1001marathiessay.blogspot.com
| जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी पालकांच्या समर्थनावर निबंध ,
| Essay on the support of parents in overcoming hardships of life
आयुष्य म्हटले तर अडचणी या येणारच ना ! हे अगदी साधे आणि प्रसिद्ध वाक्य . पालक तर आपल्या मुलांना हे वाक्य बोलतातच हे माझ्या निदर्शनात बऱ्याच वेळा आलेले आहे.
हे वाक्य बोलताना मात्र पालक हे विसरलेले दिसतात की, ते पालक आहेत आणि त्यांनी जीवनाचा बराचसा अनुभव घेतलेला आहे. मुलांनी अजून जीवनातील काही अडचणी आणि त्यातून मिळणारे अनुभव घेणे अद्याप बाकी असते. जेव्हा मुले एखाद्या विशिष्ट अडचणीत किंवा संभ्रमावस्थेत असतात त्यावेळी पालकांनी आपल्या समजदारपणाचा आणि आपल्या अनुभवाचा उपयोग मुलांना त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी नक्कीच करून दिला पाहिजे.
पालकांचा आपल्या पाल्याला असलेला आधार ही अशी गोष्ट आहे जी पाल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते.
कोरोना महामारी च्या प्रादुर्भावामुळे शिक्षणाचा तर चांगलाच गोंधळ उडालेला आहे. अभ्यासक्रमामध्ये झालेली कपात यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची दिशा ठरवन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अडचणी येत आहेत.नेमका अभ्यास कुठून सुरू करायचा? कसा सुरू करायचा? याबद्दल ते गोंधळलेली दिसून येतात. शिक्षक आपापल्या परीने शिकवण्याचा प्रयत्न करतच आहेत. हे शिक्षण चालू असले तरी देखील विद्यार्थ्यांच्या मनात शंका या निर्माण होतातच .भारतामध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची आणि घेण्याची सुरुवात या कोरोना काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाली. मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेता येते .हे देखील बऱ्याच जणांना या काळामध्ये समजले.
मुले मोबाईल वापरू लागली .अर्थातच पालकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मुलांना मोबाईल बघू द्या, परंतु अभ्यासाकरताच. इतर वेळेला मुलांनी अतिरिक्त मोबाईल बघणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आणि धोकादायक आहे .अशी अनेक उदाहरणे देखील समोर आली आहेत.
बऱ्याच ठिकाणी तर मुलांचे ऑनलाईन क्लासेस चालू आहे . त्यामुळे पालकांचा मोबाईल मुलांकडे बराच वेळ असल्यामुळे पालक देखील वैतागलेले दिसून आले होते ,पण यात मात्र दोष कुणाचाच नव्हता .हे पालकांनी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
काही पालक मुलांवरती चिडलेले देखील मी पाहिलेले आहे.तुझ्या अभ्यासाच्या नादात मी काम सोडून देऊ का? असेही बरेच पालक मुलांना बोललेले आहेत.
असे बोलणार नाही मुलांना देखील आपला अभ्यास आपल्या पालकांना तितका महत्त्वाचा वाटत नाही असे वाटू लागते मग मुलेही अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात करतात.इकडे तिकडे खेळू लागतात त्या वेळी पालक पुन्हा मग म्हणतात तुला काही अभ्यास वगैरे नाही कोरोनामुळे सर्व विद्यार्थ्यांची चांगलीच मजा झालेले आहे आणि भरपूर सुट्ट्या मिळत आहेत असे देखील पालक बोलतात.
असे बोलण्याऐवजी पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्याला समजेल अशा साध्या भाषांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसवले पाहिजे.मुलगा काय वाचतो ?याच्याकडे निरीक्षण ठेवले पाहिजे. अर्थात आपल्याला वाचता येत नसले तरी मुले वाचन करत असताना आपल्याला ती भाषा समजू शकते . मुले चुकीची वाचत आहे की बरोबर हे आपल्याला म्हणजेच पालकांना अनुभवावरून सहज समजते. चुकीचा उच्चार , चुकीचे शब्द वाचन हे पालक मुलांना समजावून सांगू शकतात . पालक अशिक्षित असला तरी देखील भाषेमधील शब्द योग्य पद्धतीने बोलणे पालकांना अनुभवातून समजलेले असते.
- लॉकडाउनच्या काळामध्ये पालकांनी मुलांवर रागावू नये .
- घरांमध्ये चिडचिड करू नये .
- बऱ्याच पालकांची आवक कमी झालेली ही दिसून येते पण ही कठीण परिस्थिती ही निघून जाईल .
- आपण सर्व मिळून या कठीण परिस्थितीवर मात करू. अशी एक भावना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यां मध्ये निर्माण करा .
- याचा उपयोग मुलांना भविष्यात जेव्हा त्यांच्या आयुष्यात असे काही कठीण प्रसंग येतील तेव्हा न डगमगता धीरोदात्तपणे अशा संकटांचा सामना करण्याची शक्ती देतील.
- पालक म्हणून मुलांना आधार देणे मग तो आधार आर्थिक असण्यापेक्षा मानसिक फारच गरजेचा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.