1001marathiessay.blogspot.com
समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोक यामध्ये सांगतात की,
देह त्यागता कीर्ती मागे उरावी,
मना सज्जना हेचि क्रिया धरावी
आजपर्यंत कितीतरी माणसे जन्माला आलेत आणि गेले देखील.त्यातील ज्यांनी आयुष्यात काही तरी महान कार्य केले त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो. पण असे लोक फारच कमी आहेत. याउलट जे लोक जीवन जगून मेलेत परत त्यांची आठवणही आता येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ती माणसे फक्त स्वतःसाठी किंवा स्वतःच्या माणसांसाठी ,कुटुंबासाठी जगलीत .
सध्याच्या काळात आपण जी अनेक श्रीमंत माणसे बघतो त्याहीपेक्षा श्रीमंत माणसे भूतकाळात होऊन गेलेली आहेत. रावणाच्या राज्यातील घरी देखील सोन्या पासून बनवलेली होती. इतक्या ऐश्वर्य असून देखील स्वतः सोबत काहीही घेऊन जाता येत नाही.
सध्या अनेक ठिकाणी माझं तुझं करण्यातच लोक व्यस्त झालेले दिसतात. धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला मृत्यूचे भानच राहिले नाही. आत्ताचा क्षण गेला तोच खरा पुढच्या क्षणाला आपण या जगात असू की नाही याचा भरोसा नाही.
असे जगावे दुनियेमध्ये ,
आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर
- गुरु ठाकूर.
या काव्यपंक्ती मध्ये कवी गुरु ठाकूर असे सांगतात की आयुष्यामध्ये किती संकटे येऊ द्या पण अजिबात घाबरायचं नाही. संकटांचा निर्भीडपणे डोळ्यात डोळे घालून सामना करायचा. असा संघर्ष करायचा की, आपल्या यशाचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे.
मरायचं तर सगळ्यांनाच आहे, पण मरण्या अगोदर असे आयुष्य जगून जावे की मृत्यूनंतरही आपली कीर्ती पसरलेली असावी.
हे वाचायला अजिबात विसरू नका
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.