1001marathiessay.blogspot.com



       माझे नाव श्लोक आहे . मी सात वर्षाचा आहे.  मला माझी आई खूप आवडते. माझ्या आईचे नाव प्रियांका आहे. आम्ही तिला प्रेमाने राणी म्हणतो. माझी आई माझी खूप काळजी घेते. मला छान छान जेवण बनवून देते.
         आई छान जेवण  बनवते. आई सकाळी लवकर उठते. अंगण झाडते, सडा टाकते , रांगोळी काढते.
        आईची आंघोळ झाल्यावर आई गॅस वर छान पैकी चहा ठेवते. गॅस'वर ठेवलेल्या चहाच्या मस्त वासाने मला जाग येते. मी हळूच उठतो आणि आईच्या कुशीत शिरतो. आई मला प्रेमाने जवळ घेते माझ्या डोक्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने मायेचा हात फिरवते. तेव्हा मला माझ्या पाठीवरून मोराचे पीस फिरत आहे असे वाटते.
        मला बऱ्याच वेळा असे वाटते की देवाने आई नावाची व्यक्ती बनवून आपल्यावर खूप खूप उपकार केलेले आहेत. आई आपल्या मुलांवर फक्त प्रेमच करू शकते. मुलगा कितीही वाईट वागला तरीदेखील आई मुलाला आशीर्वादच देते. ती त्याला शाप देऊ शकत नाही. आईला मुलावर राग करणे जमतच नाही.
        मला काय पाहिजे आहे किंवा काय नको हे माझ्या आईला मी न सांगताच कळते. देवाने आमच्यामध्ये मोबाईल आणि मोबाईलचा टॉवर असे नाते निर्माण केले आहे. जे कोणाला दिसत नाही पण त्याचा संबंध मात्र फार जवळचा असतो.
         खरे पाहता प्रत्येक आईला आपला मुलगा सुंदरच दिसत असतो. तरीदेखील आपल्या मुलाला कोणत्या रंगाचे कपडे अधिक छान दिसतील आपला मुलगा अजून सुंदर कसा दिसेल या सर्व गोष्टींकडे आईचे खरंच लक्ष असते.
           माझा गरम गरम वाफ निघणारा चहा पिऊन झाला की, मी आंघोळीला जातो. मला आई नेहमी सांगते, 'आंघोळीच्या आधी चहा पिऊ नये .आंघोळ झाल्यानंतर चहा प्यावा. ' आईने बनवलेल्या चहाचा इतका मस्त वास येतो की मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही.तसे    आईला दररोजच सांगतो की आई उद्यापासून आंघोळ झाल्यानंतर चहा घेत जाईन पण आजच्या दिवस मला तू चहा पिऊ दे. आई थोडे रागाने माझ्याकडे बघते, पण मला माहित आहे आई चा राग थोड्या वेळेपुरता असतो. त्यावेळी मी आईच्या गळ्याभोवती हात टाकून अलगद गालावर माझे  ओठ टेकवतो, आणि म्हणतो "आई तू किती गोड आहेस",  मग काय काम झालंच म्हणून समजा.
          यानंतर मला फक्त चहाच नाही, तर त्याच्याबरोबर बिस्कीट आणि  पाव हे ठरलेलेच असतात. असे करत करत बरेच दिवस झालेले आहेत, पण आता मी मोठा झालो ना. मग मग आता  आंघोळ करूनच चहा बिस्कीट घ्यायचे असे ठरवले आहे.
        आईचे उपकार कधीही फिटणार नाहीत. आपण त्यांची कितीही सेवा केली तरी देखील त्यांच्या उपकारांची किंमत करता येणार नाही. देवाने देखील आईला श्रेष्ठ मानलेले आहे.


     या निबंधाचे खालील प्रमाणे नावे असू शकतात.
1) माझी आई मराठी निबंध
2) आईचे उपकार
3) माझी आई निबंध मराठी
4) माझी आई निबंध मराठी माहिती

हे निबंध वाचायला विसरू नका...


          
मित्रांनो माझी आई निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव आणि प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला svbs9695@gmail.com वर तुमच्या नावासह पाठवा .तो तुमच्या नावासह प्रदर्शित करण्यात येईल.
तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला कळवा आम्ही तो निबंध तुम्हाला लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करू.

       

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने