upkarmarathi.com
फळ्याचे मनोगत मराठी निबंध |
नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र फळा बोलतोय. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासामध्ये पुरेपूर मदत करणे हा जणू माझा धर्मच आहे. त्यासाठी वाटेल तो त्रास सहन करण्याची माझी तयारी असते. स्वतःच्या कौतुकासाठी मला असे म्हणावे वाटते की,
तुमच्या भल्यासाठी जो सोसतो कळा
तोच मी तुमचा मित्र फळा
शाळेमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक ज्या आपुलकीने आणि प्रेमाने तुम्हाला समजून सांगायचे त्यावेळी मी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे फार कौतुकाने बघत असायचो.
तुमच्या शिक्षण घेण्याच्या कामांमध्ये माझाही काहीतरी उपयोग होतो आहे हे बघून मनोमन आनंद वाटायचा. तुमच्या उज्वल भविष्यासाठी मी माझ्या संपूर्ण अंगावरती काळा रंग लावून घेतला. रंग जरी काळा असला तरी माझ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो.
जी मुले मात्र माझ्या संपूर्ण अंगावर ओरखडे ओढतात. मला खूप त्रास होतो. पण आपण मित्र आहोत ना म्हणून मी काही बोलत नाही.
आता सध्या भरपूर प्रकारचे फळे आलेले आहेत. त्यांच्यावर लिहिण्यासाठी पेनही आलेले आहेत. व्हाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड ,लाईट बोर्डअशा अनेक प्रकारच्या फळांमुळे शिक्षणातील रंजकता ही वाढलेली दिसते.
पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळा फक्त शाळांमध्ये फळे असायचे. आता मात्र पालक आपल्या मुलांना घरांमध्येच फळे आणून देतात. मुलेही आवडीच्या रंगाने त्या फळ्यांवर लिहून अभ्यास करताना दिसतात.
काळ बदलला तसे माझे रूप बदलले पण माझे महत्त्व मात्र आजही तसेच टिकून आहे. तुमच्या सर्वांच्या भविष्याला योग्य वळण मिळावे तुमचे भविष्य कधीही टांगणीला लागू नये म्हणून मी स्वतःला टांगून घेतलेले आहे.किती दिवसांपासून इथे लटकून राहिलेलो आहे. माझे अंग खूप दुखते . अंग कितीही दुखले तरीदेखील तुमच्या भविष्यासाठी आजन्म हा त्रास सहन करत राहील. शेवटी मित्राच्या भल्यासाठी सतत त्रास सहन करू शकतो, तोच खरा मित्र नाही का.
या निबंधाची खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
- |मी फळा बोलतोय
- |फळ्याचे आत्मकथन
- |फळ्याचे आत्मवृत्त
- |मी फळा बोलतोय मराठी निबंध
- |वर्गातील फळ्याचे मनोगत
- |फळा बोलू लागला तर
या साईट वरील इतर निबंध अवश्य वाचा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.