1001marathiessay.blogspot.com

नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन मराठी निबंध/ नापास झालेल्या मुलीचे आत्मकथन मराठी निबंध

     napas zalelya mulache manogat, आपल्यापैकी काही जणांनी नापास होण्याचा अनुभव घेतलेला असेलच. मीही नापास झालो की पास याचा मात्र मी अजून पर्यंत विचारच करत आहे. खालील निबंध वाचा आणि तुम्हीच मला सांगा मी नापास झालो की पास? त्यासाठी कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग बघुया एक छानसा निबंध नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन.



नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन.

           नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर माझे मन मोकळे करणार आहे. बऱ्याच दिवसांपासून मनात होते की आपले दुःख कुणालातरी सांगावे. कुणासमोर तरी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. कारण आता हे दुःख पचवणे असह्य झाले आहे आणि म्हणतात ना दुःख हे वाटल्याने कमी होते. म्हणून माझे दुःख आणि वेदना काहीसे कमी करण्याच्या अपेक्षेने मी तुमच्याशी संवाद साधत आहे.
        माझे नाव विजय आहे. तसा मी अभ्यासात खूपच हुशार नाही. पण आजवरच्या परीक्षांमध्ये मी कधीही नापास झालेलो नव्हतो.मागच्या वर्षी मी इयत्ता बारावी मध्ये होतो आणि यावर्षी देखील इयत्ता बारावीतच राहील.
        यावर्षी निकाल लागला आणि माझ्या मनात अशी शंका होती तसाच मी नापास झाल्याचे मला समजले. मनात दुःख खूप झाले होते पण एक समाधान होते.
       परीक्षेच्या दिवशी सकाळी लवकरच तयारी करून निघालो होतो. अभ्यासही चांगला झालेला होता. खूप जास्त नाही परंतु नापास होणार नाही इतके मार्क मिळतील याची खात्री होती. 
       वेगाने जात असतानाच. माझ्या बाजूने चालत असणारे एक आजोबा चक्कर येऊन माझ्या अंगावर पडले. त्यांचे अंगात खूप वेगाने थरथरत होते. मी त्यांना धरून खाली बसलेलो होतो. त्यांनी किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले आणि रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दवाखान्याकडे बोट दाखवत डोळे बंद केले.
          मी क्षणाचाही उशीर न करता त्या आजोबांना दवाखान्यात घेऊन गेलो. आजूबाजूच्या लोकांनी ही माझी मदत केली. दवाखान्यात पोहोचल्यावर मात्र सगळी गर्दी दिसेनाशी झाली. डॉक्टरांनी मला सगळी विचारपूस करायला सुरुवात केली. मी त्यांना  घडलेला सर्व प्रकार सांगितला. 
           डॉक्टरांनी आजोबांची तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला असल्याचे निष्पन्न झाले. मी डॉक्टरांना माझ्या जबाबदारीवर सर्व उपचार करायला सांगितले. काही वेळाने आजोबा शुद्धीवर आले. आणि मलाही परीक्षेचे भान आले.घड्याळात बघतो तर परीक्षेसाठी केवळ अर्धा तासच वेळ उरलेला होता. तसाच धावत पळत शाळेत गेलो आणि अर्ध्या तासात होईल तेवढा पेपर लिहिला परंतु निकालाच्या दिवशी मी नापास झाल्याचे समजले.
         त्यादिवशी नापास झाल्याचे दुःख ही होते आणि गरजवंताला मदत केल्याचे समाधान होते त्यामुळे मी नापास झालो की पास? हा मला आजही न सुटलेला एक प्रश्न आहे.
       

टीप: 
      या निबंधामध्ये नापास झालेल्या मुलाचे मनोगत सांगितलेले आहे, परंतु जर नापास झालेल्या मुलीचे मनोगत लिहायचे असेल जागी मुलीचे नाव टाकून योग्य ते बदल करून तुम्ही निबंध वापरू शकता. धन्यवाद

    तुम्हाला निबंध कसा वाटला हे नक्की कळवा.
त्यासाठी तुम्ही svbs9695@gmail.com यावर मला संपर्क करू शकता.


या निबंधाचे खालील प्रमाणे नावे असू शकतात.
१) नापास मुलाचे मनोगत
२) नापास मुलीचे मनोगत
३) नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन
४) नापास झालेल्या मुलीचे आत्मकथन
५) नापास झालेल्या मुलीचे मनोगत
६) नापास झालेल्या मुलाचे मनोगत
७) नापास मुलांची कैफियत





  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
        


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने