1001marathiessay.blogspot.com

भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित माहिती.





थोर व्यक्तींची संबोधने.


       आपल्या लोकशाहीप्रधान भारत देशामध्ये अनेक प्रसिद्ध थोर व्यक्ती होऊन गेल्या. त्या प्रत्येकाला लोकांनी त्यांच्या कार्यामुळे विविध पदव्या आणि संबोधने प्रदान केलेत . त्यातीलच काही थोर व्यक्तींची संबोधने आता आपण बघुया.

थोर व्यक्तींची संबोधने (व्यक्ती व त्यांची टोपण नावे)

  1. मोहनदास करमचंद गांधी....-महात्मा , राष्ट्रपिता
  2. ज्योतिबा फुले ................. .महात्मा.
  3.  बाळ गंगाधर टिळक ..........लोकमान्य .
  4. दादाभाई नौरोजी................ पितामह.
  5. जवाहरलाल नेहरू...............पंडित चाचा.
  6.  सुभाष चंद्र बोस ............... .नेताजी.
  7.  वल्लभभाई पटेल ...........  ..सरदार , लोहपुरुष.
  8. रवींद्रनाथ टागोर ..................गुरुदेव.
विविध ऐतिहासिक घोषणा (famous historical slogans)

  1. "जय जवान जय किसान"-..... लाल बहादूर शास्त्री.
  2. "आराम हराम है !"..............  पंडित नेहरू.
  3. "चले जाव !"........................महात्मा गांधी.
  4. "मेरी झाशी नही दूँगी!"........... राणी लक्ष्मीबाई.
  5. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा ".............. सुभाष चंद्र बोस
  6. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान" ...............   अटल बिहारी वाजपेयी
  7. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच . "....…..…लोकमान्य टिळक

विविध व्यवसायिक  व त्यांची कामे.(professionals and occupations)


  1. शेतकरी...... शेती करणे .
  2. शिंपी ..........कपडे शिवणे.
  3.  सैनिक .......रक्षण  करणे.
  4.  सुतार......... लाकडाच्या वस्तू बनवणे .
  5. लोहार .........लोखंडी वस्तू बनवणे .
  6. चांभार......... चप्पल शिवणे .
  7. गवंडी........... घर बांधणे .
  8. कुंभार .. .......मडकी बनवणे .
  9. धोबी............. कपडे धुणे .
  10. पोलीस.......... संरक्षण करणे .
  11. शिक्षक........  . शिकवणे .
  12. झाडूवाला......... साफसफाई करणे .
  13. न्यायाधीश.......... न्यायनिवाडा करणे .

रंगांच्या विविध छटा

  1. पांढरा.... ....पांढुरका, पांढराशुभ्र .
  2. निळा .........निळसर ,निळाशार .
  3. काळा ........काळसर, काळाकुट्ट .
  4. तांबडा .......तांबूस, तांबडालाल..
  5.  पिवळा...... पिवळाधमक, पिवळाजर्द .
  6. हिरवा ........हिरवट, हिरवागार.
  7.  लाल ..       लालेलाल, लालभडक.
प्राणी, पक्षी, फुल, फळ, ऋतू आणि त्यांचे राजे

  1. फुलांचा राजा......... गुलाब.
  2.  फळांचा राजा.... ...आंबा .
  3. प्राण्यांचा राजा .......सिंह .
  4. पक्ष्यांचा राजा ........गरुड .
  5. ऋतूंचा राजा.......... वसंत.
राष्ट्रीय चिन्हे राष्ट्रीय बोधचिन्ह

  1. राष्ट्रीय फूल...... कमळ .
  2. राष्ट्रीय प्राणी .....वाघ .
  3. राष्ट्रीय पक्षी ......मोर .
  4. राष्ट्रीय ध्वज ......तिरंगा .
  5. राष्ट्रीय गीत .......जन-गण-मन.
महात्मा गांधी यांची प्रेरणादायी वाक्य

Inspirational Quotes by Mahatma Gandhi
  1. भारतातल्या काही मोजक्या शहरातून नव्हे तर सात लाख खेड्यातून वसलेला आहे.
  2. हुंड्याबद्दल आग्रह धरणारा तरुण स्वतःच्या शिक्षणाला बट्टा लावतो .तो देशालाही कलंकित करून स्त्री जातीचा अपमान ही करतो.
  3. प्रत्येक वस्तूचा सदुपयोग किंवा दुरुपयोग होऊ शकतो.
  4. शोषण हे आजच्या अराजक अंदाधुंदी चे मूळ कारण आहे.
  5. स्त्री ही पुरुषाची साथी आहे आणि योग्यतेत त्याच्यापेक्षा मुळीच कमी नाही.
  6. एखाद्यावर केलेले प्रेम हे त्याच्यासाठी केलेल्या त्यागातून दिसत असते.
  7. चुका ह्या होणारच मात्र त्या कळताच कबूल करून प्रायश्चित घ्यावे.
  8. माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
  9. क्षणाचा राग जीवनाचा विध्वंस करू शकतो.
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी वाक्य.(inspirational quotes by swami Vivekananda)

  1. महान त्यागानेच महान कार्ये होऊ शकतात.
  2. उठा, जागे व्हा,  ज्ञान प्राप्त करा, असे समजू नका की तुम्ही दुर्बल आहात.
  3. उठा जागे व्हा आणि ध्येयपूर्तीवाचून थांबू नका.
  4. दुसऱ्याच्या हितासाठी आपला जीव गेला तरी परवा नाही असा विचार मनात येणे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे.
  5. कोणताही सद्विचार किंवा एखादी कल्पना तुमच्या चित्तात उगम पावली तर तिचा पाठपुरावा केल्याशिवाय राहू नका.
  6. गुलामगिरी प्रथम सोडून द्या.
  7. पैसे असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसांकडे आदराने पाहू नका. जगातली सर्व महान आणि प्रचंड कामे गरिबांनी केली आहेत.
  8. भयावह अशा ज्या गोष्टी असतील त्यांना तोंड द्या ठामपणे तोंड द्या भीती आपत्ती आणि अज्ञान यांच्याशी आपण लढा दिला तरच ते आपल्या पुढून नाहीशी होतील.
  9. साऱ्या मनुष्यजातीच्या सुखाकरिता स्वतः स अर्पण करणे याहून अधिक मोठे कार्य ते कोणते?
  10. समानते शिवाय मैत्री असू शकत नाही आणि एक जण सदैव दुसऱ्याच्या पायाशी बसतो आणि दुसरा नेहमी त्याला शिकवतो तेव्हा मैत्री असूच शकत नाही.
  11. तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल .कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

संत तुकाराम यांचे प्रेरक विचार.(inspirational quotes by sant tukaram)

  1. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही त्याचा वासच वाऱ्याबरोबर सगळीकडे पसरतो.
  2. माणसाने थोडातरी परोपकार करावा.
  3. दुर्जनांचा मान मुळीच ठेवू नये, उलट पद्धतशीरपणे अवमान करावा.
  4. सत्य आणि असत्य याचा शोध घेणार यांनी आपल्या मनाचा कौल मानावा. बहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये.
  5. धर्माच्या नावाखाली अधर्म चालू असतो.
  6. खरा ज्ञानी लोकांना तारतो.
  7. वेळेवर घातलेला एक टाका नंतर चे दहा टाके वाचवतो.
  8. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. (प्रामाणिकपणा नेच धन कमवावे आणि कोणताही मोह न धरता तो खर्च करावा)

  • साने गुरुजी यांचे प्रेरक विचार
  1. राष्ट्र ज्या ज्या योगे बलवान होईल ते ते कर्म हातात घ्या.
  2. आपत्तीतही स्वाभिमान न सोडता त्यागाचे मोल देऊन स्वतंत्रता टिकवावी.
  3. जेव्हा आपली मने स्वतंत्र होतील तेव्हाच आपण कोणत्याही बंधनातून मुक्त होऊ.
  4. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे आणि कर्म अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञान भक्तीस अर्थ नाही.
  5. तुमच्या सेवेची जी जी साधने आहेत ती ती पवित्र आहेत. ती स्वच्छ ठेवा . त्यांची काळजी घ्या .ती सेवासाधणे म्हणजे ईश्वररूप .विद्यार्थ्यांची सेवा साधन म्हणजे पाटीपुस्तके.
  6. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे , स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
  7. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ,ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास.
  8. आपल्याला जे काही करणे शक्य आहे ते न करणे हा अन्यायच आहे.
  9. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.
  10. जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.
  11. जुन्या रूढी आज कशा चालतील ?लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा येईल.
  12. घर म्हणजे एकमेकांना माणसाळवण्यासाठीची शाळा आहे.





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने