1001marathiessay.blogspot.com
माशाचे मनोगत मराठी निबंध/ मासाचे मनोगत मराठी निबंध , masache manogat essay in Marathi.
निसर्गामध्ये अनेक प्रकारचे सजीव राहतात. त्या सजिवांची त्यांच्या शरीररचनेवरून त्यांच्या निवासस्थानावरून विविध गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. जसे की पृष्ठवंशीय प्राणी ,अपृष्ठवंशीय प्राणी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी इत्यादी. आहारावरून देखील प्राण्यांचे शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी असे वर्गीकरण केले जाते.
सर्व प्राण्यांमध्ये फक्त माणसालाच शब्दांची बोलण्याची भाषा आहे. पण इतर प्राणी देखील आपल्याबरोबर बोलत आहेत , अशी कल्पना करून काही निबंध लिहिले जातात, त्यांना कल्पनात्मक निबंध असे म्हणतात.
असेच आपल्याशी मासा बोलू लागला तर तो काय गप्पा मारत आपले मनोगत मांडेल ? हे आपण मासा बोलू लागला तर या एका छानशा निबंधामध्ये माशाचे मनोगत बघूया.
मी मासा बोलतोय
कल्पनात्मक निबंध.
एके दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी अभ्यासासाठी गेलो होतो. त्याचे घर शेतात होते. आमचा अभ्यास मजेत चालू होता . आम्हाला आमच्या शिक्षकांनी एक कल्पनात्मक निबंध लिहायला दिलेला होता निबंधाचा विषय होता मी मासा बोलतोय. आम्ही खूप विचार करू लागलो , पण काही सुचत नव्हते. मग आम्ही वह्या तशाच ठेवून त्यांच्या शेतात फिरण्यासाठी निघून गेलो. मित्राचे वडील शेतातील पिकांना पाटाद्वारे पाणी देत होते. पाठाच्या पाण्यातून एक मासा वाहत आलेला होता तो आम्हाला तडफडताना दिसला. तो माझा पटकन ओंजळीत भरून आम्ही त्यांच्या विहिरीमध्ये वरूनच टाकून दिला. आणि त्याची गंमत बघू लागलो. थोड्यावेळाने तिथून जात असताना आम्हाला आवाज आला , "धन्यवाद".
आम्ही इकडे तिकडे बघू लागलो तर परत आवाज आला रे तुम्ही माझा जीव वाचवला तो मासाच मी बोलतो आहे.
आमचा विश्वास बसत नव्हता. मासा पुन्हा बोलू लागला, आज तुम्ही माझा जीव वाचवला ह्यावरून तुमचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. असे मला वाटले त्यामुळे तुमच्याशी बोलत आहे. मासा अजूनच उत्साहाने आमच्याशी बोलू लागला.
तुम्ही माझा जीव वाचवला आहे. हे तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही.याची परतफेड म्हणून मी तुमच्या विहिरीतील पाणी नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. या पाण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या निर्माण होणार नाही याची मी काळजी घेईन.
आपल्या गावाजवळच असलेल्या धरणामध्ये मी राहत होतो. माझे सगळे भावंड आणि नातेवाईक त्याच धरणांमध्ये राहतात. आम्ही अगदी प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. कधीकधी आमच्यामध्ये भांडणे होतात हेही खरे आहे मात्र आम्ही लगेच सर्व भांडणे विसरून एकत्र राहतो. तुमच्यातही भांडणे होत असतीलच.
धरणामध्ये अनेक लोक आम्हाला पकडण्यासाठी नावे मधून येतात. जाळे टाकतात. तुम्ही माणसे इतके हुशार असतात की तुम्ही टाकलेल्या जाळ्यामध्ये आम्ही कसे अडकून पकडले जातो हेच आम्हाला कळत नाही. पाणी हेच आमचे घर आहे.पाण्यातून ज्यावेळी आम्हाला बाहेर काढतात त्यावेळी आमचा जीव गुदमरतो ,तडफडतो प्रचंड त्रास होतो आणि एकदाचा आमच्या शरीरातून प्राण पक्षी उडून जातो.
मृत्यूनंतरही आमचा प्रवास चालूच असतो. जाळ्यातून होडीत मग टोपल्यात, टोपल्यातून बाजारात ,बाजारातून तुमच्या घरात आणि मग तुमच्या पोटात. मासे हे शरीराला अत्यंत पोषक खाद्य आहे. असे तुम्ही म्हणतात, परंतु आमचा जीव जातो ना ! त्याचं काय? हा कधी विचार केला आहे का तुम्ही ?
बऱ्याचदा मोठ्या पाण्याच्या हौद मध्ये , विहिरींमध्ये किंवा जलाशयांमध्ये गप्पी मासे टाकले जातात. हे मासे डासांच्या अळ्या आणि अंडी खाऊन टाकतात . त्यामुळे डासांच्या त्रासापासून तुमची मुक्तता होते. सतत दुसऱ्यांना मदत करत राहणे . हा आमचा मूळ स्वभावच आहे.
आमच्यातील काही भाषांमध्ये खूप सारे औषधे गुण आहेत. कॉल माशाच्या यकृतापासून तेल मिळते . ते तेल माणसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. अनेक जीवनसत्व जसे की जीवनसत्व अ जीवनसत्व ड माशांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात.
माशांपासून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे ही निर्मिती करता येते. पापलेट, बांगडा, बोमिल अशा प्रकारच्या माशांची भाजी तुम्ही अत्यंत आवडीने खातात. आमचा जीव जातो आणि तुमची मजा होते.
समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या रंगांचे आणि गुणवैशिष्ट्यांचे मासे आणि इतर प्राणी राहतात. सर्वांचे रंग अत्यंत आकर्षक असतात .समुद्रातील वनस्पती हे विविध प्रकारच्या आणि गुणधर्मांनी युक्त अशा असतात. काही मासे तर इतके सुंदर असतात की, त्यांच्याकडे फक्त बघतच रहावेसे वाटते.
अनेक लहान लहान मासे एकत्र मोठ्या समूहामध्ये अगदी शिस्तीने पोहत असतात. शार्क माशांचे सारखे मासे अचानक येऊन या छोट्या-छोट्या माशांना खाऊन टाकतात. शार्क माशांनी तर बऱ्याचदा माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
बरेच जणांना मासे पाळण्याचा देखील छंद असतो. काहीजण घरांमध्ये फिश टॅंक ठेवतात. त्यामध्ये सुंदर सुंदर मासे सोडलेले असतात.विविध प्रकारचे रंगीत रोषणाई देखील केलेले असते त्यामध्ये. त्या माशांना खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अन्न देखील टाकले जाते.
खरंतर सगळीच माणसे वाईट असतात असे अजिबात नाही. तुमच्या सारखी चांगली प्रेमळ माणसे ही या जगामध्ये आहेत. त्यामुळेच एक मानसिक आधार मिळतो.
ठीक आहे परत एकदा माझा जीव वाचवल्या बद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या उपकारची पॅड करण्यासाठी माझ्या जलशुद्धीकरण याच्या कामावर रुजू होतो. पुन्हा भेटू मला भेटायला दररोज येत जा.
प्रिय मित्र तुम्हाला हा माशाचे मनोगत किंवा मासा बोलू लागला तर , हा निबंध कसा वाटला ? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला निबंध लिहीण्यासाठी खूप प्रेरणा मिळते.
टीप:
या निबंधांचे खालील प्रकारे ही नावे असू शकतात.
- माशाचे आत्मकथन
- माशाचे मनोगत
- मी मासा बोलतो आहे
- मासा आणि मानव संवाद लेखन
- माशाची कैफियत
अनेक जण खालील प्रकारे शोध घेतात.
१) मासाचे मनोगत
२) मासाचे आत्मकथन
३) मासाची कैफीयत
- मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची कैफियत
- आमच्या गावची जत्रा aamchya gavachi jatra marathi nibandh
- पाऊस पडला नाही तर paus padla nahi tar marathi nibandh
- माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
- मराठी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ , वाक्प्रचार यांच्या वापरामुळे प्रभावी संभाषण कला व आकर्षक व्यक्तिमत्त्व निर्मिती.
- it's not what you achieve it's what you overcome that's what defines your career meaning in Marathi
- झाडे आपले मित्र , zade aaple mitra nibandh in Marathi
- खेळाचे महत्व मराठी निबंध , khelache mahatva ,जीवनात खेळाचे महत्त्व
- चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.