upkarmarathi.com

   शेतकऱ्यांना फार मोठा आधार असलेला प्राणी म्हणजे बैल. आता आपण बैल या प्राण्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. या छोट्या निबंधामध्ये बैलाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
      हा निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल.



   
     बैल | bull


          बैलाला चार पाय असतात. बैल शेतकऱ्यांना उपयोगी पडणारा प्राणी आहे. शेतातले सगळी कष्टाचे काम करण्यासाठी बैलाचा उपयोग होतो. शेतकरी बैलाची खूप काळजी घेतात. बैलांना ते छान छान नाव देखील ठेवतात. आमच्या घरीही शेतात काम करण्यासाठी  बैलाची जोडी आहे. त्यांची नावे सर्जा आणि सख्या आहेत.
          शेतात मी सर्जा, राजाला घेऊन खूप मजा करतो  .  त्यांना हिरवा चारा खायला देतो . त्यांचं पोट भरलं की त्यांना स्वच्छ पाणी प्यायला देतो .खाऊन झाल्यावर काम करतात.
         बैल वेगवेगळ्या रंगाचे असतात. तांबडा, वीटकरी काळा-पांढरा अशा अनेक रंगाचे बैल पाहायला मिळतात. बैलाला इंग्रजीमध्ये बुल (bull) म्हणतात. तो अत्यंत ताकदवान प्राणी आहे.
          पोळा या सणाच्या दिवशी बैलाची खूप मजा असते. पोळ्याच्या दिवशी बैलाला खूप छान सजवतात. त्यांच्या शिंगांना रंग देतात. बैलाच्या संपूर्ण अंगावरती रंगाने नक्षी काढतात. शिंगांना गोंडे, आणि फुगे बांधतात.
बैलाची सजावट केल्यानंतर बैल फार सुंदर दिसतात.
         गावाच्या मारुती मंदिराजवळ गावातील सर्व बैलजोड्या एकत्र आणतात. व त्यानंतर गावाच्या प्रदक्षिणेसाठी सर्व एकामागोमाग निघतात. काहीवेळा बैलांच्या शर्यती देखील होतात. आजच्या दिवशी मात्र बैलांना कोणतेही कष्टाचे काम सांगत नाही आणि त्यांना मारत नाही.
          बैलाच्या खांद्यावर जो उंच  भाग दिसतो त्याला वशिंड असे म्हणतात. काही बैलांचे वशिंड मोठे असते तर काही बैलांचे वशिंड लहान असते. मोठे वशिंड  असलेला बैल ज्यावेळी हळूहळू  चालू लागतो, त्यावेळी त्याचा रुबाब काही वेगळाच असतो.


  1. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  2. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  3. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  4. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  5. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  6. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  7. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  8. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  9. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  10. बालपण /रम्य ते बालपण
  11. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  12. माझी आई - माझा छोटासा निबंध


     

    
      
      
       
   
       

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने