1001marathiessay.blogspot.com


My dream essay in Marathi .
 लेखन : आदेश संदीप साळवे.
            ज्ञानदेवी विद्यामंदिर तहाराबाद .
             तालुका-सटाणा .
            जिल्हा - नाशिक.

   माझे स्वप्न मराठी निबंध. Majhe swapn Marathi nibandh, my dream essay in Marathi.

            माझे लहानपणीचे स्वप्न होते डॉक्टर व्हायचे, कारण ते लोकांना ठीक करतात. हे त्यांचे कार्य मला खूप आवडते. आत्ता चालू असलेल्या कोरोना महामारीमुळे डॉक्टर घरी जाऊ शकत नाही .घरच्यांना भेटू शकत नाही. त्यांची काळजी घेण्याकरिता ते कुटुंबीयांपासून दूर राहतात. ही त्यांची महानता . 


        डॉक्टर होण्याकरता एम.बी.बी.एस. ही परीक्षा पास करावी लागते . ही परीक्षा पास होण्याकरता खूप अभ्यास करावा लागतो. डॉक्टर हे लोकांना कळत नाही त्यांना सर्व पेशंट एक समान असतात.  ते हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा अजून कोणत्याही जाती-धर्माचे .डॉक्टरांचे मन मोठं असतं आणि ते ठेवावच लागत.
      मी एक शांत स्वभावाचा डॉक्टर आहे. एमबीबीएस ही परीक्षा पास होण्याकरिता मला खूप अभ्यास करावा लागला होता. माझे स्वतःचे हॉस्पिटल आहे. त्याचे नाव गणेश हॉस्पिटल  आहे .माझे नाव डॉक्टर आदेश आहे . मी किड्स स्पेशलिस्ट डॉक्टर आहे . 
    मला लहान मुले खूप आवडतात कारण ते निरागस असतात. जेव्हा त्यांना मी सुई देतो आणि ते रडतात ते बघताना मला खूप वाईट वाटते ,पण त्यांचा आजार बरा करण्याकरिता सुई द्यावीच लागते . डॉक्टरांचे कार्य हे खूप उच्च पातळीवरचे असते . हे मी माझ्या अनुभवाने सांगतो आहे.
       माझे हॉस्पिटल नाशिक जिल्ह्यात आहे .माझे भाऊ-बहीण हे ही डॉक्टर आहेत . माझा मोठा भाऊ ब्रेन स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, व मोठी बहीण लेडीज स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. आम्ही सर्व एकत्र एका दवाखान्यात काम करतो . 
      माझे वडील व काका हे शिक्षक आहेत .त्यांचे कार्यही खूप महान आहे. कारण ते विद्यार्थी घडवतात . माझी लहान बहीण शिक्षक आहे . हे सगळं मी तुम्हाला सांगतो आहे कारण तुम्ही डॉक्टरांची किंमत केली पाहिजेत.
       हे माझे स्वप्न तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुमचेही काही स्वप्न असेल तर तेही मला सांगा. मला ते ऐकायला किंवा वाचायला नक्की आवडेल.

या निबंधाचे खालीलपैकीही एखादे नाव असू शकते
  1. मी पाहिलेले स्वप्न.
  2. माझे बालपणीचे स्वप्न.
  3. माझे लहानपणाचे स्वप्न.
  4. माझे ध्येय.
  5. मी आणि माझे स्वप्न.
  6. मी आणि माझे ध्येय.
  7. माझ्या स्वप्नांचा प्रवास.
  8.  स्वप्नाचा पाठलाग.


हे पण वाचायला विसरू नका. 👸👸

2 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने