1001marathiessay.blogspot.com

आजची स्त्री मराठी निबंध, aajchi stri Marathi nibandh, today's women essay in Marathi





    आजची स्त्री 

     स्त्री ही मुळातच परमेश्वराची एक अप्रतिम निर्मिती आहे. स्त्रीच्या अस्तित्वामुळेच संपूर्ण जगाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. आजच्या स्त्रीने तर तिच्या सर्व बंधनांवर मात करून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.
पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे की,

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी 
 पदरात पान्हा नयनात पाणी

पण हल्लीच्या काळामध्ये फक्त या ओळी पुरताच स्त्रीचे अस्तित्व मर्यादित राहिलेले नाही. एक काळ असा होता की स्त्रियांची कर्मभूमी आणि कार्यक्षेत्र हे घराच्या आतच मर्यादित होते. पुरुष प्रधान संस्कृती मध्ये घरात पुरुषांचेच वर्चस्व दिसत असे. घरातील कोणत्याही प्रकारचे निर्णय पुरुष घेत असे स्त्रीने फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. एवढेच तिच्या हातात असे. एकदा निर्णय झाला की त्यावर मतप्रदर्शन देखील करायचे नाही.
        विविध कार्यालयांमध्ये देखील श्रेया क्वचित दिसत असत महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी हे दोन-चार मुलीच असं सार्वजनिक ठिकाणे चौकात चार-चौघात रस्त्यात किंवा अन्य कुठेही मुली अथवा स्त्रीया मोकळेपणाने बोलताना दिसत नव्हत्या. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची ही अवस्था तर मग उच्चशिक्षणात तर स्त्रियांची अवस्था सांगण्यासारखी नव्हती. उच्च शिक्षणात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती , पण काळ बदललेला आहे . आजचे दृश्य हे आश्चर्यचकित करणारे आहे.
        आजच्या स्त्रीला कोणतेच क्षेत्र नवीन राहिलेले नाही. उलट काही क्षेत्रांमध्ये तर तिने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे. आजही पुरुष प्रधान आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांनी काही क्षेत्रे पूर्णपणे काबीज करून घेतलेली आहेत.
       राजकारण ,अर्थकारण, समाजकारण ,कौटुंबिक जबाबदाऱ्या , सुरक्षा इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया समर्थपणे जबाबदाऱ्या पेलताना दिसत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रात आजची स्त्री नेत्रदीपक कामगिरी करताना दिसते. इतकेच नाही तर ती प्रसंगी रणरागिनी बनून रक्षणही करू शकते.
      आजची स्त्री गृहिणी असली तरी बहुश्रुत झालेली आहे.  जगात घडणाऱ्या घटनांचा,आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? याची तिला जाणीव झालेली आहे.ही सर्व जबाबदारी सांभाळून देखील, घरात मुलांचा अभ्यास घेणे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे .घरातील सर्व सदस्यांचे लाड पुरवणे ,तेही कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता. हा स्त्रीचा मातृत्वाचा  गुण तर कोणत्याही काळात नष्ट न होणारच 
आहे.
     आजची स्त्री प्रतिभाताई पाटील बनुन देशाचे नेतृत्व करू शकते. लता मंगेशकर  बनू न  स्वरांवर अधिराज्य गाजवू शकते .तर कविता चावला बनुन सगळं आसमंत कवेत घेऊ शकते .कधीकधी ती पी. टी.उषा बनून जिवाच्या आकांताने धावते. तर कधी मदर तेरेसा बनुन त्रास असलेल्यांना आपल्या कवेत घेऊन मायेची ऊब पण देऊ शकते. वेळ आलीच तर देश रक्षणासाठी झाशीची राणी म्हणून युद्धात लढण्यासाठीही ती तयार असते.
    आजच्या स्त्रीची ताकद प्रचंड वाढलेली आहे. आजची स्त्री शिक्षण घेते शिक्षण देते विविध प्रकारच्या नोकरही करते आणि घराची जबाबदारी उचलते मुलांचा अभ्यास मुलांच्या भवितव्याची जडण-घडण याचा भार देखील स्त्री समर्थपणे पेलत आहे.एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावलेली आहे. या सामर्थ्याने तिने या मानवी समाजामध्ये तिचे स्थान कसे अनन्य साधारण महत्त्वाचे आहे हे संपूर्ण समाजाला दाखवून आणि पटवूनही दिले आहे.
    खरोखर आजच्या या स्त्रीला माझे कोटी कोटी नमन.

1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. सर दिलेली माहिती अर्थपूर्ण आणि समाधान कारक आहे परंतु दिलेल्या माहिती मध्ये जा का छोट्या छोट्या चुका आहे त्या मग पूर्ण विराम असो किंवा शब्दा मधल्या त्या जर दुर्लक्षित केल्या तर बाकी निबंध मस्त आहे ... छान सर अशीच माहीत आमच्या पर्यंत पहचवत जा जेणे करून आमचा वेळ वाचेल.
    - यशराज राऊत
    यवतमाळ

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने