1001marathiessay.blogspot.com
पुरे झाले आता आता सर्व गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत म्हणून तुमच्याशी बोलण्याचा आज निश्चयच करून घेतला मी ! मी पुतळा असलो म्हणून काय झाले ? मलाही भावना आहेत . माझे मत व्यक्त करण्याचा अधिकार मला आपल्या संविधानाने दिलेला आहे.
खरे तर मला असे वाटते की, हे पुतळे संस्कृती आता बंदच करून टाकली पाहिजे. हल्ली बघावे तिकडे पुतळे उभारण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. पुतळे उभारणे वाईट असे मला म्हणायचे नाही, परंतु त्यानंतर त्याच्या मागे जे राजकारण केले जाते त्याचा मात्र मला आता वीट आलेला आहे.
अनेक थोरा मोठ्यांचे पुतळे उभे करून दिलेले जागोजागी दिसतात. हे पुतळे ज्या थोर व्यक्तीचे नेतृत्व करतात त्या महान व्यक्तीच्या विचारांचे मात्र पुतळे उभारणार्यांचा काडीमात्रही संबंध दिसून येत नाही. त्याच्या स्वार्थासाठी पुतळे उभारायचे आणि मग लोकांच्या आणि सामान्य जनतेच्या भावनांशी खेळ करत स्वतःचा स्वार्थ साधायचा हे पुढाऱ्यांना फार चांगल्या पद्धतीने जमते.
माझी निर्मितीही अशाच एका कारणामुळे झालेली आहे. ज्या महान व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मी या ठिकाणी नेतृत्व करत आहे त्या महान व्यक्तीने तर जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह झिजवला आहे.पण ज्यांनी मला याठिकाणी उभारले त्या श्रीमंत व्यक्तीने मात्र अनेक गोरगरिबांचे देह जर्जर करून टाकलेले आहेत. आम्ही मात्र हे सगळे बघून देखील काहीही करू शकत नाही.
सगळीच माणसे वाईट असतात असे मला अजिबात म्हणायचे नाही तसेच सगळीच माणसे स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त पुतळे निर्माण करतात असेही मला म्हणायचे नाही परंतु ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य चांगल्या कामासाठी खर्च केले अशा व्यक्तीच्या आठवणी तुम्ही जो पुतळा बनवता त्या व्यक्तीच्या तत्वानुसार वागण्याचा प्रयत्न तरी निश्चितच केला पाहिजे.
पुतळे निर्माण केल्यानंतर त्याच्यावरती सतत धूळ बसत राहते. पशुपक्षी घाण करतात परंतु ही धूळ आणि घाण आम्ही ज्या व्यक्तीच्या नेतृत्वासाठी उभे आहोत त्या व्यक्तीने दिलेली शिकवणी कधीही धूसर करू शकणार नाही.
चला ,ठीक आहे. माझे मन मोकळे करून झाले . आता मला फार बरे वाटत आहे. मी जे काही बोललो त्याचा कृपया कोणालाही राग येऊ देऊ नका फक्त माझी कळकळ समजून घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा. मी बघतो आहेच , इथे उभा राहून अगदी तटस्थपणे !
प्रिय मित्रांनो तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद अजून नवीन लेखन करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देत राहतो.
खूप खूप धन्यवाद.
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.