1001marathiessay.blogspot.com
चांदण्या रात्रीतील नौकाविहार किंवा मी केलेला नौकाविहार यावर आपण निबंध बघूया.
स्वतःचे मनोरंजन करून घेणे हा प्रत्येकाचा अधिकारच आहे अधिकार काय तर ती गरजच आहे असे म्हणावे लागेल. स्वतःचे मनोरंजन करून घेण्याचे आणि आनंद मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे फिरायला जाणे. यालाच आपल्या गोंडस भाषेमध्ये सहलीला जाणे असेही म्हणतात.
आम्ही असा आनंद मिळवण्यासाठी एकदा सहलीसाठी गेलो आणि त्या ठिकाणी एक वेगळाच अनुभव घ्यायला मिळाला आमच्या मनात नसतानाही आम्हाला चांदण्या रात्रीतील नौकाविहार करण्याची संधी मिळाली आणि या प्रसंगाच्या आठवणी कायमच आमच्या मनाच्या कागदावर उमटल्या हे कसे घडले ते आता आपण चांदण्या रात्रीतील नौकाविहार या निबंधा मध्ये बघूया.
चला तर मग आता जास्त उशीर न करता आपण बघुया एक छानसा निबंध चांदण्या रात्रीतील नौकाविहार.
*********************
चांदण्या रात्रीतील नौकाविहार
आमचे गाव तसे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील गाव आहे बऱ्याच वेळा आम्ही सहलीला जातो त्यावेळी या दोन्ही राज्यांमधील विविध ठिकाणी फिरायला जातो. असाच एकदा सहलीचा बेत ठरलेला असताना आम्ही जवळच असलेल्या निळकंठेश्वर महादेव या देवळात जाण्याचे ठरवले होते.
निळकंठेश्वर महादेवाचे वर्णन आम्ही तिथे जाउन आलेल्या इतर लोकांकडून खूप ऐकले होते चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी महादेवाचे मंदिर दडून बसलेले आहे आईच्या कुशीत जसे बाळ लपून बसते अगदी तसेच हे निळकंठेश्वर महादेवाचे मंदिर या डोंगरदऱ्यांमध्ये निसर्ग देवतेच्या कुशीमध्ये दडलेले वाटत होते.
सकाळी लवकरच तयारी करून आम्ही सगळे गाडीने प्रवासाला निघालो निसर्गाचे निरीक्षण करत डोंगरदऱ्यातील वळणावळणाच्या रस्त्यांवरून प्रवासाचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो. पावसाळा सुरू असताना ज्या पद्धतीने रस्त्याच्या आजूबाजूला हिरवेगार गवत उगवलेले असते व ओला रस्ता त्या गवतामध्ये सळसळणाऱ्या सापासारखा चमकत दिसत असतो तसाच सकाळच्या धुक्यामुळे व दवबिंदू मुळे रस्ता ओला झालेला होता.
निळकंठेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आतुर झालेली होतो. गाडी मंदिराच्या क्षेत्रामध्ये पोहोचली आम्ही सकाळी लवकरच गेलेले असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती मात्र काही गाड्या त्या ठिकाणी होत्या व काही भाविक मंडळी दर्शनासाठी आलेली होती आमच्या अपेक्षेपेक्षा मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि भव्य दिव्य होता.
सर्वांनी आधी हात पाय स्वच्छ धुऊन निळकंठेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले देवा महादेवा सर्वांना सुखात आनंदात ठेव अशी प्रार्थना केली आणि मग एका ठिकाणी शांत बसलो गरम गरम चहाचा आनंद घेतला.चहा पिल्यानंतर अंगामध्ये तरतरी निर्माण झाली प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
मंदिराच्या परिसरात भक्त निवास होता परंतु मंदिराच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती वगैरेंना होती संपूर्ण शांतता होती आणि स्वच्छता मात्र नजरेत भरण्यासारखी होती मंदिरापासून एक-दीड किलोमीटरच्या अंतरावर ती गाव वसलेले होते त्या गावांमध्ये प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था होती.
आम्ही सर्वांनी मात्र भक्तनिवास आतच मुक्काम करायचा असे ठरवले व मंदिराच्या आजूबाजूच्या भव्य परिसरात पसरलेल्या काही हॉटेल्स यात्रा यांच्यामध्ये फिरून आनंद घेण्याचे ठरवले.
चांदण्या रात्रीतील नौकाविहार प्रसंग लेखन
दिवसभर फिरून झाल्यानंतर कधी रात्र झाली हे कळलेच नाही पोटात कावळे ओरडू लागले . मग त्यांना जास्त त्रास न देता आम्ही सरळ एका शाकाहारी हॉटेल मध्ये गेलो. त्या ठिकाणी जेवनावर चांगला ताव मारला.
जेवण झाल्यानंतर गप्पा मारत असताना बाबांनी शेजारच्या बागेतील जल मनोरे बघण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली आमच्यापैकी कोणीही आधी जल मनोरे बघितलेले नव्हते म्हणून आम्ही सर्वजण लगेच ते बघण्यासाठी तयार झालो. ते बघण्यासाठी आनंदाने व उत्साहाने निघालो.
जल मनोरे बघण्यासाठी आम्ही आत गेल्यानंतर एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा आम्हाला भास झाला. एक मोठा तलाव होता त्या तलावाच्या अवतीभवती खूप आकर्षक पद्धतीने विविध रंगांची विद्युत रोषणाई केलेली होती . त्यातूनच पाण्याचे मोठे फवारे उडत होते. वेगवेगळ्या रंगाच्या विद्युत रोषणाईमुळे पाण्याचे फवारे खूपच आकर्षक वाटत होते. जणू ही धरती आकाशात उंचच्या उंच रंगाचे पाणी उधळत आहे, असे वाटत होते . परंतु याहूनही सुखद धक्का आम्हाला अजून बसणार होता . ती रोषणाई बघत असतानाच एक नावाडी आमच्यासमोर एक नाव घेऊन आला. आम्ही काहीजण त्या नावेत बसलो. नाव हळूहळू पुढे जाऊ लागली तसे आम्ही आनंदाच्या आणि उत्साहाच्या सागरामध्ये न्हावून निघालो.
नावाड्याकडे एक छोटासा रेडिओ होता त्यावर छान मंद स्वरातील भावगीते चालू होते. आजूबाजूला सगळीकडे अंधार होता जल मनोरं पासून आम्ही आता बरेच पुढे आलेलो होतो. काळया आभाळा मध्ये सगळ्यांचा आवडीचा चांदोमामा पूर्ण प्रकाशाने चमकत होता त्याचे प्रतिबिंब तलावाच्या पाण्यामध्ये पडलेले होते.
वर आकाशात बघितले असता अनेक चांदण्या पूर्ण जोशात चमकत होत्या जणू कोण जास्त प्रकाश देतो यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धाच लागलेली होती असा भास मनामध्ये निर्माण होत होता हे सगळे बघत असतानाच रेडिओवर मंद संगीत चालू होते.
मी केलेला नौकाविहारप्रसंग लेखन
ह्या आनंदमय वातावरणात ती नाव
जशी हेलकावे घेत होती अगदी त्याच पद्धतीने आम्हीही मनातून आनंदाच्या एका खोल डोहामध्ये उतरत चाललो होतो. तलावाच्या काठावर चमकणारे छोटे-छोटे काजवे लक्ष वेधून घेत होते चमकत जाणारे काजवे जेव्हा इकडून तिकडे उडत होते तेव्हा तलाव दिवाळीत आम्ही उडवतो तशा फुलबाज्या उडवत असल्याचा एक विचार आमच्या मनात येऊन गेला.
अगदी खरोखर म्हणजे हा आनंदाचा क्षण आठवणींचे असे गोफ काही क्षणांमध्ये गुंफत गेला की ते शब्दांमध्ये कैद करणे केवळ अशक्य आहे. हे क्षण आपल्या आजन्म लक्षात राहतील यात काही शंकाच नव्हती.
नौकाविहार
आम्ही सर्वजण नावेत बसलेलो होतो परंतु कुणालाही काहीही बोलण्याचे भान राहिलेले नव्हते . निसर्गाचे सौंदर्य बघण्यात आम्ही आमचे भान विसरून गेलेलो होतो . शांततेत असलेल्या सामर्थ्याची प्रचिती आम्हाला येत होती.
अधून-मधून नावाडी पाणी वल्हवत असल्याचा आवाज आमची निसर्गाबरोबर लागलेली तंद्री उडवत होता . खरोखरच साधेपणातील सौंदर्य त्यावेळी आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो. ते केवळ अद्भुत होते आणि अवर्णनीय .
असे आनंदाच्या डोहात हेलकावे खात असताना नावाडी आम्हाला कधी पुन्हा काठावर घेऊन आला हे कळलेच नाही. काही काळापुरता आम्ही नावेतून खाली उतरलो खरे परंतु आमची चित्त मात्र त्या नावे मध्येच घुटमळून राहिलेले होते . दिवसभरात बघितलेल्या सर्व आनंददायी गोष्टींचा या शांततामय वातावरणात आम्हाला अगदी विसर पडला.
आनंदाचा अवर्णनीय अनुभव सोबतीला घेऊन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो, आणि निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. सकाळी लवकर उठून परतीच्या मार्गाला लागलो. पुन्हा आनंद घेण्यासाठी यायचे हा निश्चय मनात घेऊनच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो होतो.
............................................
तुम्हाला हा चांदण्या रात्रीतील नौकाविहार निबंध कसा वाटला हे नक्की सांगा.
तुम्हाला अजून एखादा निबंध पाहिजे असेल तर तेही आम्हाला सांगा आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.
- मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane
- मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay
- आई संपावर गेली तर aai sampavar geli tar marathi nibandh
- मी रोप बोलते आहे / रोपट्याचे आत्मकथन
- निसर्गाचा प्रकोप - भूकंप
- यंत्रे संपावर गेली तर yantra sampavar geli tar Marathi nibandh
- माझा वाढदिवस maza vadhdivas Marathi nibandh/mpsc,rajyaseva, competative exams
- प्रलयंकारी पाऊस
- मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची कैफियत
- आमच्या गावची जत्रा aamchya gavachi jatra marathi nibandh
- पाऊस पडला नाही तर paus padla nahi tar marathi nibandh
- माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
- मराठी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ , वाक्प्रचार यांच्या वापरामुळे प्रभावी संभाषण कला व आकर्षक व्यक्तिमत्त्व निर्मिती.
- it's not what you achieve it's what you overcome that's what defines your career meaning in Marathi
- झाडे आपले मित्र , zade aaple mitra nibandh in Marathi
- खेळाचे महत्व मराठी निबंध , khelache mahatva ,जीवनात खेळाचे महत्त्व
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.