1001marathiessay.blogspot.com
माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध majha avadta pakshi garud Marathi nibandh.
सगळ्यांना वेगवेगळे पक्षी आवडतात. कोणाला पोपटराव आवडतो, कोणाला चिमणी आवडते आणि कोणाला मैना आवडते. पण माझा आवडता पक्षी आहे गरुड.
गरुडाला पक्षांचा राजा म्हणतात. त्याची नजर फार तीक्ष्ण असते. गरुडाला आकाशातून जमिनीवरचे सावज सहज दिसते. उंच आकाशातून झेप घालून गरुड सावज अगदी बरोबर टिपतो.
अनेक पक्षी आकाशात उडतात परंतु गरुडा इतके उंच उडणे सर्व पक्षांना शक्य होत नाही. गरुड उंच आकाशात ढगांच्याही वर झेप घेतो. त्याचे हेच वैशिष्ट्य मला खूप आवडते.
गरुडाची चोच पुढे थोडीशी बाकदार असते. गरुड आकाशातून झडप घालून आपल्या धारधार नखांनी शिकार पकडतो. गरुड हा शिकार करणारा पक्षी आहे.
गरुडाचा रंग फिकट तपकिरी असतो. तसेच मानेजवळ थोडासा फिकट पिवळा किंवा मळकट पिवळसर रंग देखील असतो. गरुड पक्षी आकाराने घारी पेक्षा थोडा मोठा असतो.
भारतीय पुराणांमध्ये देखील गरुडाला महत्त्व आहे. गरुड भगवान विष्णु यांचे वाहन आहे असे मानतात. गरुड पुराण या नावाने एक मोठा ग्रंथही आहे.
असा हा सुंदर दिमाखदार पक्षी गरुड पक्षांचा राजा आहे. त्याचे स्थान पक्ष्यांच्या यादीमध्ये सर्वात वरतीच राहील.
हे निबंध वाचायला विसरू नका...
मित्रांनो माझा आवडता पक्षी गरुड निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव आणि प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला svbs9695@gmail.com वर तुमच्या नावासह पाठवा .तो तुमच्या नावासह प्रदर्शित करण्यात येईल.
तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला कळवा आम्ही तो निबंध तुम्हाला लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करू.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.