1001marathiessay.blogspot.com
Sanganakache manogat mahatva |
संगणकाच्या बाबतीत अनेक लोकांची विविध मते आपल्याला आढळून येतात. संगणकामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत असाही एक सूर ऐकायला मिळतो. काहीजण संगणक शाप आहे असे म्हणतात तर काहीजण संगणक वरदान आहे असे म्हणतात. खरे पाहता संगणक शाप की वरदान हा चर्चेचा विषय वाटत असला तरी एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की संगणक मानवनिर्मित आहे . मानवाने स्वतःच्या गरजेसाठी संगणकाची निर्मिती केली आहे. वेळेनुसार संगणकामध्ये विविध बदलही मानवानेच केलेले आहेत. त्यामुळे संगणक शाप की वरदान ही चर्चा करण्यापेक्षा मानवाच्या गरजा आणि काम पूर्ण करण्यामध्ये संगणकाची मदत किती प्रमाणात होते आणि त्या दृष्टीने मानवाने स्वतःच्या कार्य कौशल्यांमध्ये बदल करणे किती गरजेचे आहे यावर चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे.
चला तर मग आपण असाच एक एक छानसा निबंध बघूया.... संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष
संगणक मराठी निबंध
संगणक- एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष
सध्याच्या काळामध्ये शिक्षित आणि अशिक्षित या ही संकल्पना बदलून गेलेल्या आहेत. ज्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान नाही त्या व्यक्तीला सध्याच्या काळामध्ये अशिक्षित संबोधले जाते. यावरून सध्याचे युग म्हणजे संगणकाचे युग आहे असेच म्हणावे लागेल .ही गोष्ट सर्वांनी मान्य देखील केलेले आहे.
संगणकामुळे मानवाच्या जीवनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे.संगणकाचा शोध ज्यावेळी लागला त्यावेळी संगणकाचा उपयोग फक्त गणन क्रिया करण्यासाठी होत असे. त्यानंतर जसजसा काळ गेला तसा संगणकामध्ये गरजेनुसार मानवाने बदल केले. मानवाच्या जीवनामध्ये संगणक म्हणजे मूलभूत गरज बनलेली आहे.
संगणकामुळे काम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची मोठ्या प्रमाणामध्ये बचत झालेली आहे. माणसाचे कष्ट वाचल्यामुळे त्याची काम करण्याची शक्तीही वाढलेली आहे.
ज्यावेळी माणसांना पहिल्यांदा संगणकाची ओळख झाले त्यावेळी बऱ्याच लोकांना म्हणजे मोठे संकट आहे असे वाटले होते. संगणकामुळे रोजगार वाढतील आणि बेकार होतील अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. सुरुवातीला निर्माण झालेली ही भीती मात्र फार काळ टिकली नाही. संगणकामुळे रोजगाराच्या देखील अनेक संधी उपलब्ध झाल्यात अट फक्त एकच होती की संगणकाचे ज्ञान मिळवून घेणे. संगणक वापरण्याची कला शिकून घेणे.
संगणकाचे महत्व मराठी निबंध
संगणकाचे ज्ञान शिकून घेणाऱ्यांनी बुद्धीच्या जोरावर आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सहजरित्या सोडवल्याचे बऱ्याच ठिकाणी आता दिसून येते. संगणकामुळे कामांमध्ये शिस्त आली. कोणतेही काम अतिशय वेगाने अचूक पद्धतीने करणे हे संगणकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
संगणकामुळे गुंतागुंतीची अनेक कामे ,गणिते तसेच छपाई इत्यादी सर्व कामे करता येतात. संगणकाच्या विविध गुणधर्मामुळे सध्या अनेक कार्यालयांना मध्ये तसेच मोठ्या कंपन्यांमध्ये संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. संगणकामुळे कागदाची देखील बचत होते.संगणकात आपल्याला पाहिजे तेवढी माहिती साठवून ठेवता येते आणि ज्या वेळेस आपल्याला ती माहिती पाहिजे त्यावेळी एका क्षणात ती माहिती देखील मिळवता येते अगदी कमी वेळात. या गोष्टीमुळे संगणकाची गरज सतत वाढत जात आहे.
संगणकाने आपले वर्चस्व निर्माण केलेले नाही, असे एकही क्षेत्र आता राहिले नाही. संगणक म्हणजे एक कल्पवृक्ष आहे. आपल्या इच्छेनुसार आपल्याला कोणतेही काम करून देतो .
माझी आई - माझा छोटासा निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा संगणकाचे महत्व मराठी निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा निबंध तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये वापरू शकता. लहान मुले या निबंधातील काही भाग निबंध लेखनासाठी वापरू शकतात.
मित्रांनो हा निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव आणि प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला svbs9695@gmail.com वर तुमच्या नावासह पाठवा .तो तुमच्या नावासह प्रदर्शित करण्यात येईल.
तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला कळवा .आम्ही तो निबंध तुम्हाला लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करू.
- स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी माहिती वाचा .
- राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .
हे वाचायला विसरू नका.
- मी मासा बोलतोय
- मी शेतकरी बोलतोय
- झाडे आपले मित्र
- पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे निबंध वाचायला विसरू नका
- आजची स्त्री मराठी निबंध
- Which topics of essays can come in board exam 2020
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
- संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
- बैल
- नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
- माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.