1001marathiessay.blogspot.com
| झाडे आपले मित्र,
| झाडांची माहिती, | वृक्ष आपले मित्र
सध्याच्या काळात निसर्गाचा अनियमितपणा खूपच वाढलेला दिसतो. कधी तो आळशी माणसासारखा शांत राहतो आणि कितीही काहीही झाले तरी देखील काहीच प्रतिसाद देत नाही. कधीकधी उनाड मुलासारखा सर्व मानवजातीसमोर अनेक अडचणी निर्माण करत असतो. निसर्गाच्या अशा अनियमित वागण्याला जबाबदार कोण आहे ? असा प्रश्न जर स्वतःला विचारला तर उत्तरही लगेच मिळेल . हो , अगदी बरोबर मनुष्य जबाबदार आहे, या सर्व घटनाक्रमाला.
मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करून हिरव्या जंगलाऐवजी सिमेंट काँक्रीटचे जे जंगल निर्माण झालेले आहे .हेच महत्त्वाचे कारण आहे निसर्गाच्या असमतोलाला.. तसेच सतत वाढणारे प्रदूषण, मग ते जलप्रदूषण , वायू प्रदूषण , ध्वनीप्रदूषण कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असू द्या.
जोपर्यंत वृक्ष ठरलेल्या ठराविक प्रमाणामध्ये या पृथ्वीवर उपलब्ध आहे . तोपर्यंतच संपूर्ण सजीव सृष्टी देखील या पृथ्वीतलावर टिकून राहील .ज्यादिवशी वृक्षांचे प्रमाण हे निश्चित पातळीच्या खूप खाली जाईल त्या दिवशी विनाश हा केवळ अटळच आहे. हे विसरून चालणार नाही.
वृक्षांचे सर्वांना परिचयाचे असलेले उपयोग म्हणजे वृक्ष आपल्याला सावली देतात. फळे, फुले,पाने, औषधी वनस्पती देतात. तसेच मोठ्या प्रमाणात लाकूड ही आपल्याला झाडांमुळे उपलब्ध होते.
Essay on trees our best friend in Marathi
मानवाच्या कल्याणासाठी वृक्ष आजन्म अनंत अडचणी सहन करून झिजत असतात . पण मानवाच्या गरजा संपण्याऐवजी वाढतच चाललेल्या आहेत . निसर्ग किंवा वृक्ष या फक्त मानवाच्या गरजा भागवू शकतात . मानवाची हाव नाही . हे विसरून चालणार नाही. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा या घोषणा देऊन त्याप्रमाणे कृती करण्याची वेळ आलेली आहे.
झाडांचे महत्त्व लक्षात घेऊनच 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगातील लोकांमध्ये वनांमुळे होणारे फायदे व त्यांचे निसर्गासाठी असणारे उपयोग याविषयी जाणीव निर्माण व्हावी म्हणून 21 मार्च या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात . जागृती घडविली जाते. अधिकाधिक झाडे लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जाते . बऱ्याच ठिकाणी रोपे देखील पुरवली जातात.
वृक्ष आपल्याला खूप काही शिकवतात त्यांच्यातील गुण आपण आत्मसात केले पाहिजे . परोपकारी वृत्ती अंगीकारली पाहिजे. इतरांना आनंद देणे . अहंकार शुन्य असणे.सर्वांना समदृष्टीने पाहणे कुणीही उच्च नाही व कोणीही नीच नाही असा समतावाद जीवनामध्ये अंगीकारणे हे वृक्षच आपल्याला शिकवतात.
वृक्षांना संत म्हटले तर काहीही वावगे ठरणार नाही. असे म्हटले जाते की,
जगाच्या कल्याणा
संतांच्या विभूती
देह कष्टविती परोपकारे
अगदी या काव्यपंक्ती प्रमाणेच वृक्ष जीवनभर माणसासाठी व सर्व सजीवांसाठी स्वतःचा देह झिजवत असतात.
सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू झाडे फुकटात आपल्याला देतात. कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेतात. अनेक वर्षांपासून झाडे परोपकाराचे हे काम करत आहे. मानवाने मात्र अविचाराने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून पर्यावरणाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
वृक्षांचे उपकार आणि महत्त्व
वृक्ष हे आपले सगे - सोयरे व मित्र आहेत .अशीच शिकवण आपल्याला आपल्या पूर्वजांनी व महंतांनी दिलेली आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांमध्ये म्हणतात,
" वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती "
झाडांच्या सावलीखाली अनेक पीडित व तृषार्थ सजीवांना शांतता मिळते. उन्हाने पोळून निघालेल्या वाटसरूंना झाड आपल्या कवेत घेते. जीवनभर माणसाची साथ करणारे वृक्ष मानवाच्या मृत्यूनंतरही सरणावर देखील त्याची साथ करतात.
असे हे निस्वार्थपणे सर्वस्व त्याग करणारे वृक्ष वेली झाडे मानवाचे खरे मित्र आहेत. त्यामुळे शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
वृक्ष आमचे मित्र तयांना तोडू नका कोणी
देती सारे जे जे जवळी मनापासुनी वृक्ष
वृक्ष म्हणू की ऋषी म्हणू या
हे तर जनहित दक्ष.
********. समाप्त **********
या निबंधाचे अजून खालीलप्रमाणे नावेही असू शकतात
- | वृक्ष आमचे मित्र
- | झाडांचे उपकार
- | वृक्ष आणि माणूस
- | वृक्षांचे महत्व
- | झाडांचे महत्त्व
- | वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
- | झाड आपले मित्र
- | वृक्ष आपले मित्र
वृक्षांविषयी तुमच्या भावना काय आहेत हेही आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणता निबंध हवा आहे हेही आम्हाला कळवा . आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.
निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूपच मौल्यवान आहे. त्यामुळे आम्हाला अजून निबंध लिहीण्यासाठी प्रेरणा मिळते.
- प्रलयंकारी पाऊस
- मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची कैफियत
- आमच्या गावची जत्रा aamchya gavachi jatra marathi nibandh
- पाऊस पडला नाही तर paus padla nahi tar marathi nibandh
- निसर्गाचा प्रकोप - भूकंप
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- रम्य पहाट
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.