|shetkaryache manogat essay in Marathi |
मी शेतकरी बोलतोय | शेतकऱ्याचे मनोगत |शेतकऱ्याची कैफियत |shetkaryache manogat essay in Marathi
नमस्कार मी एक शेतकरी बोलतो आहे. सध्या सगळे शेतकरी संपामध्ये सहभागी झालेले आहेत . आता तुम्ही म्हणाल शेतकरी नेहमी संप करत असतात . पण असे करण्याची गरज का निर्माण होते? ह्याचा विचार तुम्ही कधी केलेला आहे का ? आता काही दिवसांपूर्वी मी एक कविता वाचत होतो. त्यामध्ये कवी आपल्या बापाचे वर्णन करताना असे म्हणतो की ,
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो कष्टतो
माझा शेतकरी बाप..
माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
वाचून मला खरोखर आनंद वाटला .परंतु उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज दुर्लक्षित झाले.दररोज कुठून तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी कानावर येते. माझ मन अगदी हळहळून जातं.
ऊन- वारा काही असो परंतु शेतकऱ्याला आपल्या कष्टातून सुटका नसते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हात शेतकरी काम करत असतो . तर पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत पीक काढत असतो ,आणि हिवाळ्यात तर आपण सर्व थंडी वाजते म्हणून घरात बसतो. चुलीसमोर बसतो . शेकोटी करून बसतो .शेतकरी मात्र अशा थंडीच्या वातावरणातही शेतामध्ये काम करण्यात मग्न असतो.
मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची कैफियत
मानवी संस्कृती सुरू झाल्यापासून शेतकरी हा संपूर्ण मानव जातीच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो , कारण की शक्ति प्रदान करणारे अन्न तो निर्माण करतो .त्यामुळे त्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते.
औद्योगिकीकरणाच्या या जगामध्ये सध्या मनुष्य कारखाने, यंत्र यामागे लागून शेतकऱ्याचे महत्त्व विसरूनच गेलेला दिसतो . त्यामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. सगळ्या जगाचे पोषण करणारा शेतकरीच बऱ्याचदा हवालदिल झालेला दिसतो. कारण त्याला त्याच्या कष्टाच्या प्रमाणामध्ये मोबदला मिळत नाही.
शेती बऱ्याच प्रमाणात निसर्गावरच अवलंबून असते. म्हणजे बघा चांगले पीक आले आणि त्यावर पाऊस पडून गेला तर नुकसान शेतकऱ्याचे. किंवा पाऊसच पडला नाही तरीदेखील नुकसान शेतकऱ्यांचे होते. म्हणजे या घटनांचा प्रत्यक्ष परिणाम भोगणारा घटक म्हणजे शेतकरी होय. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे अन्न घरात आरामात बसून खाता त्यामागे कोणत्यातरी शेतकऱ्याचे प्रचंड कष्ट आहेत.
शासनाच्या वेगवेगळ्या योजना दररोज जाहीर होतात , पण त्या खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतात? त्यातच काही अल्पभूधारक शेतकरी असले तर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत . त्यामुळे गरीब शेतकरी अजून गरीब होत चाललेला आहे.
एका शेतकऱ्याचे आत्मवृत्त
एक गोष्ट मात्र तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, शेतकरी हा खरा लढवय्या असतो .परिस्थिती कशीही असली तरी देखील आम्ही हार मानणार नाही . मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो की ,आम्ही आता रडणार नाही तर लढणार.
ठीक आहे चला मला शेतात जायचे आहे .भरपूर काम बाकी आहेत. पुन्हा कधी वेळ मिळाला तर भरपूर गप्पा मारू. तोपर्यंत राम राम.
तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा . तुमचा फीडबॅक फार महत्त्वाचा आहे.
तुमच्या फीडबॅक मुळे आम्हाला नवीन निबंध लिहीण्यासाठी प्रेरणा मिळते.
सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा
- मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा संदेश पाठवा .
- व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
- पर्यावरणाचे महत्व.. environment
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या. Tips for personality development in Marathi.
- पैंजण
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
- यंत्र संपावर गेली तर..
- मी रोप बोलत आहे.
Mala khup chan vatl pahteche sonndry nibandh
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवाMg ky
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.