1001marathiessay.blogspot.com
   लहान मुलाचे मनोगत , बालपणीचा काळ सुखाचा मराठी निबंध




       नमस्कार सर्व वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी असलेली मंडळी आणि खूप मोठे असलेले मंडळ सर्वांना नमस्कार.
        मी तुमच्या सगळ्या पेक्षा वयाने खूपच लहान आहे. मला अजून नीट बोलता येत नाही. पण मनातल्या मनात मात्र मी खूप गप्पा मारतो. त्याच गप्पा करण्याची आज इच्छा झाली.
      बालपणीचा काळ म्हणजे मोरपीस असते. रंगीत, आकर्षक ,मनमोहक आणि अगदी सहज सुलभ. कोणत्याही प्रकारच्या नाटकीपणा चा मुलामा नसलेलं बालपण खरोखरच देवाचं अमुल्य बक्षीस आहे.
       लहानपणा विषयी किंवा बालपणाविषयी संत महंत यांनी असे म्हटले आहे की,
          
        लहानपण देगा देवा 
        मुंगी साखरेचा रवा
       
         आम्ही लहान मुले दिवसभर खूप खेळतो. आम्हाला पैसे  कमावण्याची काहीच गरज नाही. कारण आमच्या सर्व इच्छा अपेक्षा तुम्ही वडीलधारी मंडळी पूर्ण करत असतात. आम्हाला काही हवे असले की आम्ही तुमच्याकडे हट्ट करतो. आमच्या हट्टापुढे तुम्हाला माघार घ्यावीच लागते. बाल हट्ट असतोच तसा. अगदी निरागस.
          खरं पाहता मोठेपणा पेक्षा बालपणाचा काळ अगदी सुखाचा असतो. बालपणा मध्ये हेवेदावे नसतात. स्वार्थ नसतो. शत्रुत्व नसते. फक्त असते प्रेम आणि मैत्री. आमच्या या प्रेम पूर्ण आणि मैत्रिणी भरलेल्या मनामुळेच आमचे चेहरे नेहमी प्रसन्न दिसतात. आम्हाला तुमच्यासारखं नट्टापट्टा करण्याची काहीही गरज नाही. तुम्हीच म्हणता ना मुले म्हणजे देवाघरची फुले असतात. मग फुले कधी गंध आणि पावडर लावून सजतात का?
बालपणीचा काळ सुखाचा
     फुलांना फक्त उमलणे ठाऊक असतं. त्यांची कुणाशीही स्पर्धा नसते .  स्पर्धा म्हणजे काय? हेच आम्हाला कळत नाही.   त्यामुळे आम्ही जी कृती करतो ते ती मनापासून करतो.आमच्या वागण्यामध्ये दुटप्पीपणा किंवा नाटकीपणा अजिबात नसतो.     बालपण कविता
         
             बालपणाच्या कालामध्ये गरजा अत्यंत मर्यादित असतात. हेच बालपणाच्या आनंदाचे प्रमुख कारण आहे. केवळ प्रेम देणे आणि प्रेम घेणे इतका साधा बालपणाचा व्यवहार असतो.
         बालपणा मध्ये खांद्यावर आठवणींचे किंवा अनुभवाचे ओझे अजिबात नसते.जसजसे वय वाढू लागते आणि आई-वडिलांचा बोट धरून आपण जग बघू लागतो, त्यावेळी सुरू होतो जीवनाचा एक खडतर प्रवास. सुरुवातीच्या काळात सारे काही प्रसन्न वाटते. आनंददायी वाटू लागते, पण जसजसे अनुभव वाढू लागतात भावनांची गुंतागुंत जाणवू लागते त्यावेळी कळते जीवनाची सत्यता आणि बालपणाचे महत्व.         रम्य ते बालपण मराठी निबंध

  बालपणाच्या वागण्यामध्ये मुग्धपणा असतो धसमुसळेपणा असतो. जसे मोठे होऊ लागतो तसे हा मुग्धपणा आणि  धसमुसळेपणा धसमुसळेपणा   आपोआपच मागे सुटतो. नाईलाजानेही सोडावा लागतो.
      बालपणा मध्ये आपल्याला जे हवे ते आपण रडून किंवा थोडेसे गोड बोलून नाहीतर हसून मिळवू शकतो. बालपणीचे खेळ अगदी साधे आणि सरळ. देवपूजेसाठी आजीला फुले वेचून देणे, चेंडू घेऊन भिंती बरोबर दिवसभर खेळत बसणे, घरातल्या घरात लपाछपी, चोर-पोलिस, लपंडाव . सगळं किती सहज आणि सुलभ.
      राग, लोभ, आशा ,अपेक्षा कशाचाही लवलेश नाही. झाडांना ज्या पद्धतीने फक्त इतरांना सावली देणे माहित असते, त्याच प्रमाणे बालपणाला फक्त सुख आणि आनंद वाटणे एवढेच ठाऊक असते.
      यावर मला एक काव्यपंक्ती आठवते,
  फुलाफुलांचे रंग घेऊया ,
झाडे जशी उंच तसे उंच होऊया.

      बालपणी आम्हाला काही हवे असले की , आम्ही फक्त थोडा सा चेहरा उदास करून आणि डोळ्यात पाणी आणून मागितल कि बस काम झालं. ती वस्तू पुढच्या काही वेळातच आमच्या समोर हजार होत असे. खरोखर बालपणा मध्ये एक वेगळीच ताकद असते. की ज्या ताकदीमुळे कोणत्याही बळाचा वापर न करता सर्व इच्छा पूर्ण होतात.
     बालपणाचा हा काळ मोठे झाल्यानंतर ज्यावेळेस आठवेल त्यावेळी पुन्हा लहान व्हावेसे वाटेल यात काहीच शंका नाही.त्यावेळी कितीही लहान व्हावेसे वाटले तरीही लहान होता येणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे.

.....................................................
       
                

बालपण चारोळ्या 

 1) आठवणींच्या  झुल्यात
      झुलत असते बालपण
     अवचित क्षणी एखाद्या
     हळूच स्मरते बालपण.
                     

2) बागडन्यांचा काळ म्हणजे बालपण
 मुक्त उधळण्याचा काळ म्हणजे बालपण


3) आयुष्याच्या सुरुवातीला
       खेळत येते  बालपण
    आयुष्याच्या आठवणी
      देऊन जाते बालपण
     
4) चैतन्याने बहरलेले असते बालपण
    आनंदाने नटलेले असते बालपण

5) बालपण एक धन आहे
    आठवणींचे स्मरण आहे.

     मला आशा आहे की तुम्हाला रम्य ते बालपण  निबंध आणि बालपण चारोळ्या आवडतील. तुम्ही रम्य ते बालपण निबंधातील परिच्छेद आणि बालपण चारोळ्या तुमच्या विविध परीक्षांमध्ये वापरू शकता.
हे निबंध वाचायला विसरू नका...


          
मित्रांनो रम्य ते बालपण किंवा बालपणीच्या आठवणी निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव आणि प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला svbs9695@gmail.com वर तुमच्या नावासह पाठवा .तो तुमच्या नावासह प्रदर्शित करण्यात येईल.
तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला कळवा आम्ही तो निबंध तुम्हाला लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करू.



  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay

     
    
   











Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने