1001marathiessay.blogspot.com


Internet shap ki vardan Marathi nibandh



     मानवी संस्कृती उत्क्रांत झाली तेव्हापासून विविध प्रकारचे शोध लागत गेले . त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये असाधारण बदल घडून आले. त्यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे चाकाचा शोध. चाकाचा शोध लागल्यामुळे मानवाच्या जीवनाला प्रचंड गती प्राप्त झाली. अनेक प्रकारचे शोध लागले त्यातीलच महत्त्वाचा शोध म्हणजे इंटरनेटचा शोध. 
     या इंटरनेटच्या शोधावर आधारितच इंटरनेट शाप की वरदान हा मराठी निबंध आता आपण पाहूया.

इंटरनेट शाप की वरदान.

       इंटरनेटच्या बाबतीत म्हणायचे झाले तर त्याला मराठी शब्द आहे  अंतरजाल, पण इंटरनेट ची किमया बघितली तर त्याला मोहजाल किंवा मायाजाल म्हटले तर वावगे ठरणार नाही.गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते परंतु इंटरनेटच्या बाबतीत मात्र सर्व शोधांची गरज म्हणजे इंटरनेट असे म्हणावे लागेल. इतक्या इंटरनेटचे आज महत्त्व निर्माण झालेले आहे.

   इंटरनेटमुळे आज जग एक छोटे खेडे बनून गेलेले आहे जगातील कोणतीही गोष्ट कुठल्याही माणसाच्या अगदी आवाक्यात आलेली आहे. जगाच्या एखाद्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही व्यक्तीशी आज मनुष्य संपर्क साधू शकतो.व्हिडीओ कॉलिंग सारख्या सुविधांमुळे तर आता दूर बसलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींचे हसरे चेहरे मनुष्य प्रत्यक्ष पाहू शकतो त्यामुळे आपल्या प्रियजनांना समक्ष जाऊन भेटण्याचा एक आनंद प्राप्त होतो. खरोखर इंटरनेटमुळे माणसाच्या भावनिक गरजाही पूर्ण होण्यासाठी फार मोठी मदत झालेले आहे.

Internet-shap-ki-vardan-in-Marathi-essay

       चंद्रयान मोहीम मंगळ मोहीम यासारख्या विविध मोहिमा मनुष्याने या इंटरनेटच्या सहाय्याने लीलया फत्ते केलेल्या आहेत. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी इंटरनेटमुळे सहजपणे आपल्या हातात घेऊन पोहोचलेल्या आहेत.
      जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनेटचा सहभाग झालेला आपल्याला दिसून येईल. अगदी काही खरेदी करायची असली तरीदेखील ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तू हव्या त्या ठिकाणी मागवता येते या सर्वांमुळे माणसांचे शारीरिक कष्ट हे वाचले आहेत.
     ऑनलाइन शॉपिंग मुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही स्वतःच्या व्यापार पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे अर्थात यात काही स्थानिक रोजगारांचे नुकसानही झालेले आहे परंतु काळाबरोबर बदलणे ही तर आजच्या युगाची गरज आहे असे तर म्हटले जाते ना बळी तो कान पिळी म्हणजे जो काळानुसार स्वतःमध्ये बदल करणार नाही तो नष्ट होऊन जाईल.
      अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या बरोबरच इंटरनेट देखील माणसाची मूलभूत गरज झालेली आता आपल्याला दिसून येते त्यामुळे कोणीही मला इंटरनेट समजत नाही अशी स्थिती सांगण्यात आता काहीही तथ्य उरलेले नाही प्रत्येकाने इंटरनेट शिकून घेणे अत्यावश्यक झाले आहे.
          पूर्वीच्या काळी लग्न म्हणजे अत्यंत धामधुमीचे व जबाबदारीचे काम अर्थात ते आजही आहेत परंतु वर-वधू बघणे त्यांच्या घरी जाणे पाहुणचार करणे इत्यादी गोष्टी या इंटरनेटमुळे फारच सोप्या झालेल्या आहेत ऑनलाईन वधू वर सूचक मंडळे स्थापन झालेली आहेत यामुळे लग्नांचा वेगही वाढलेला आहे व त्यासाठी येणारे खर्चही काही प्रमाणात मर्यादित झालेले आहेत. याबरोबरच शारीरिक श्रम वाचले ते वेगळेच.म्हणजे लग्नसमारंभाच्या नियोजनामध्ये इंटरनेटचा फार चांगल्या प्रमाणात उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो.
          इंटरनेटच्या माध्यमातून मात्र काही मुलींच्या वाट्याला आलेले वाईट प्रसंग ही दुर्लक्षित करून चालणार नाही फक्त मुलीच नाही तर मुलांच्या वाट्यालाही इंटरनेटमुळे काही अशोभनीय घटना आलेल्या आहेत. काही घटना तर इतक्या भयावह आहेत की अनेक जणांनी आपले जीवन देखील संपवले आहे आत्महत्या सारखे प्रकारही घडलेले आपल्याला दिसून येतात.
पण या सगळ्यांवर ही मला असे वाटते की इंटरनेट शापही नाही आणि वरदान ही नाही, कारण की इंटरनेट हा फक्त एक शोध आहे . त्याचा वापर कोणी कसा करावा हे प्रत्येक माणसाच्या सद्सदविवेक बुद्धीवर अवलंबून आहे. साने गुरुजी म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट असे दोन्ही उपयोग होऊ शकतात. बघा ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इंटरनेटचा चांगला आणि वाईट उपयोग हा ते वापरणाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. इंटरनेटमुळे होणारे फायदे लक्षात घेता इंटरनेट वरदानच आहे असे म्हणावे लागेल.

  Internet -Che- fayde -va -tote


        विविध आर्थिक व्यवहार करणे मधील सहजता तर इंटरनेटमुळे अगदी उच्च पातळीवर जाऊन पोहोचली आहे. आपल्या खिशात पैसे नसले तरी देखील हजारो रुपयांची खरेदी आपण करू शकतो. फक्त खिशात हवा मोबाईल आणि त्याला असावे इंटरनेट कनेक्शन मग झाले. सगळे जगच तुमच्या हातात आल्यासारखे होते.              पेटीएम, गुगलपे ,फोनपे यांसारख्या ऑनलाइन पैसे देवानघेवान करण्याच्या साधनांमुळे पैसे स्वतःजवळ बाळगण्याची गरज राहिलेली नाही .त्यामुळे बऱ्याच अंशी शारीरिक धोकेही कमी झालेले आहेत. पण इंटरनेटच्या अधिक वापरामुळे बऱ्याच जणांमध्ये विशेषतः तरुण मुला-मुलींमध्ये डोळ्याचे आजार ,मानसिक विकार,  ब्रेन डेड सारख्या समस्या, मानसिक विकलांगता अशा अनेक घटना समोर आलेल्या दिसतात .परंतु यावर हि मला पुन्हा ते सांगावेसे वाटते . इंटरनेटचा वापर किती प्रमाणात करायचा हे इंटरनेट स्वतः ठरवू शकत नाही ते आपण ठरवावे लागेल. कारण की अति तिथे माती हे तर आपल्याला माहीतच आहे.

      देशाच्या लष्करी सुरक्षे बाबतीतही इंटरनेटचा हातभार फार मोठा आहे. गूगल मॅप्स , गूगल ग्राफ इत्यादी सुविधांमुळे विविध प्रदेशाचे नकाशे बघण्यात व त्यानुसार युद्धनीती आखण्यामध्ये मदत मिळते.या सुविधेमुळे फक्त आपल्याच देशाला फायदा होईल असे नाही, तर या सुविधेमुळे आपल्या देशाचे नुकसानही होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने सावध राहणे ही प्रत्येक देशाची स्वतःची जबाबदारी आहे.

      विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू मधील जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम होणे हरवलेल्या वस्तूही लवकर सापडणे मध्ये मदत होते तसेच अनोळखी गावाला किंवा प्रदेशांमध्ये गेल्यानंतर आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते दाखवणे यासाठीही इंटरनेटच्या माध्यमातून एक मार्गदर्शकच आपल्यासोबत उभा राहिलेला आहे. म्हणजे काही आळशी मनुष्य स्वावलंबी झाला आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.
इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हजारो लाखो रुपये कमवण्याचे विविध पर्यायही उपलब्ध झाले आहेत म्हणजे एकीकडे इंटरनेटमुळे बेरोजगारीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली असे म्हणतानाच इंटरनेट मुळेच उद्योगधंद्याच्या किंवा व्यवसायाच्या स्वतंत्र अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
      शिक्षण क्षेत्रासाठी तर इंटरनेट म्हणजे मदतीचा हिमालयात ठरलेला आहे. इंटरनेट मुळे मुलांसाठी कोणत्याही क्षणी कोणत्याही विषयासाठी मार्गदर्शक उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि अडचणी इंटरनेटच्या माध्यमामुळे त्यांना काही क्षणातच सोडवता येतात. त्यांचे समाधान झाले नाही तर इंटरनेटच्या माध्यमातूनच अजून इतर प्रकारचे मार्गदर्शक व माहिती मिळवण्याची सुविधाही उपलब्ध होते. इंटरनेट मुळे तंत्रज्ञान हे एका उच्च पातळीवर जाऊन पोहोचलेले आहे . मानवी जीवनाला कलाटणी देणारा आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे इंटरनेट म्हटले तर यात काहीही वावगे ठरणार नाही. भविष्यकाळ हा इंटरनेटच आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती की इंटरनेटचा वापर करणे शिकून घ्या.


  1. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  2. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  4. परीक्षा .. छान मराठी लेख.
  5. उपकार ...छान कथा वाचा.
  6. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  7.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  8. रम्य पहाट
  9. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  10. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  11. सुंदर विचार
  12. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh


 अजून असे खालील कल्पनाविस्तार  वाचायला विसरू नका .
  1. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  2. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  3. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  4. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  5. सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
  6. एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
  7. वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
  8. भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay


या ब्लॉगवरील अजून काही वाचा 
  1. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  2. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  3. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  4. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  5. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  6. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  7. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  8. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  9. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  10. बालपण /रम्य ते बालपण
  11. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  12. माझी आई - माझा छोटासा निबंध




  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .






Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने