1001marathiessay.blogspot.com


विज्ञान शाप की वरदान
Vidnyan shap ki vardan marathi nibandh

       खरे पाहता विज्ञान शाप की वरदान हा विचार करण्यापेक्षा, विज्ञानाने माणसाची जीवन किती सहज सुरळीत बनवले आहे याचे चिंतन करणे जास्त गरजेचे आहे.
     माझ्या मते विज्ञान केवळ वरदानच आहे.विज्ञान म्हणजे वेगळे असे काही नाही तर निसर्गात ज्या गोष्टी आधीपासून उपलब्ध आहे त्यांचा शोध घेणे. मानवाने स्वतःच्या बुद्धी कौशल्याने निसर्गात दडून बसलेल्या गोष्टींचा शोध घेतला बुद्धी सामर्थ्याने त्याचा स्वतःच्या जीवनाच्या उत्कर्षासाठी उपयोग करून घेतला.
निसर्गानेच जी गोष्ट निर्माण केलेली आहे ती गोष्ट शाप कशी ठरू शकते ?. निसर्ग इतकी मोठी चूक कधीही करू शकत नाही. मानवाने निसर्गातील या गोष्टींचा आधार घेऊन अनेक शोध लावले. हे शोध लागल्यानंतर त्यांचा वापर किती प्रमाणात करायचा हेही मानवानेच ठरवायला हवे ना! शेवटी कोणतीही गोष्ट कितीही चांगले असले तरी देखील तिचा अतिरेक वाईटच असतो.
        स्वामी विवेकानंदांना एकदा असा प्रश्न विचारण्यात आला की ,त्यांच्या मते विष म्हणजे नेमके काय? त्यावेळी विवेकानंदांनी सांगितले कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर घेतली किंवा वापरली तर ती विष ठरते.
विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
        विज्ञानाच्या जोरावर माणूस आज मंगळ ग्रह पर्यंत जाऊन पोहोचला. आपल्या आवडत्या चांदोमामा च्या घरी राहायला जाण्याची स्वप्नही माणसांना पडू लागलेली आहेत. सकाळच्या बातम्या ऐकण्यासाठी रेडिओ टीव्ही आता उपलब्ध आहेत. या सर्वांमुळे जगातील कानाकोपऱ्यातील माहिती माणसाला घरात खुर्चीत बसून मिळते. या सगळ्यांवर कळस घातला तो म्हणजे मोबाईलच्या शोधाणे.
       मोबाईलने तर मानवी जीवनाचा आयामच बदलून टाकला . मोबाईलला इंटरनेटची जोड मिळाली आणि संपूर्ण जग म्हणजे छोटेसे खेडे बनून गेले. जगात कोणीही कुठेही असला तरी त्याच्याशी आपण बोलू शकतो. दृश्य संवाद साधल्यामुळे तर समोरची व्यक्ती आपल्या समोरच बसून गप्पा मारते आहे असे वाटते.
       विज्ञानामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी क्रांती घडून आली त्यामुळे तर मानवी जीवन खूपच वेगवान झाले . पूर्वीच्या काळी बैलगाडीने प्रवास करताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम विज्ञानामुळे वाचले. जगातील कुठल्याही कोपऱ्यात जाण्यासाठी आता काही तास लागतात. बसेस ट्रेन विमान सुपरफास्ट ट्रेन बुलेट ट्रेन यामुळे प्रवासाचे आणि दळणवळणाचे रूप पूर्णपणे बदलून गेलेले.
Vidnyan shap ki vardan in Marathi Essay
           असे एकही क्षेत्र नाही जे विज्ञानाने व्यापलेले नाही. आपला दिवस सकाळी उठल्या पासून सुरु होतो त्यावेळेपासून तर आपण झोपी जातो त्या वेळेपर्यंत प्रत्येक गोष्टीत विज्ञानाने हस्तक्षेप केलेला आहे.
          सकाळी उठल्यानंतर आपण दात घासण्यासाठी वापरणारा ब्रश, ब्रशवर लावणारा पेस्ट विज्ञानाचा चमत्कार आहे. अंघोळीसाठी घराघरात पोहोचणारे पाणी त्यासाठी केलेली पाईपलाईन ची व्यवस्था, पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था हे सगळे विज्ञानच आहे.
           आजारी पडल्यानंतर किंवा काही अपघात झाल्यानंतर रुग्णांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाणे, यासाठी लागणारी संपूर्ण वाहन व्यवस्था विज्ञानाचाच  तर चमत्कार आहे आहे. दवाखान्यात गेल्यानंतर केले जाणारे चिकित्सा त्यासाठी लागणारे सर्व उपकरण ही सगळी विज्ञानाची एक देणगी आहे.
         एकंदरीत असे म्हणता येईल की माणसाच्या जीवनात विज्ञानाचे अस्तित्व नष्ट झाले तर मानवी जीवन देखील नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्या बरोबरच एक गोष्ट ही विसरून चालणार नाही की विज्ञानाचा अतिरेक केल्यानंतर देखील मानवी जीवन नष्ट होईलच हेही तितकेच खरे आहे.
      विज्ञान शाप की वरदान अशी नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा, विज्ञान मानवी जीवनाला फक्त वरदानच ठरेल अशा पद्धतीने त्याचा वापर करणे मानवाच्या हातात आहे. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना एक म्हण माहीतच आहे . अति तिथे माती.
      मला वाटते माझे बोलणे तुम्हाला सगळ्यांना कळले असेलच.




       









1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. या लिहालेल्या ब्लॉग मुले अभ्यासात पन आयुष्य त पन उपयोगी पड़े ल

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने