|मी कचरा बोलतोय मराठी निबंध
Me kachra boltoy Marathi nibandh

मी कचरा बोलतोय मराठी निबंध |Me kachra boltoy Marathi nibandh
मी कचरा बोलतोय मराठी निबंध |Me kachra boltoy Marathi nibandh



      नमस्कार सर्व वाचक मित्रांनो आज मी  तुमच्यासाठी एक कल्पना विस्तारात्मक निबंध घेऊन आलेलो आहे. या निबंधाचे नाव मी कचरा बोलतो आहे किंवा कचरा बोलू लागला तर असेही सांगता येईल.
       

        मी कचरा बोलतोय मराठी निबंध|Me kachra boltoy Marathi nibandh
                           किंवा 
  कचरा बोलू लागला तर मराठी निबंध

       नमस्कार मित्रांनो मी कचरा बोलतो आहे. खरंतर तुम्हाला मित्र म्हणणे हे चुकीचे ठरेल , कारण की तुम्ही तर माझे जनक आहात . म्हणजे माझी निर्मिती तुमच्यामुळे झालेली आहे. तुम्ही जर ठरवले तर माझा जन्म होणार नाही.
        कचऱ्याचा प्रश्न सगळीकडेच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून उद्भवतो आहे. जिकडे बघावे तिकडे कचरा दिसतोच. लहानपणापासून शाळेमध्ये तुम्ही ही प्रतिज्ञा म्हणत असतात, की भारत माझा देश आहे .सारे भारतीय माझे बांधव आहेत.  माझ्या देशावर माझे प्रेम आहे. असं कितीही म्हटलं तरी मात्र मनातून ती गोष्ट तुम्ही स्वीकारलीच नाही. नाही तर इतका कचरा केलाच नसता.
         तुम्ही जीवनावश्यक म्हणून ज्या वस्तू वापरतात त्या सर्वांपासूनच कचऱ्याची निर्मिती करत असतात. ज्या वस्तू तुम्ही बाजारातून विकत घेऊन येतात , त्यांच्याबरोबरच त्यांची आवरणे म्हणजेच वेस्टने हेदेखील कचराच आहेत. ही वेस्टने इतरत्र फेकून देता आणि मग ते वाऱ्याने किंवा पाण्या- पावसाने वाहत वाहत गटारी मध्ये किंवा घरांच्या भिंतींच्या काठाला, रस्त्याच्याकडेला गोळा होतात .  सगळीकडे माझे सामर्थ्य , साम्राज्य  दिसू लागते.
       खरे पाहता, बघितले तर माझा जन्म आणि माझा शेवट दोन्हीही माझ्या हातात नाही. तुम्ही माणसांनी ठरवले तर माझी निर्मितीच होणार नाही, आणि निर्मितीच झाली नाही तर मला म्हणजे कचऱ्याला नष्ट करण्यासाठी विशेष काही उपाययोजना करण्याचीही गरज राहणार नाही.
           सध्याच्या काळामध्ये माणसे स्वच्छतेच्या बाबतीत अधिक जागरूक झाली असल्याचे दिसून येते. करुणा महामारी च्या प्रादुर्भावामुळे स्वच्छतेच्या जाणिवेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.  आता ओला कचरा आणि सुका कचरा अशा पद्धतीने माझे वर्गीकरण करताना दिसू लागले आहे.
        कारखान्यांमधून निर्माण होणारा कचरा हिल पुनर्वापर या मध्ये घेताना दिसतात. शेतीतील कचरा घरातील भाजीपाला याची , पाने , बाजारपेठांमधील कचरा, मंडई मधील कचरा या ठिकाणचा सर्व कचरा गोळा करून तो गावाबाहेर किंवा गावातच ठरलेल्या ठिकाणी पोहोचवला जातो. 
      माझ्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या नंतरच पुढे माझे काय होणार याचा निर्णय होतो. माझ्या कचऱ्यातील बर्‍याचशा वस्तू ह्या पुनर्निर्मिती साठी म्हणजेच रिसायकलिंग साठी विविध कारखान्यांमध्ये पाठवले जातात. त्यापासून नवीन वस्तू तयार करून पुन्हा त्या बाजारांमध्ये विक्रीसाठी येतात . तर काही कचरा जाळून किंवा पुरून टाकून नष्ट केला जातो.
        एक  गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही मला कायमचे नष्ट करू शकत नाही. मी कोणत्या ना कोणत्या रूपाने सतत मानवासोबत राहणारच.  ओला कचरा खड्ड्यांमध्ये पुरून त्याच्या पासून खत निर्मिती केली जाते. हे खत शेतीमध्ये पिकांसाठी वापरलं जातं . आणि मीच पुन्हा पीक बनवून शेतामध्ये जोमाने डोलतो.
     हे जीवन चक्र असंच चालू राहणार. थँक्यू 


|Mi kachara boltoy marathi nibandh.



हा निबंध मी कचरा बोलतोय याचे खालील नावेही असू शकतात.

१) |कचऱ्याचे आत्मकथन
२) |कचऱ्याचे कैफियत
३) |कचरा आणि माणूस संवाद लेखन.

हे वाचायला विसरू नका.

  1. मी मासा बोलतोय
  2. मी शेतकरी बोलतोय
  3. झाडे आपले मित्र
  4. पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.



 अजून असे खालील कल्पनाविस्तार  वाचायला विसरू नका .
  1. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  2. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  3. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  4. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  5. सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
  6. एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
  7. वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
  8. भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay


या ब्लॉगवरील अजून काही वाचा 
  1. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  2. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  3. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  4. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  5. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  6. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  7. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  8. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  9. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  10. बालपण /रम्य ते बालपण
  11. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  12. माझी आई - माझा छोटासा निबंध



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने