
- पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
- माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
- उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
- सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
Too good very useful
उत्तर द्याहटवाThank you very much. your shiny words inspire us.
हटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.