upkarmarathi.com




विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म 
भेदाभेद भ्रम अमंगळ ||
आईका जी तुम्ही भक्त भागवत
 कराल ते हित सत्य करा  ||
कोणाही जीवाचा न घडो मत्सर
 वर्म सर्वेश्वर पूजनाचे||
तुका म्हणे एका देहाचे अवयव 
सुख दुःख जीव भोग पावे||

                    - संत तुकाराम महाराज


     वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखले जाणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगांमध्ये सर्व मानव समाजाला असे सांगतात की, ज्याला सर्वत्र परम परमात्मा विष्णूचे अस्तित्व दिसते तोच खरा वैष्णव आहे.
     प्रत्येक वैष्णवाचा हाच धर्म आहे की सर्वत्र नारायणाचे वास्तव्य आहे. प्रत्येक शरीरामध्ये म्हणजे मानवामध्ये भगवान विष्णूचे वास्तव्य आहे. याच भावनेमुळे खरा वैष्णव कधीही कोणाचाही  मत्सर करत नाही.
          संत तुकाराम महाराज सर्व भागवत भक्तांना सांगतात की, अरे भागवत  भक्तांनो तुम्ही ज्या कोणाला मदत कराल त्यांना अगदी मनापासून  सत्य भावना मनात ठेवूनच मदत आणि मार्गदर्शन करा. मनामध्ये द्वेष ठेवून इतरांविषयी निर्णय घेणे भगवत भक्ताचे लक्षण नाही त्याला वैष्णव म्हणता येणार नाही.
      ज्या नारायणाचे आपण भक्त आहोत ज्याची भक्ती करण्याचा आपण प्रण उचललेला आहे याचा सार देखील आज आहे. कोणाही जीवाचा मत्सर करू नये. हेच सर्वेश्वर भगवान नारायणाच्या पूजेचे सार आहे.
     यापुढे जाऊन संत तुकाराम महाराज सांगतात की देह जरी एक दिसत असला तरी देखील अनेक अवयव मिळून तो तयार झालेला असतो अनेक अवयवांच्या एकत्रीकरणाने एक देह तयार होतो आणि त्यामध्ये एकरूपता निर्माण होते. त्याच प्रमाणे सर्व प्राणिमात्र हे भिन्न दिसत असले तरी सर्वांच्या ठायी असणारा परमात्मा एकच आहे त्यामुळे कोणाचा आहे द्वेष किंवा मत्सर करू नये.



    प्रिय वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला भेदाभेद भ्रम अमंगळ कल्पनात्मक निबंध कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा . धन्यवाद.


 अजून असे खालील कल्पनाविस्तार  वाचायला विसरू नका .
  1. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  2. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  3. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  4. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  5. सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
  6. एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
  7. वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
  8. भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay


या ब्लॉगवरील अजून काही वाचा 
  1. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  2. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  3. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  4. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  5. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  6. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  7. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  8. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  9. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  10. बालपण /रम्य ते बालपण
  11. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  12. माझी आई - माझा छोटासा निबंध




Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने