1001marathiessay.blogspot.com
प्रिय मित्रांनो आता आपण बघुया एक छानसा निबंध आमच्या गावची जत्रा . या निबंधामध्ये गावातील जत्रेचे वर्णन आपण बघूया.
आमच्या गावची जत्रा
माझ्या गावाचे नाव आहे धरणगाव. जळगाव जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. गावची लोकसंख्या जेमतेम पंधराशे असेल, पण गावातील लोकांच्या मनगटात दम मात्र पंधराहजार लोकांचा आहे.
आमच्या गावांमध्ये बिजासनी देवी चे प्रसिद्ध देऊळ आहे . या देवीवर गावातील सर्व भाविकांची फार मोठी श्रद्धा आहे. मनापासून भक्ती करणाऱ्याला आई बिजासनी पावतेच , आणि त्याच्यावर कृपा करतेच. अशी लोकांची धारणा आहे . तसे अनेकांना प्रत्यय देखील आलेले आहेत .
आमच्या घरातही बिजासनी मातेचा एक फोटो आहे मी दररोज त्या फोटोची आरती करतो आणि पाया पडतो.
दरवर्षी गणपती बाप्पा चे आगमन होते त्या दिवसापासून सलग तीन दिवस आमच्या गावांमध्ये जत्रा भरते .गावातील प्रमुख प्रतिष्ठित मंडळी या जत्रेचे नियोजन करतात . बिजासनी मातेच्या मंदिराला सुंदर रंग देण्यात येतो . विद्युत रोषणाई करून मंदिर सजवले जाते . या दिवसांमध्ये मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. एकीकडे गणपती बाप्पाचे आगमन झालेले असते व आई बिजासनी च्या आगमनाने जणू गणपती बाप्पा बरोबर बाप्पाची आईच आलेली आहे असे सर्वांना वाटते . गणपतीच्या आरती बरोबरच आईची आरती हि मोठ्या भक्तिभावाने केली जाते.
जत्रेच्या दिवसांमध्ये गावातील मंडळी आपल्या पै पाहुण्यांना राहण्यासाठी आपल्या घरी बोलतात . या दिवसांमध्ये गणपतीमुळे सगळीकडे रोषणाई तर असतेच आणि त्यातूनच अधिक सौंदर्य खुलते ते बिजासनी मातेच्या आगमनाने . सुरुवातीचे तीन दिवस नवरात्री प्रमाणे दांडिया देखील खेळला जातो. तीन दिवसांच्या जत्रेमध्ये शेवटच्या दिवशी यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
आमच्या गावची जत्रा aamchya gavachi jatra marathi nibandh
गावात सगळीकडे खूप दुकाने असतात. गावातील प्रत्येक घरांमध्ये जत्रेसाठी करावयाच्या खर्चाचे नियोजन पूर्ण वर्षभर केलेले असते. या नियोजनामुळे जत्रेच्या कालावधीत सर्व लोक आनंदाने पैसेही खर्च करत असतात. तसेच घरी पाहुणेरावळे आल्यामुळे आनंद झालेला असतो . एकत्र कुटुंबाचा महामेळा जणू भरलेला असतो.
घरातील मोठ्या माणसांबरोबर लहान लहान मुले त्यांचा हात धरून चालत असतात . खेळण्यांच्या दुकानांकडे बघत असतात . विविध वस्तूंसाठी आग्रह करत असतात .रडत असतात आणि अचानक मध्येच कुठंतरी खमंग भजी चा वास येतो तर भजी , वडे खाण्यासाठीही ते रडत असतात.
मी पण या यात्रेमध्ये भजी खातो . त्यानंतर जिलेबी खातो . अगदी पोटभर . सगळीकडे गणपतीचे गाणे वाजत असतात . छान-छान देखावे बघून मन आनंदाने अगदी भरून जाते . मधूनच कुठून तरी बिजासनी च्या भक्तीगीतावर नाचणारी मंडळी दिसतात . संबळ , तबला यांच्या तालावर ठेका धरून नाचणाऱ्या स्त्रिया फारच छान दिसतात . लयबद्ध हालचाली अगदी शिस्तप्रिय नृत्य करत असतात . ते बघून वेगळेच सौंदर्य संपूर्ण यात्रेला प्राप्त होते.
नवीन नवीन पोशाख घालून फिरणारे गावातील सर्व भाविक , तरुण-तरुणी एका वेगळ्याच जोशात आणि उत्साहात दिसतात. बायकांची गर्दी भांड्यांच्या व सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांमध्ये असते . माणसांची कपड्यांच्या व खेळ असलेल्या स्टॉल्सवर असते.
मी पाहिलेली जत्रा
संपूर्ण गावांमध्ये या जत्रेच्या दिवसात चैतन्य वाहत असते . प्रत्येकाचा चेहरा आनंदाने फुलासारखा खुललेला असतो . अनेक प्रकारचे सुगंधित द्रव्य मारून सगळे लोक बाजारात व गल्ल्यांमध्ये फिरत असतात . त्यामुळे जणू सुगंधाचा मळाच गल्ल्यांमध्ये फुललेला असतो.
यात्रा सुरु झाल्यानंतर सलग एकापाठोपाठ अनेक सण सुरू होतात. या सर्व आनंदाच्या वर्षावामध्ये आम्ही न्हावून निघतो. अशी ही आमच्या गावची सुंदर यात्रा मला खूप खूप आवडते..
या निबंधाचे खालील प्रमाणेही नाव असू शकते. किंवा खाली नावे असलेल्या निबंधांमध्ये तुम्ही या निबंधातील मुद्द्यांचा समावेश करू शकता.
- जत्रा
- मी पाहिलेली जत्रा
- आमच्या गावची यात्रा
- आमच्या गावची जत्रा
- यात्रा माहिती
- यात्रा विषय माहिती
- गावाकडची जत्रा
- मी पाहिलेली जत्रा प्रसंग लेखन
- गावची जत्रा
निबंध कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा . तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूपच मौल्यवान आहे.
तुम्हाला तुमच्या या गावातील जत्रे विषयी माहिती सांगायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हालाही ते वाचायला आणि ऐकायला आवडेल.
खूप खूप धन्यवाद.
- मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane
- मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay
- आई संपावर गेली तर aai sampavar geli tar marathi nibandh
- मी रोप बोलते आहे / रोपट्याचे आत्मकथन
- निसर्गाचा प्रकोप - भूकंप
- यंत्रे संपावर गेली तर yantra sampavar geli tar Marathi nibandh
- माझा वाढदिवस maza vadhdivas Marathi nibandh/mpsc,rajyaseva, competative exams
- प्रलयंकारी पाऊस
- मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची कैफियत
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.