1001marathiessay.blogspot.com


       सर्व सजीवांमध्ये फक्त मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की जो नियोजनबद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारचे खेळ खेळू शकतो.म्हणजे इतर प्राणीही खेळतात परंतु मनुष्य व्यवस्थित नियोजन करून कोणतेही खेळू शकतो. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये मनुष्य किंवा सध्याची तरुण पिढी ही खेळापासून दुरावलेले आहे . मैदानी  खेळ खेळण्यासाठी आता तर मैदानेच उरलेले नाहीत . पण यामुळे खेळाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही . आपल्या जीवनामध्ये खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या खेळांचे महत्त्व आपण या निबंधा मध्ये बघूया...
  
   खेळांचे महत्त्व

      खेळ खेळायला आवडत नाही , असे फारच थोडे लोक आपल्याला बघायला मिळतील. परंतु त्यांनाही कोणत्या ना कोणत्या तरी खेळाविषयी माहिती मात्र असतेच . खेळ खेळायला आवडत नसले तरीदेखील खेळाडूंना खेळताना बघण्याची आवड मात्र बऱ्याच जणांना असते.
       खेळाचे महत्व सांगायचे झाले तर खेळ खेळल्याने माणसाचे शरीर , मन निरोगी राहते . आरोग्य उत्तम राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळते. जे व्यक्ती आनंदी असतात त्यांचे आरोग्य उत्तम असते आणि खेळांमधून  खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद मिळत असतो . मानसिक समाधानही मिळते.
       निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. असे आपणा सर्वांना माहीतच आहे विविध प्रकारचे खेळ खेळल्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळतो.  व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक असणारे अनेक गुण मानवामध्ये निर्माण होतात.
       importance of sports in life essay in marathi


    काही खेळ वैयक्तिक प्रकारे खेळायचे असतात बैठे खेळ मैदानी खेळ छोट्या मैदानावर खेळले जाणारे खेळ एकट्याने खेळले जाणारे खेळ जसे लपाछपी, लपंडाव , चोर-पोलीस , पकडापकडी, लंगडी इत्यादी खेळामुळे स्वतः एकट्याने जय-पराजय मिळवण्याचे कौशल्य निर्माण होते चिकाटी कष्ट करण्याची वृत्ती निर्माण होते त्याचप्रमाणे गाणे गटागटाने खेळले जाणारे खेळ जसे की खोखो कबड्डी क्रिकेट फुटबॉल हॉलीबॉल या खेळांमध्ये इतर सर्व खेळाडूंबरोबर समतोल साधत खेळावे लागते . कोणीतरी संघनायक असतो या  प्रकारच्या खेळामुळे आपल्या सहकार्‍यांना एकत्र घेऊन काम करण्याची प्रवृत्ती निर्माण होते संघभावना निर्माण होते संघ नायकाची भूमिका केल्यामुळे नेतृत्व गुण विकसित होतो व भविष्यात एक चांगला नेता किंवा मार्गदर्शक निर्माण होण्यासाठी या गुणांची नक्कीच मदत होते.
     खेळांमध्ये धावणे, उठणे,बसणे , लपणे अशाप्रकारच्या विविध कौशल्यांचा समावेश होतो.  आजूबाजूच्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून वागण्याची प्रवृत्ती खेळाडूंमध्ये निर्माण होते. या  कौशल्यामुळे भविष्यामध्ये जीवन जगताना ज्या अनेक अडचणी निर्माण होतात त्या वेळी खचून न जाता त्यामधून मार्ग काढण्याचे विविध पर्याय मनुष्य शोधू लागतो. अडचणींवर मात करतो.
     खूप मोठ्या प्रमाणात खेळ खेळणारे खेळाडू अथवा व्यक्ती आत्महत्या करण्यासारख्या पर्यायाला कधीही स्वीकारत नाही. प्रत्येक संकटावर स्वार होण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते.

    खेळण्याचे फायदे 

        आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांबरोबर भावंडांबरोबर वागताना देखील योग्य अलिखीत नियमांचे पालन करत जगण्यास देखील यामुळे मदत मिळते. पचनक्रिया सुरळीत असल्यामुळे चेहऱ्यावर देखील एक तेज निर्माण होते हे तेज जगण्यात, वागण्यात आत्मविश्वास निर्माण करते व अशा आत्मविश्वास पूर्ण व्यक्तीच्या मागे माणसे उभे राहतात. त्याचा आपला नेता म्हणून नक्की स्वीकार करतात.
      फार पूर्वीच्या काळी काही ठरलेले पारंपारिक खेळ फक्त खेळले जात असत . जसे की कुस्ती, कबड्डी परंतु अलीकडच्या काळामध्ये हॉलीबॉल ,क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल यांसारखे खेळ  मोठ्या प्रमाणात आता खेळले जातात.शरीराच्या विविध अवयवांवर मध्ये समन्वय साधत खेळ खेळताना फारच मजा येते जिंकल्यानंतर जिंकण्याची मजा अनुभवता येते आणि पराभव झालाच तर पराभव स्वीकारण्याची खेळाडू वृत्ती देखील निर्माण होते . चौकस व्यक्तिमत्व निर्माण होते.
     खेळांचे व्यावसायिक महत्त्व 

      सध्याच्या काळामध्ये तर खेळांना खूपच प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे .भारतामध्ये क्रिकेट खेळ सोडून इतर खेळांना गौण स्थान दिले जात होते आता मात्र सर्व  खेळांकडे आणि खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे . कबड्डी सारख्या खेळाला देखील वैभव प्राप्त झालेले आहे.
     खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकऱ्या देखील आता मिळतात. उपजीविकेचे साधन म्हणून खेळाकडे बघण्याचा व्यवसायिक दृष्टीकोण हळूहळू जोर धरू लागलेला आहे खेळांच्या विकासासाठी विविध प्रकारचे मैदाने उपलब्ध करून खेळाचे व्यवसायीकरण आता होऊ लागले आहे या व्यवसायिकरणामुळे खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मुबलक प्रमाणात मिळत आहेत.
      खेळांच्या या उपयोगामुळे लहानपणापासूनच पालक देखील मुलांना कोणत्या तरी एका खेळांमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसतात. 
       खेळांच्या बाबतीत सांगायचे झाले तर बलोपासना करण्यासाठी अत्यंत आकर्षक व मनोरंजक प्रकार म्हणजे खेळ होय. खेळांमुळे संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होतो .



  खेळाविषयी तुमच्या भावना काय आहेत हेही आम्हाला नक्की कळवा, आणि तुम्हाला अजून कोणता निबंध हवा आहे हेही आम्हाला कळवा . आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.
   निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूपच मौल्यवान आहे. त्यामुळे आम्हाला अजून निबंध लिहीण्यासाठी प्रेरणा मिळते.




        
       

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने