1001marathiessay.blogspot.com
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
Khara to ekachi dharm jagala prem arpave
आपल्या भारत भूमीमध्ये विविध प्रकारचे संत तर झालेच आहेत, पण फक्त संतच या भूमीमध्ये जन्माला आले नाही. तर संपूर्ण मानवजातीसमोर आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करून देणारे नररत्नही ह्याच मातीत उदयास आले. त्यांनी आपल्या जगण्याने आणि वागण्याने मानवजातीला खरा धर्म कोणता हे मर्म शिकवले.
यामध्ये स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक महात्मा गांधी अशा कितीतरी व्यक्तींची नावे घेता येतील. परंतु अगदी साधेपणाने जीवन व्यतीत करणारे पण तितकेच उच्च विचार असणारे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने यांची ही काव्यपंक्ती,, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.. यावर आधारित एक कल्पनाविस्तारात्मक निबंध आपण बघूया.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रेम ,माया ,आपुलकी , सहकार्य भावना सर्व भारतीयांच्या हृदयामध्ये भरलेली आहे. ही सर्व त्यांना ह्या भारत भूमीच्या मातीतूनच मिळालेली शिकवण आहे. चराचरामध्ये आणि प्रत्येक सजीवांमध्ये देवाचा अंश असतो असे मानणारी आपली संस्कृती आहे.
आज मात्र सगळीकडे धर्माच्या नावाखाली होणारा अंदाधुंद व्यवहार दंगे ,भांडणे बघून लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
कोणताही धर्म दुसऱ्या धर्माला तुच्छ समजण्याची शिकवण देत नाही . काही स्वार्थी माणसे स्वतःच्या फायद्यासाठी भडक व द्वेषपूर्ण विधाने करून माणसामाणसांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात . काही अविचारी माणसे या गोष्टीला बळी पडतात आणि नको त्या गोष्टी घडतात.
कोणताही धर्म कोणाला आपल्या समोर नतमस्तक करायला सांगत नाही ,व स्वतःही कुणासमोर नतमस्तक होण्याची शिकवण देत नाही. धर्म तर माणसाला शक्ती प्रदान करतो.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगत पूजनीय साने गुरुजींनी धर्माचा खरा अर्थ आणि मर्म सर्वांना समजावून सांगितलेले आहे.
इतरांना मदत करणे , कठीण परिस्थितीमध्ये एकमेकाच्या सहाय्यासाठी धावून जाणे ही आपली संस्कृती आहे.सहकार्य वृत्ती व सहकार्य भावना हे भारतीयांच्या रक्तामध्येच वाहत आहे. मानवाने मानवाशी मानवतेने वागणे हाच खरा धर्म आहे.
आज जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत काही पुरातन आहेत तर काही गेल्या काही शतकांमध्ये उदयास आलेले आहेत. धर्मांचा नीट अभ्यास केला तर एक गोष्ट मात्र सर्व धर्मांमध्ये सारखी असल्याचे आढळून येते ती म्हणजे इतरांना प्रेम देणे.
सर्व धर्मांचा सारच साने गुरुजी आपल्याला या एका वाक्यातून सांगतात , "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे".
मानवता हाच खरा धर्म.मानवी संस्कृतीला मिळालेले एक वरदान म्हणजे चांगला किंवा वाईट याचा निर्णय घेण्याचे सद्सद्विवेक बुद्धी होय. आपल्या विवेकबुद्धीने प्रत्येकाने धर्माची संकल्पना ठरवलेली असते. तर काही लोक इतरांच्या सांगण्याप्रमाणे धर्माची संकल्पना मानून घेतात.
ज्यावेळी कुणीही रागामध्ये असतो व चुकीचे वागण्यासाठी प्रेरित झालेला असतो अनेक विघातक कृती त्यांच्याकडून घडण्याची शक्यता असते. अशा अटीतटीच्या प्रसंगी आपण जर त्या व्यक्तीला प्रेमाने समजावले प्रेम दिले तर त्याला त्याच्या कामांमधील चुक लक्षात येते व चुकीच्या मार्गापासून तो परावृत्त होतो.
प्रेम दिल्याने तर पशुपक्षी हे देखील आपल्या जवळ येतात मग माणसाने माणसाला जर प्रेम दिले तर माणसातील माणूसपण जागे होण्यासाठी उशीर लागणार नाही . हेच मानवाने मानवाला प्रेम देणे संपूर्ण जगाशी प्रेमाने वागणे हाच खरा धर्म आहे. हे साने गुरुजी या काव्यपंक्तीतून सांगतात.
साने गुरुजींनी आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये सर्वांशी अगदी प्रेमपुर्वक व शांततेचा व्यवहार केला. साने गुरुजीनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक आजही घराघरांमध्ये मोठ्या आनंदाने वाचले जाते. आपल्या घरातील मुलांवर योग्य संस्कार घडवायचे असतील त्यांच्या मनामध्ये अनेक मूल्य रुजवायचे असतील तर साने गुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक यासाठी अगदी आदर्श उदाहरण आहे. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या घरातील मुलांना श्यामची आई हे पुस्तक वाचण्यासाठी नक्की प्रोत्साहन द्या आणि मग बघा त्यांच्या वर्तनामध्ये कसे आकर्षक व मानवीय बदल घडून येतात. धन्यवाद
तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू, आणि हो हा निबंध कसा वाटला आहे हे सांगायला अजिबात विसरू नका.
- मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane
- मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay
- आई संपावर गेली तर aai sampavar geli tar marathi nibandh
- मी रोप बोलते आहे / रोपट्याचे आत्मकथन
- निसर्गाचा प्रकोप - भूकंप
- यंत्रे संपावर गेली तर yantra sampavar geli tar Marathi nibandh
- माझा वाढदिवस maza vadhdivas Marathi nibandh/mpsc,rajyaseva, competative exams
- प्रलयंकारी पाऊस
- मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची कैफियत
- आमच्या गावची जत्रा aamchya gavachi jatra marathi nibandh
- पाऊस पडला नाही तर paus padla nahi tar marathi nibandh
- माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
- मराठी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ , वाक्प्रचार यांच्या वापरामुळे प्रभावी संभाषण कला व आकर्षक व्यक्तिमत्त्व निर्मिती.
- it's not what you achieve it's what you overcome that's what defines your career meaning in Marathi
- झाडे आपले मित्र , zade aaple mitra nibandh in Marathi
- खेळाचे महत्व मराठी निबंध , khelache mahatva ,जीवनात खेळाचे महत्त्व
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.