1001marathiessay.blogspot.com


बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले



          संत तुकाराम महाराज यांनी माणसाच्या व्यवहारिक आणि अध्यात्मिक सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन करण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. सामान्य माणसाने दैनंदिन व्यवहारामध्ये शब्द अत्यंत जपून वापरले पाहिजेत.
        शब्दांमधली अमर्याद ताकद तुकाराम महाराज अनेक अभंगातून वर्णन करतात.

        आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
       शब्दांचीच शस्त्रे यत्न करू.
 शब्दची आमच्या जीवीचे जीवन 
शब्द वाटू धन जनलोका

      सध्याच्या काळात मात्र लोकांनी शब्दांचे तेज मळवून टाकलेले आहे. प्रत्येक जण कधी ना कधी खोटा बोललेला आहे. दुसऱ्याला शब्द देणे आणि न पाळणे हा एक प्रकारचा विश्वासघातच आहे.
      संत तुकाराम महाराज मात्र सांगतात की ,जो दिलेल्या शब्दाप्रमाणे वागतो त्याला मी वंदन करीन. त्याचा दास बनून राहण्यासही संत तुकाराम महाराज तयार आहेत.
      बोलल्याप्रमाणे वागणारे माणसे ही सर्वत्र पूजनीय असतात. लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसतो. अशा माणसांनी कोणतीही कृती करण्यासाठी लोकांसमोर आपला मनोदय व्यक्त केला तर लोक अशा माणसाच्या पाठीमागे आत्मविश्वासाने उभी राहतात.
         बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे वागणारी माणसे आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. अशा माणसांना मिळणारी संगत ही नेहमीच त्यांचा आदर करते. आदर ही मागून मिळणारी गोष्ट नाही तर आदर आपल्या वागण्यातून आणि आपल्या विचारातून मिळवावा लागतो.
     अशा माणसांचा शब्द म्हणजे प्रमाण असतो लोक डोळे झाकून अशा माणसांवर विश्वास ठेवून कोणताही धोका पत्करण्यास तयार होतात.
     म्हणूनच तुकाराम महाराज मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले.

  1. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  2. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  3. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  4. बालपण /रम्य ते बालपण
  5. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  6. माझी आई - माझा छोटासा निबंध
  7. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  8. बैल 
  9. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  10. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay


   

        


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने